ETV Bharat / state

Sharad Pawar Tweet On Sanjay Raut Privilege Motion : संजय राऊतांच्या हक्कभंग समितीला शरद पवारांचा ट्विटरवरून इशारा

author img

By

Published : Mar 2, 2023, 7:52 PM IST

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला थोर मंडळ म्हटले. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले. अखेर भाजप आमदारांकडून संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला गेला. तक्रारदारासच न्यायाधीश म्हणून नियुक्त केले. तर न्यायाची अपेक्षा कशी करता येईल? असे ट्विट करत शरद पवार यांनी याबाबत आक्षेप नोंदवला आहे.

Sharad Pawar Tweet On Sanjay Raut Case
शरद पवार

मुंबई: यासंदर्भात हक्कभंग समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र हक्कभंगाची कारवाई करण्यासाठी ज्या आमदारांकडून मागणी करण्यात आली त्याच आमदारांना समितीत स्थान देण्यात आल्याने या समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्षेप घेतला आहे. संजय राऊत यांनी ‘ही' जी बनावट शिवसेना आहे, डुप्लीकेट, चोरांचं मंडळ, चोरमंडळ, हे विधिमंडळ नाही चोरमंडळ आहे, असे हे विधान केले. विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्यामुळे खासदार राऊत यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव मांडला गेला आहे. जाणकारानुसार लोकशाही व्यवस्थेतील विधिमंडळ हे जनतेचे सर्वोच्च प्रतिनिधी मंडळ आहे. म्हणून त्याची मान-प्रतिष्ठा राखली गेलीच पाहिजे. यात दुमत असण्याचे कारण नाही.

  • श्री. संजय राऊत हे देशातील सर्वोच्च विधिमंडळ अर्थात भारतीय संसदेतील राज्यसभेचे ज्येष्ठ व सन्माननीय सदस्य आहेत. त्यांवरील कोणत्याही प्रस्तावित कारवाईपूर्वी भारतीय संसदेतील सदस्यांवर अशी कारवाई करण्याबाबतची विधिग्राह्यता तसेच मार्गदर्शक सूचना या बाबी बारकाईने तपासून घ्यावयास हव्या.

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) March 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संजय राऊत यांचे विधान विशिष्ट गटाविषयी: प्रस्तावित हक्कभंगाच्या कारवाईबाबत नव्याने गठीत केलेली हक्कभंग समिती स्वायत्त व तटस्थ स्वरूपाची असणे अपेक्षित होते. खासदार संजय राऊत यांचे विधान ऐकले. यावरून त्यांच्या म्हणण्याचा रोख दिसून येतो. खासदार संजय राऊत यांचे विधान मूलत: विशिष्ट गटाविषयी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आहे. संजय राऊत यांनी जे विधान केले त्या विधानाचा विग्रह न करता ते एकत्रितरीत्या वाचले अथवा ऐकले असता विधानाचा अन्वयार्थ स्पष्ट होतो, असे शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

  • तसेच ज्या सदस्यांनी सभागृहात हक्कभंगाची मागणी केली एवढेच नव्हे तर श्री. संजय राऊत यांच्यावर कडक कारवाईची आग्रही मागणी केली त्या तक्रारदार सदस्यांचा हक्कभंग समितीत समावेश झाला. हे म्हणजे तक्रारदारासच न्यायाधीश म्हणून नियुक्त केले.. तर न्यायाची अपेक्षा कशी करता येईल?

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) March 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">


हक्कभंग समितीत समावेश: वसंतदादा पाटील यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील सरकारवर ‘अलीबाबा-चाळीस चोरांचे सरकार’ अशी टीका-टिप्पणी विरोधकांकडून झाली होती. तसे बधितल्यास अशा प्रकारची टीका विधिमंडळाबाबत कधी ही समर्थनीय नाही. परंतु प्रकरण संयमाने हाताळावयास हवे . संजय राऊत यांनी केलेले विधान विधिमंडळाबाबत होते की, विशिष्ट गटाबद्दल होते याचा त्यांनी केलेल्या विधानाचा एकत्रितरीत्या विचार व्हावा. यासाठी हक्कभंग समितीतील सदस्य नि:पक्षपाती, ज्येष्ठ असावेत. याबाबत आवश्यक काळजी घेणे गरजेचे होते. ज्या सदस्यांनी सभागृहात हक्कभंगाची मागणी केली. खासदार संजय राऊत यांच्या विधानाला घेऊन यांच्यावर कडक कारवाईची आग्रही मागणी करण्यात आली आहे.

न्यायाची अपेक्षा कशी करता येईल ? तक्रारदार यास न्यायाधीश म्हणून नियुक्त केले असेल तर न्यायाची अपेक्षा कशी करता येईल ? असा प्रश्न ही शरद पवार यांनी विचारला आहे. खासदार संजय राऊत हे सर्वोच्च विधिमंडळ अर्थात भारतीय संसदेतील राज्यसभेचे ज्येष्ठ व सन्माननीय सदस्य असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यांवरील कोणत्याही प्रस्तावित कारवाईपूर्वी भारतीय संसदेतील सदस्यांवर अशी कारवाई करण्याबाबतची विधिग्राह्यता तसेच मार्गदर्शक सूचना या बाबी बारकाईने तपासून घ्यावयास हव्यात, असे आपले ट्विटमध्ये शरद पवार यांनी नमूद केल आहे.

राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल: खासदार संजय राऊत यांनी शिवगर्जना मेळाव्यातून पुन्हा एकदा शिंदे गटावर हल्लाबोल केला. चंद्रदीप नरकेसह अलीबाबा आणि चाळीस चोर हे टेस्ट ट्यूब बेबी आहेत असे संजय राऊत म्हटले. स्मशानात जाताना 50 खोके नेणार आहात का? असा सवालही त्यांनी कोल्हापूर येथे एका सभेत उपस्थित केला होता.

संजय राऊत यांची विखारी टीका: संजय पवार महाराष्ट्राला शिवसेनेवरच्या निष्ठेसाठी माहीत आहेत. आपल्या सर्वांचा जन्म शिवसेनेत झाला आहे. माझ्या आयुष्यातील 40 वर्ष शिवसेनेसोबत गेली. आज माजी ओळख आहे, ती शिवसेना या चार शब्दांमुळे, असे म्हणत टेस्ट ट्यूब बेबी लोकांकडे लक्ष देऊ नका, अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्ला चढवला. माणसाला जगायला किती पैसे लागतात? स्मशानात जाताना 50 खोके नेणार आहात का? असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती.

हेही वाचा: MP Udayanraje Bhosale On Koyna Electricity Project : कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी कोयनेची वीज बंद करू; उदयनराजे भोसलेंचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.