ETV Bharat / state

Sanjay Raut Claim : निकाल विकत घेण्यासाठी आतापर्यंत 2 हजार कोटी खर्च; खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप

author img

By

Published : Feb 19, 2023, 4:07 PM IST

Updated : Feb 19, 2023, 4:38 PM IST

'निवडणुक आयोगाचा निकाल विकत घेण्यासाठी आतापर्यंत 2 हजार कोटी खर्च करण्यात आल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 'माझ्याकडे पक्की माहिती' असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. निवडणुक आयोगाने दिलेल्या निकालावर शिवसैनिक तसेच संजय राऊत आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. जनता गद्दारांना त्यांची जागा दाखवून देइल असे देखील राऊत म्हणाले.

Sanjay Raut
Sanjay Raut

खासदार संजय राऊत यांचा शिंदे सरकारवर गंभीर आरोप

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाचे सर्वच नेते सध्या आक्रमक झाले असून केंद्र सरकार आणि केंद्रीय यंत्रणा यांच्यावर सडकून टीका करत आहेत. ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते अशी ओळख असलेले खासदार संजय राऊत यांनी आज केंद्रीय निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी शिवजयंतीसह विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला.

प्रवेश फक्त दिल्लीश्वरासाठी ठेवणार का? ज्या शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तिथे आज राज्य सरकारतर्फे मोठ्या जल्लोषात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित असल्याने सामान्य जनतेला इथं प्रवेश नाकारण्यात आला आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं. यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, शिवजयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी होती, लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र करण्यासाठीं उत्सव साजरा केली होती. त्यानंतर राज्यांतील शत्रूविरोधात बाळासाहेब ठाकरे यांनी शिवजयंती साजरी करण्यास सुरवात केली. शिवाजी महाराज नेहमीच गद्दारांबिरोधत लढले. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वसामान्यांचे राजे आहेत. माञ नव्या सरकारने शिवाजी महाराजांपासुन जनेतला तोडण्याचा प्रयत्न करत आहे. जिथं महाराजांचा जन्म झाला त्या शिवनेरी किल्ल्यावर सामान्यांना प्रवेश नसेल तर मग दिल्लीश्वरासाठी ठेवणार आहात का?"

अमित शहांनी तर राजीनामा द्यायला हवा : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्रात सुरू झालेल्या राजकीय वादनंतर शनिवारी दुपारी उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बाहेर येऊन कार्यकर्त्यांची संवाद साधला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर शिंदे गट आणि भाजप नेत्यांकडून टीका करण्यात आली. यावर बोलताना राऊत म्हणाले की, 'टोकाची चाटूगिरी सूरू आहे आणि ते आम्हाला ज्ञान देतायत. आज ही ते घरी जायला तयार नाहीत. त्यांना संरक्षण तुम्ही देऊ शकलेला नाहीत. अमित शाह यांना जर हे माहिती नसेल तर त्यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. हिडेनबर्ग रिपोर्ट, किम जॉर्ज रिपोर्ट आला आहे. 2014 पासुन ईव्हीएम हँक करण्यात आले आहे. एका इस्त्राईल कंपनीला यांनी काँट्रॅक्ट दिलं आहे. यांनी हिडेनबर्ग वरील देखील उत्तर दिलं नाही.'

बिल्डर मित्रांकडून पैशांची मदत : उपस्थित पत्रकारांनी निवडणूक आयोगावर प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, 'माझ्याकडे पक्की माहिती आहे. नगरसेवक विकत घेण्यासाठी 50 लाख देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर आमदार खरेदीसाठी 50 कोटी आणि खासदारांच्या खरेदीसाठी 100 कोटी रूपये देत आहेत. तसेच त्यांनी निवडणुक आयोगाकडून नाव तसेच शिवशेना चिन्ह विकत घेतले आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला. हा कायद्यानुरूप न्याय देण्यात आलेला नाही. हा निकाल विकत घेण्यात आलेला आहे. मला पक्की माहिती आहे. खात्रीशीर माहिती आहे. हा निकाल विकत घेण्यासाठी या 2 हजार कोटी रूपये खर्च करण्यात आले आहे असे देखील राऊत म्हणाले. आता हे मुंबई महाराष्ट्र देखील विकत घेतील अशी टीका देखील त्यांनी केली.

हेही वाचा - Shiv Jayanti 2023 : इतिहासात पहिल्यांदा! आग्र्याच्या किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा, दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री राहणार उपस्थित

Last Updated :Feb 19, 2023, 4:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.