ETV Bharat / state

MLA Disqualification Case : याचिका सहा गटात एकत्रित करुन सुनावणी होणार- विधानसभा अध्यक्ष

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2023, 8:55 PM IST

Updated : Oct 20, 2023, 9:17 PM IST

MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी महत्वाचा निर्णय घेतलाय. वेगवेगळ्या प्रकारच्या आलेल्या 34 याचिकांना सहा गटात एकत्रित करून याबाबत नार्वेकर सुनावणी करणार आहेत. (Assembly Speaker) सर्व याचिका एकत्रितपणे सुनावणीसाठी (Rahul Narwekar) घेण्यात याव्या अशा पद्धतीची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. यातील 34 याचिका एकत्र केल्या जाणार आहेत.

Rahul Narvekar On 34 Petitions
विधानसभा अध्यक्ष

आमदार अपात्रतेच्या सुनावणीविषयी असलेल्या याचिकांवर वकिलांचे मत

मुंबई : MLA Disqualification Case : शिवसेना पक्षातील आमदार अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शुक्रवारी सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गटाला आणि उद्धव ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले कागदपत्र आमच्याकडे सादर करण्याबाबतचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. त्यासोबतच पुढील सुनावणी 26 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

सहा समूहाच्या माध्यमातून होणार सुनावणी : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या 34 याचिका दाखल झाल्या आहेत. सर्व याचिका एकत्रितपणे सुनावणीसाठी घेण्यात याव्या अशा पद्धतीची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. तसेच 34 याचिका एकत्र केल्या जाणार आहेत. 6 समुहाच्या माध्यमातून त्या मांडल्या जाणार आहेत. शिवसेनेतील दोन्ही गटांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले कागदपत्र विधानसभा अध्यक्षांसमोर सादर करण्यासाठी 25 ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. शिंदे गटाच्या आमदारांची प्रतिज्ञापत्रे ग्राह्य धरण्यात आली आहेत.

सहा गटाच्या माध्यमातून सुनावणी : एकत्रित सुनावणीबाबत जो विषय होता त्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सहा गट तयार केले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या याचिका या सहा गटात विभागून सहा गटाच्या माध्यमातून त्यांची सुनावणी होणार आहे. एकप्रकारे ते एकत्रित आहेत. मात्र, सहा गटांमधून सुनावणी होणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांचे वकील प्रवीण टेंभेकर यांनी दिली.

वेळकाढूपणा सुरू - अ‍ॅडवोकेट धरम मिश्रा : विधानसभा अध्यक्ष पुन्हा वेळकाढूपणा करत आहेत. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जावे लागत आहे. नवीन कोणती याचिका दाखल झालेली नाहीये. सहा गट बनवले आहेत. या प्रक्रियेसाठी तीन महिने लागू शकतात, अशी माहिती ठाकरे गटाचे वकील धरम मिश्रा यांनी दिली.

34 याचिका एकत्रित सहा गटात अशाप्रकारे:
1) वर्षा येथील बैठकीस गैरहजर राहणे
2) दुसऱ्या बैठकीला गैरहजर
3) विधानसभा अध्यक्षांविरोधात मतदान
4) बहुमत चाचणी वेळी विरोधात केलेले मतदान
5) भरत गोगावले यांचा व्हिप मोडल्याबद्दलची याचिका
6) अपक्ष आमदारांचा गट याचिका

हेही वाचा:

  1. Chandrakant Patil On Ink AttacK : शाईची भीती नाही, आता आठ शर्ट असतात माझ्यासोबत : चंद्रकांत पाटील
  2. Manoj Jarange Patil Sabha : मला बोलू द्या नाहीतर... ; मनोज जरांगे यांच्या सभेत गोंधळ
  3. Uday Samant On Maratha Reservation : सरकार मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार - मंत्री उदय सामंत
Last Updated : Oct 20, 2023, 9:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.