ETV Bharat / state

State Examination Board Appeals : बारावीच्या निकालाबाबत समाज माध्यमांवरील अनधिकृत संदेशांवर विश्वास ठेवू नये - राज्य परीक्षा मंडळाचे आवाहन

author img

By

Published : May 5, 2023, 2:26 PM IST

महाराष्ट्र राज्यामध्ये 'बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखा जाहीर होणार आणि तो निकाल काही दिवसात लागणार' या पद्धतीचे खोटे संदेश सोशल मीडियामधून वायरल होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य दहावी आणि बारावी परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी 'अशा अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये' असे राज्यातील जनतेला आवाहन केले आहे.

State Examination Board Appeals
राज्य परीक्षा मंडळाचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व जिल्हे मिळून सुमारे 14 लाख 87 हजार 826 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा आता निकाल केव्हा लागणार याबाबत पालक आणि विद्यार्थी दोन्हींना देखील उत्सुकता आहे. परंतु याबाबत कालपासून काही ठिकाणी समाज माध्यमांवर संदेश व्हायरल होत असल्याची बाब जागरूक नागरिकांच्या आणि राज्य परीक्षा मंडळाला लक्षात आली. म्हणून अशा निराधार माहितींवर विश्वास ठेवू नये असे परीक्षा मंडळाने म्हटले आहे.


शासनाने शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्या : जुन्या पेन्शनसाठी महाराष्ट्र आंदोलन झाले. त्यामुळे देखील निकाल तपासण्याच्या कामकाजावर परिणाम झालेला आहे. परंतु त्याआधी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांचा संप झाला. त्यांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्या यासाठी राज्यभर ठिकठिकाणी त्यांनी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे बारावी परीक्षेच्या उत्तर पत्रिका तपासण्याचे काम रेंगाळले. कारण परीक्षा मंडळाच्या कार्यालयामध्ये हजारो लाखो उत्तर पत्रिकांचे ढीग जमा झाले होते. परंतु उत्तर पत्रिका तपासण्याचे काम सुरू झाले नव्हते. शासनाने शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्यानंतर बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीचे काम सुरू झाले .परंतु त्यात उशीर झालाय म्हणूनच तर्कसंगत पद्धतीने विचार करता निकालामध्ये थोडाफार उशीर होणे स्वाभाविकच आहे.



सर्रास कॉपी करण्याचे प्रकार : राज्यभरातून एकूण 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी तर मुंबई जिल्ह्यामधून 3 लाख 30 हजार 105 विद्यार्थ्यांनी परीक्षेत बसण्याची नोंदणी केली होती. एकूण राज्यभरातून जितके विद्यार्थी या बारावीच्या परीक्षेसाठी बसलेले आहेत, त्यातून 124 विद्यार्थी हे तृतीयपंथी आहेत. सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा पार पडली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी सर्रास कॉपी करण्याचे देखील प्रकार घडल्याच्या घटना माध्यमातून समोर आलेल्या होत्या. त्यावर राज्य परीक्षा मंडळाने वचक बसवण्यासाठी कठोर कारवाई करत असल्याचे देखील सांगितले होते.


अनधिकृत माहिती किंवा संदेशावर विश्वास ठेवू नये : बारावी अत्यंत महत्त्वाचे वर्ष असते. पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांना विविध ज्ञान शाखा निवडण्यासाठी ही एक महत्त्वाची वेळ असते. त्यामुळेच या परीक्षेबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. मात्र अनाधिकृत माहितीमुळे अनेकांचा हिरमोड होऊ शकतो. खोट्या माहितीमुळे अघटीत घटना घडू शकतात. यामुळेच महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने बारावीच्या परीक्षांचा निकालाच्या तारखा अद्याप जाहीर नाही, असे सांगितलेले आहे. तसेच या महिन्याच्या अखेर निकाल लागण्याची शक्यता आहे. मात्र उत्तर पत्रिका तपासण्याचे काम सुरू आहे. अनधिकृत माहिती किंवा संदेश यावर विद्यार्थी पालक आणि नागरिकांनी विश्वास ठेवू नये, अशी भावना राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : Proposal to Reject Sharad Pawar Resignation : शरद पवारांनी अध्यक्ष पदी राहावे, निवड समितीने राजीनामा फेटाळला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.