ETV Bharat / state

Supriya Sule on CM Shinde : सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल; सत्ताधारी आमदाराला पाठिशी घालताय काय?

author img

By

Published : Mar 31, 2023, 2:33 PM IST

Updated : Mar 31, 2023, 2:44 PM IST

शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान, हा खेदजनक आहे संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी करतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सवाल करत सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे म्हणुन तुम्ही त्याला पाठिशी घालत आहेत काय असे विचारले आहे. (Question by Supriya Sule)

Supriya Sules question to the Chief Minister
सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना केलेले वादग्रस्त वक्तव्यावर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी केली. दरम्यान, छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली, त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो, हे खेदजनक आहे, असे ट्वीट करत नाराजी व्यक्त केली.

  • अनेक महापुरुषांचा वैचारिक वारसा असणारे महाराष्ट्र हे अत्यंत सभ्य, सुसंस्कृत राज्य आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली,त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब आहे. राजकारणात कितीही तीव्र विरोध असला तरीही…

    — Supriya Sule (@supriya_sule) March 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

छत्रपती संभाजीनगरमधील सभेत आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याबाबत उधळलेली मुक्ताफळे महिला वर्गाचा अपमान करणारी आहेत. राजकारण, समाजकारण किंवा अन्य शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांच्या संदर्भाने अशी आक्षेपार्ह आणि अवहेलनात्मक वक्तव्य येत असतील तर अगदी तळागाळापर्यंत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचे काय, हा प्रश्न अधिक गंभीर आहे, असेही खासदार सुळे म्हणाल्या.

अनेक महापुरुषांचा वैचारिक वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. अत्यंत सभ्य, सुसंस्कृत राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे. आजवर राजकारणात कितीही टोकाचा विरोध असला तरीही महिलांबद्दल बोलताना कायमच इथल्या राजकीय धुरीणांनी सुसंस्कृतपणाची आब राखली आणि जपल्याची आठवण करून दिली.संजय शिरसाठ हे सर्वसामान्य व्यक्ती नसून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा असणाऱ्या विधिमंडळातील सदस्य आहेत.

राज्याचे पालनकर्ता म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. तसेच, सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याने त्यावर कार्यवाही होत नाही. संबंधिता विरोधात गुन्हा दाखल होत नाही, सरकार त्याला पाठीशी घालतेय का? असा प्रश्न उपस्थित केला.

राज्यात आक्षेपार्ह वक्तव्ये, सायबर क्राईम, विनयभंंग अथवा महिलांच्या संबंधातील तक्रारींवर तातडीने कारवाई करणे अपेक्षित आहे. त्यामुळे राज्य सरकारने महिलांबाबत संवेदनशील असायला हवे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची गंभीर्याने दखल घेत, संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

हेही वाचा : Kirit Somaiya on Sai Resort : २० साक्षीदार म्हणतात साई रिसॉर्ट अनिल परब यांच्या काळ्या पैशांचे - किरीट सोमैया

Last Updated :Mar 31, 2023, 2:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.