ETV Bharat / state

Shardiya Navratri 2023 : यंदाच्या नवरात्रीत 'हे' आहेत नऊ रंग; देवी दुर्गा होईल प्रसन्न...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 6:02 PM IST

Updated : Oct 14, 2023, 9:20 PM IST

Shardiya Navratri 2023 : येत्या 15 ऑक्टोबर 2023 पासून शारदीय नवरात्रीला (Shardiya Navratri 2023) सुरुवात होत आहे. नवरात्र (Navratri 2023) हा देवी दुर्गेला समर्पित नऊ दिवसांचा उत्सव असतो. असं मानलं जातं की, नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दररोज वेगवेगळे रंग जोडले जातात. चला तर पाहूया कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत.

Shardiya Navratri 2023  Nine Colours
नवरात्री रंग 2023

मुंबई Shardiya Navratri 2023 : नवरात्रीमध्ये भक्त दररोज दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा (Navratri 2023) करतात. देवीची नऊ रूपं नऊ रंगांचं प्रतिनिधित्व करतात असं मानलं जातं. प्रत्येक रंगाचं स्वतःचं महत्त्व आहे. यामुळचं नवरात्रीत 9 दिवस भाविक वेगवेगळ्या रंगाचे कपडे (Nine Colours In Navratri) घालतात. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापनासोबत शैलपुत्री देवीची पूजा केली जाते.

नवरात्रीचा पहिला दिवस - (नारंगी) : 15 ऑक्टोबर रोजी शैलपुत्री देवीला केशरी रंग आवडतो. केशरी रंग ऊर्जा आणि आनंदाची भावना देतो. केशरी रंगाचे कपडे परिधान केल्याने, ऊर्जा आणि आनंदाची भावना येते. हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला आहे आणि मनाला उत्साही ठेवतो.

नवरात्रीचा दुसरा दिवस - (पांढरा) : 16 ऑक्टोबरला नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवीला समर्पित केला जातो. हा दिवस सोमवारचा आहे. पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचा समानार्थी आहे. देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सोमवारी पांढर्‍या रंगाचे कपडे घाला. पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो.

नवरात्रीचा तिसरा दिवस - (लाल) : 17 ऑक्टोबर रोजी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ असते. लाल रंग हा दुर्गेचा सर्वात आवडता रंग मानला जातो. लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचं प्रतीक आहे. तसंच आईला अर्पण करताना लाल चुनरी खूप लोकप्रिय आहे. हा रंग भक्तांना शक्ती आणि चैतन्य देतो.

नवरात्रीचा चौथा दिवस - (गडद निळा) : 18 ऑक्टोबर हा नवरात्रीचा चौथा दिवस आहे. या दिवशी गडद निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. नवरात्रोत्सवात गडद निळ्या रंगाचा वापर केल्यानं तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल. हा रंग समृद्धी आणि शांतता दर्शवतो.

नवरात्रीचा पाचवा दिवस - (पिवळा) : 19 ऑक्टोबरला पिवळा रंग परिधान करून देवी स्कंदमातेची पूजा करणं खूप शुभ राहील. पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्यानं नवरात्रोत्सवात मन आशावादी आणि आनंदी राहते. हा रंग उष्णतेचे प्रतीक आहे, जो दिवसभर व्यक्तीला प्रसन्न ठेवतो.

नवरात्रीचा साहवा दिवस - (हिरवा) : 20 ऑक्टोबर रोजी माता कात्यायनीची पूजा केली जाईल. या दिवशी भक्तांनी हिरवा रंग परिधान केल्यानं प्रगतीचा मार्ग खुला होईल. हिरवा रंग निसर्ग, समृद्धी आणि विकासाचे प्रतीक आहे. यामुळे सुखी, वैवाहिक जीवन आणि संतती वाढीचे आशीर्वाद मिळतात.

नवरात्रीचा सातवा दिवस - (राखाडी) : 21 ऑक्टोबर रोजी देवी कालरात्रीच्या पूजेसाठी राखाडी रंग परिधान करा. राखाडी रंग संतुलित विचारसरणीचे प्रतीक आहे आणि व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो. हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग पसंत आहे. तर नवरात्रीमध्ये राखाडी रंगाची पूजा केल्याने दुष्टांचा नाश होतो.

नवरात्रीचा आठवा दिवस - (जांभळा) : 22 ऑक्टोबर रोजी जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवी महागौरीची पूजा करा. नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख-समृद्धी प्राप्त होते. हा रंग नवचैतन्याचे प्रतीक आहे. हिंदू धर्मात या रंगाला खूप महत्व आहे. जांभळा रंग मनाची स्थिरता सुधारण्यास तसेच भीतीवर मात करण्यास मदत होते.

नवरात्रीचा नऊवा दिवस - (मोरपिशी) : 23 ऑक्टोबर रोजी महानवमीच्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाईल. मोरपंखी हिरवा रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो. निळ्या आणि हिरव्या रंगाच्या या विशेष मिश्रणाचा वापर केल्यानं दोन्ही रंगांच्या गुणांचा (समृद्धी आणि नवीनता) फायदा होतो.

हेही वाचा -

  1. Chaitra Navratri 2023 : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवसंवत्सरला सुरुवात; राजा बुध आणि मंत्री शुक्राची दोस्ती घेऊन येईल आनंद
  2. Navratri 2023 : नवरात्री म्हणताच आठवतात 'गरबा' आणि 'दांडिया'; जाणून घ्या काय आहे दोघांमधील नेमका फरक..
  3. Mahashivratri : यंदा महाकालेश्वर मंदिरात अशी होणार 'शिव नवरात्री'ची तयारी, आरती-पूजा-दर्शनाची वेळ बदलणार
Last Updated :Oct 14, 2023, 9:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.