ETV Bharat / state

Winter Session 2022 : श्रद्धा हत्येप्रकरणी विशेष पोलीस पथकामार्फत चौकशी; गृहमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती

author img

By

Published : Dec 20, 2022, 5:58 PM IST

Winter Session
हिवाळी अधिवेशन

श्रध्दा वालकर खून प्रकरणी ( Shraddha Murder case ) विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ( Home Minister Devendra Fadnvis in Legislative Assembly ) केली. हिवाळी अधिवेशनात ( Winter Session ) लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या प्रश्नावर फास्ट ट्रॅक खटला चालवण्याची मागणीही यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

गृहमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती

नागपूर : श्रध्दा वालकर हीची झालेली निर्घृण हत्या ( Shraddha Murder case ) व त्या घटनेचे सामाजिक परिणाम लक्षात घेऊन अशा घटना पुन्हा घडू नये याबाबत कायदा करणार का? अशी विचारणा करीत आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी मांडली होती. यावर बोलताना आमदार अँड आशिष शेलार यांनी या प्रकरणात काही गंभीर विसंगती असल्याने हे प्रकरण संशयास्पद असल्याचे निदर्शनास आणून दिले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील या प्रकरणावर प्रश्न केला. दरम्यान, श्रध्दा वालकर खून प्रकरणी ( Shraddha Murder case ) विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ( Home Minister Devendra Fadnvis in Legislative Assembly ) केली.

विशेष पोलिस तपास करणार : श्रध्दा वालकर हीने सदर आरोपीकडून आपल्या मारहाण झाली होती, अशी तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. मग गुन्हा दाखल करुन या प्रकरणाची चौकशी का करण्यात आली नाही? दोन्ही कुटुंबाला बोलावून जे लेखी घेण्यात आले त्याला एक वर्षे उशीर का झाला? त्या कागदावर तारखेत खाडाखोड करण्यात का आली? असे प्रश्न उपस्थितीत केले. मागिल अडीच वर्षाच्या काळात तसेच तत्कालीन सरकारने घेतलेल्या भूमिका या संशयास्पद होत्या. त्यामुळे या प्रकरणी कोणता दबाव होता का? अशी शंका येते. त्यामुळे विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करुन या प्रकरणी चौकशी करा, अशी आग्रही मागणी भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis on Shraddha Murder case ) यांनी ही मागणी मान्य करीत विशेष पथकामार्फत चौकशी स्थापन करून लवकरात लवकर पुरावे गोळा करून शिक्षा कशी होईल, याबाबत प्रयत्न करणार असल्याचे सांगतिले.


फास्ट ट्रॅक खटल्याची मागणी : यासंदर्भात बोलतना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हे अत्यंत निर्घुण प्रकरअसल्याने आफताबला फाशीची शिक्षा होईल यासाठी सरकारने प्रयत्न कारावेत, तसे त्याचे सत्तर तुकडे केले तरी शिक्षा कमी होईल पण आपल्याकडे तसा कायदा नाही, असे सांगत या प्रकऱणाची विशेष पथकामार्फत पुढील अधिवेशनापर्यंत चौकशी करून अहवाल सदनाला द्यावा, अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.