ETV Bharat / state

Shraddha murder case : श्रध्दाच्या तीन मैत्रीणींचे नोंदवले जबाब; आतापर्यंत एकूण 19 जणांचे जबाब

author img

By

Published : Nov 23, 2022, 9:23 AM IST

Shraddha murder case
श्रध्दाच्या तीन मैत्रीणींचे नोंदवले जबाब

श्रध्दा वालकर हत्या प्रकरणाचा ( Shraddha Walker murder case ) तपास करणार्‍या दिल्ली पोलिसांनी मंगळवारी श्रध्दाच्या तीन मैत्रीणींचे जबाब (delhi police recorded her three friends statement ) नोंदवले. या प्रकऱणात आतापर्यंत पोलिसांनी एकूण १९ जणांचे नोंदवले आहे.

मुंबई : श्रध्दा वालकर हत्या प्रकरणाचा ( Shraddha Walker murder case ) तपास करणार्‍या दिल्ली पोलिसांनी श्रध्दाच्या तीन मैत्रीणींचे जबाब (delhi police recorded her three friends statement ) नोंदवले. या प्रकऱणात आतापर्यंत पोलिसांनी एकूण १९ जणांचे नोंदवले आहे. श्रध्दा वालकरच्या हत्येचा तपास करण्यासाठी वसईत आलेल्या दिल्ली पोलिसांनी या हत्येमागील घटनाक्रम त्याचप्रमाणे पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी आफताब आणि श्रद्धाच्या ओळखीच्या लोकांचे जबाब नोंदविणे सुरू ( Starting to register answers of known people ) केले आहे.

वसईतील तपासाचा पाचवा दिवस : मंगळवारी पोलिसांनी श्रध्दाच्या तीन मैत्रीणींचे जबाब नोंदवले. या मैत्रीणी श्रध्दाच्या महाविद्यालयीन मैत्रीणी आहेत. श्रध्दाचा स्वभाव, तिचे आफताबसोबत असलेले संबंध कसे होते, याबद्दल पोलिसांनी जाणून घेतले. आफताब तिच्या आयुष्यात येण्यापूर्वी श्रध्दा एकदम सरळ मार्गी आणि चांगल्या स्वभावाची मुलगी होती, असे या मैत्रीणीने पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत पोलिसांनी एकूण १९ जणांचे जबाब नोंदवले आहे. दिल्ली पोलिसांचा वसईतील तपासाचा पाचवा दिवस होता.

19 जणांचे जबाब नोंदवले : श्रध्दा वालकरच्या हत्याप्रकरणात दिल्ली पोलिसांनी अद्याप 19 जणांचे जबाब नोंदवले. श्रध्दाला २०२० मध्ये झालेल्या मारहाणीसंदर्भात देखील तीन जणांचे जबाब नोंदविण्यात आले. या प्रकरणाचा तपास करून पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलीस सलग पाचव्या दिवशी वसईत तळ ठोकून आहे. आफताबने २०२० मध्ये श्रध्दाला मारहाण केली होती. त्यावेळी ती नालासोपारा येथील ओझॉन रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती. याप्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेच्या मदतीने तिने पोलिसात तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ओझॉन रुग्णालयाचे डॉ शिवप्रसाद शिंदे, तसेच समाजिक कार्यकर्त्या पूनम बिडलान यांचे जबाब नोंदवले. आता नुकतेच पोलिसांनी श्रध्दाच्या तीन मैत्रीणींचे जबाब नोंदवले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.