ETV Bharat / state

MPSC Hall Ticekts : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट लिक झाल्याचा व्हिडिओ व्हायरल, परीक्षा वेळेप्रमाणेच होणार

author img

By

Published : Apr 23, 2023, 2:02 PM IST

Updated : Apr 23, 2023, 3:21 PM IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा प्रवेश पत्र
students Admit cards

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त सेल टॅक्स आणि पीएसआय तसेच इतर अशा विविध विषयांचे स्पर्धा परीक्षा 30 एप्रिल 2023 रोजी होत आहे. या परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र हे अनधिकृत टेलिग्राम चॅनेलवर कोणालाही उपलब्ध होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रशासनाचा कारभारावर राष्ट्रवादीकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तर आयोगाने प्रवेश पत्र लिक झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे.

अमोल मातेले यांची प्रतिरक्रिया

मुंबई : एमपीएससीची स्पर्धा परीक्षा सहा दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. मात्र, या परीक्षेचे प्रवेश पत्र हे शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन ओटीपी देऊन आपला मोबाईल क्रमांक त्यामध्ये नमूद करून विविध डेटा त्यामध्ये भरल्यानंतरच लॉगिन होता येते. त्यामध्ये पासवर्ड टाकून आपले प्रवेश काळ उपलब्ध होऊ शकते. मात्र एका बनावट टेलिग्राम चॅनेलने 1 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र लिक केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची प्रवेशप्रमाणपत्रे टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध असल्याबाबत तसेच सदर चॅनेलकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांबाबतचा खुलासा प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. pic.twitter.com/UP9hnZgUGB

    — Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) April 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रवेश पत्र टेलिग्राम चॅनलवर कसे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग तंत्रज्ञानाचा वापर करीत अनेक परीक्षा पार पाडत असते. मात्र 30 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या संयुक्त स्पर्धा परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र एका टेलिग्राम चॅनलवर कसे का उपलब्ध होऊ शकतात? त्या टेलिग्राम चॅनेलचा लोगो हा एमपीएससीचा लोगो म्हणून वापर केला गेला आहे. या टेलिग्राम चॅनेलला सुरू करणारा व्यक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अधिकृत व्यक्ती आहे काय? नसेल तर बेकायदेशीर असे करणाऱ्या व्यक्ती किंवा टोळीवर शासन लक्ष ठेवणार किंवा नाही? असा प्रश्न विद्यार्थी आणि समाजातील इतर विविध संघटनांकडून विचारला जात आहे. यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग त्यांचे अध्यक्ष आणि तसेच महाराष्ट्र शासन यांचे बिलकुल लक्ष नाही. त्यामुळेच ही घटना घडल्याची भावना विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे.

अनधिकृत टेलिग्रॅमवर कारवाई करावी- या संदर्भात ईटीव्ही भारतने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते अमोल मातेले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली की, 30 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येत आहे. त्याची प्रवेश पत्र हे लिक झालेली आहेत. ते एका टेलिग्राम चॅनेलवर कोणालाही पाहता येतात. तसेच डाऊनलोड करता येतात. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तात्काळ अशा अनधिकृत टेलिग्रॅमवर कारवाई करावी, अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू देवानंद शिंदे यांच्यासोबत ईटीवी भारत वतीने संवाद साधला असता ते म्हणाले की, याबाबत मला माहिती नाही. मी एका सार्वजनिक कार्यक्रमात आहे. परंतु असे जर होत असेल तर ते उचित नाही. याबाबत सचिवाशी तातडीने मी बोलतो.

नियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा होणार- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रवेश पत्रे लिक झाल्याचा दावा फेटाळला आहे. तसेत प्रश्नपत्रिका लिक झाल्याचा दावादेखील धादांत खोटा असल्याचे म्हटले आहे. अधिकृत लिंकवरून घेतेलेले प्रवेश पत्रावरच परीक्षेला प्रवेश दिला जाणार आहे. संबंधित चॅनेलच्या अॅडमिनविरोधात सायबर पोलिसाकडे तक्रार देण्यात आलेली आहे. नियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा होणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले.

हेही वाचा-Uddhav Thackeray Sabha: उद्धव ठाकरेंची जळगावमध्ये आज सभा; शक्तीप्रदर्शन करत मोटर सायकल रॅली काढली जाणार

Last Updated :Apr 23, 2023, 3:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.