ETV Bharat / state

Chabad House Security : मुंबईत पुन्हा 26/11 हल्ल्याचा संशय; छाबड हाऊसच्या सुरक्षेत वाढ

author img

By

Published : Jul 29, 2023, 3:08 PM IST

Updated : Jul 29, 2023, 8:31 PM IST

कुलाब्य येथील छाबड हाऊसची सुरक्षा पोलिसांनी वाढवली आहे. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या (Chhabra House Security Increased) टार्गेटपैकी एक असलेल्या छाबड हाऊसची Google प्रतिमा अटक करण्यात (Mumbai Terror Attack) आलेल्या दोन आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांनी मुंबईत येऊन छाबड हाऊसची रेकी केल्याची (Chabad House Security) शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही सुरक्षा वाढवली असल्याची माहिती एटीएसचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना दनली आहे.

Chhabra House Security Increased
Chhabra House Security Increased

मुंबई : पुन्हा एकदा कुलाब्यातील छाबड हाऊस दहशतवादांच्या टार्गेटवर असल्याची शक्यता वर्तवली जात (Chhabra House Security Increased) आहे. कारण पुण्यात अटक केलेला दहशतवाद्यांकडे कुलाब्यातील ताज हॉटेलजवळ असलेल्या छाबड हाऊसचे फोटो तपास अधिकाऱ्यांना सापडले आहेत. यावरून अटक केलेला दहशतवाद्यांनी मुंबईत येऊन छाबड हाऊसची रेकी (Mumbai Terror Attack) केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी कंबर कसत दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने कुलाब्यातील छाबड हाऊसच्या (Chabad House Security) आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

  • Mumbai Police heightens security outside Chabad house (one of the targets of the 26/11 terror attack) in Colaba after a Google image of Chabad house was recovered from two accused arrested for planning an attack in Rajasthan. https://t.co/acm5bEuQ6L pic.twitter.com/fRWdaVtVQ3

    — ANI (@ANI) July 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'ईटीव्ही भारत'ला एटीएसची माहिती - एटीएसचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले की, हे प्रकरण संवेदनशील असून त्यावर बोलणे योग्य नाही. मात्र, छाबडा हाऊसची सुरक्षा वाढवली आहे.

राजस्थानमध्ये हल्ल्याचा कट : 26/11 मुंबईतील भीषण दहशतवादी हल्ल्याच्या वेळी टार्गेटवर असलेल्यापैकी एक छाबडा हाऊस. या छाबडा हाऊसची गुगल इमेज राजस्थानमध्ये हल्ल्याचा कट आखण्याच्या तयारीत असलेल्या आणि पुण्यातून अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींकडून जप्त करण्यात आली आहे.

दहशतवाद्यांकडे छाबडा हाऊसची गुगल इमेज : मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी कुलाबा येथील ज्यू कम्युनिटी सेंटरमध्ये सुरक्षा वाढवली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांकडून मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान, मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी यांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना त्यांच्याकडून छाबडा हाऊसची गुगल इमेज मिळाली आहे. महाराष्ट्र एटीएसने मुंबई पोलिसांना माहिती दिल्यानंतर तात्काळ कंबर कसत या ज्यु कम्युनिटी सेंटर असलेल्या छाबडा हाऊसची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अटक दोघेही आरोपी हे राजस्थानमधील रतलामचे रहिवासी असून ते सध्या महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात आहेत.

मुंबई पोलीस सतर्क : इसिसच्या टार्गेटवर पुन्हा जो कम्युनिटी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रतलाम मॉड्यूलचे संशय दहशतवादी एटीएसच्या हाती लागले असून त्यांच्याकडे सापडलेल्या छाबडा हाऊसच्या गुगल इमेजमुळे मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. त्यानंतर मुंबई पोलिसांनी 50 पोलीस हवालदार कर्मचारी आणि अधिकारी छाबडा हाऊस परिसरात तैनात केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मुंबई पोलीस दलाचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांना या संदर्भात अधिक माहिती विचारण्यासाठी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकलेला नाही.

हेही वाचा - Ratnagiri Crime : अतिरेकी कारवाया प्रकरणी रत्नागिरीतून आणखी एकाला अटक

Last Updated :Jul 29, 2023, 8:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.