ETV Bharat / state

Shikhar Bank Scam: ईडीकडून घोटाळ्याप्रकरणी दोन चार्जशीट दाखल, राज्यातील बड्या १४ नेत्यांचा समावेश

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 11:07 PM IST

Shikhar Bank Scam ईडीच्यावतीनं आज शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी दोन चार्जशीट दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या 14 नेत्यांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. ईडीच्या आरोपपत्रात प्राजक्त तनपुरे, रणजित देशमुख, अर्जुन खोतकर, समीर मुळे यांच्यासह 14 जणांची नावे आहेत. शिखर बँकेने यापूर्वी मार्चमध्ये एक चार्जशीट दाखल केल्यानंतर ईडीच्या तपासानं वेग घेतला होता.

Shikhar Bank Scam
Shikhar Bank Scam

मुंबई Shikhar Bank Scam : जरांडेश्वर सहकारी साखर कारखाना या प्रकरणात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुमित्रा पवार यांचे नाव जोडण्यात आलं होत. मात्र, अजित पवार यांच्या शपथविधापूर्वी अजित पवार आणि सुमित्रा पवार यांचे नाव वगळण्यात आलं होतं. ईडीच्या आरोपपत्रात राम गणेश गडकरी साखर कारखाना, अहमदनगर प्रकरणी प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी), प्रदीप देशमुख (काँग्रेस), यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल करण्यात आलाय. जालना को-ऑपरेटिव्ह सहकारी बँक लिमिटेड प्रकरणी अर्जुन खोतकर, समीर मुळे, आणि जुगलकिशोर तापडिया यांच्याविरुद्ध आज चार्जशीट दाखल करण्यात आलय. तनपुरे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री होते.

आरोपींमध्ये पिता-पुत्रांसह माजी राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते रणजीत देशमुख, शिवसेना नेते अर्जुनराव पंडितराव खोतकर, बांधकाम व्यावसायिक जुगल किशोर तापडिया आणि उद्योगपती पद्माकर मुळ्ये यांचादेखील समावेश आहे. 24 ऑगस्ट आणि 25 ऑगस्ट रोजी दोन पुरवणी आरोपपत्रे ईडीकडून विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ईडीनं सहकारी साखर कारखाना आणि सहकारी सूत गिरणीमधील कथित घोटाळ्याशी संबंधित आरोपपत्र दाखल केलय.

काय आहे आरोप- 26 ऑगस्ट 2019 रोजी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यानुसार ईडीकडून तपास केला जात आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा 2002 अंतर्गत केलेल्या तपासणीनुसार राम गणेश गडकरी कारखान्याची विक्री कमी किमतीत करण्यात आलीय. ईडीच्या दाव्यानुसार माजी मंत्र्याने कट रचून आणि बेकायदेशीर निधी वळविला आहे. आरोपपत्रात पुढे म्हटले आहे की कारखन्याचा लिलाव झाला तेव्हा प्राजक्त तनपुरे यांचे वडील प्रसाद तनपुरे हे कारखान्याच्या संचालक मंडळावर होते. तर मुलगा प्राजक्त तनपुरे प्रसाद शुगर अँड अलाईड अॅग्रो प्रॉडक्ट्ससाठी बोली लावत होते. प्रसाद तनपुरे यांच्या राजकीय वजनामुळे बँकेचे इतर संचालक आणि तत्कालीन चेअरमन माणिकराव पाटील यांनी लिलावादरम्यान नियम व अटींची अंमलबजावणी करण्यात हस्तक्षेप केला नाही, असा दावा तपास संस्थेने आरोपपत्रात केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.