ETV Bharat / state

Supriya Sule Vs Sunetra Pawar: निवडणुकीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळेंची होणार का लढत? जाणून घ्या राजकीय विश्लेषकांच मत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 6:17 PM IST

Supriya Sule Vs Sunetra Pawar आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं मिशन ४५ हे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या दृष्टीने अडसर ठरणारा बारामती मतदारसंघ काबीज करण्यासाठी भाजपानं नवीन खेळी खेळण्याचं समोर आले आहे. जर तसे झाले तर बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही लढत होऊन पवार सुळेंना कात्रजचा घाट दाखवणार का? ही चर्चा आता जोर धरू लागली आहे. मात्र ही निवडणूक सुळेंसाठी सोपी राहणार नाही, असे जाणकारांचे मत आहे.

Supriya Sule Vs Sunetra Pawar
Supriya Sule Vs Sunetra Pawar

मुंबई Supriya Sule Vs Sunetra Pawar: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. आगामी निवडणूक इंडिया विरुद्ध एनडीए अशी थेट होणार असली तरी या निवडणुकीला अनेक राजकीय कंगोरे असणार आहेत. राज्यात मिशन 45 हे उद्दिष्ट ठेवून वाटचाल करणाऱ्या भारतीय जनता पार्टीनं बारामती मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचा होणारा पराभव हा भारतीय जनता पार्टीसाठी सर्वात महत्त्वाचा असणार आहे. हाच मतदारसंघ त्यांच्यासाठी अडचणीचा ठरणार असल्यानं त्यांनी अजित पवार यांनाच आपल्याकडं सामावून घेतलं आहे.



पवार कुटुंबातच लढत- आगामी निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांच्या भावजय म्हणजे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवण्याचा भाजपाचा विचार आहे. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार म्हणाले की, या केवळ आता चर्चा आहेत. जेव्हा प्रत्यक्षात याबाबतीत काही घोषणा होईल, तेव्हा आम्ही विचार करणार आहोत. परंतु आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे याच निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या विरोधात कोण उभे राहते, हे पाहून त्यानुसार आम्ही ठरवू असे आमदार रोहित पवार म्हणाले.


सुप्रिया सुळेंसाठी अडचणीची निवडणूक- बारामती मतदारसंघावर पवार कुटुंबाचा 1991 पासून वर चष्मा आहे. अजित पवार या मतदारसंघातून साडेतीन लाखांच्या आघाडीने निवडून आले होते. त्यानंतर या मतदारसंघातून सुप्रिया सुळे या निवडून येत आहेत. सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य कमी-जास्त झाल्याचे आजवर दिसून आले. 2014 मध्ये त्या केवळ 69 हजार मतांनी निवडून आल्या होत्या. सुनेत्रा पवार जर त्यांच्या विरोधात रिंगणात उतरल्या तर मात्र खासदार सुळे यांच्यासाठी ही निवडणूक अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.

काहीही झाले तरी इंडिया विरुद्ध एनडीए अशीच लढत होणार आहे. मात्र त्यासाठी पवार कुटुंबीयांना बारामतीमध्ये अडकवून अन्य ठिकाणी अधिकाधिक प्रचारात मुसंडी मारण्याचा डावही भाजपच्यावतीनं आखला जाऊ शकतो-राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड

सुळे यांना कात्रजचा घाट?अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. त्यामुळे अजित पवारांच्या मागे उभे राहिलेला मतदार निश्चितच सुप्रिया सुळे यांची मतं कमी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तसे झाल्यास कदाचित आगामी निवडणुकीत अजित पवार कुटुंबीयांकडूनच सुळे यांना कात्रजचा घाट दाखवला जाण्याची शक्यता आहे, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे. पवार कुटुंबीयांचा पराभव करायचा असेल तर त्यांच्याच घरातील व्यक्ती बारामती मतदारसंघातून निवडणुकीसाठी उतरवली पाहिजे, हे भाजपनं ओळखलं आहे. त्यामुळंच भाजपनं हा डाव केला आहे.

हेही वाचा-

  1. Sunil Tatkare On Supriya Sule: राष्ट्रवादीच्या 'त्या' निर्णयाची चौकशी करा- सुनिल तटकरेंची मागणी
  2. NCP Mumbai President : अजित पवार गटाचा मुंबईचा कारभार समीर भुजबळांकडं?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.