ETV Bharat / state

Sharad Pawar reaction on Manipur Viral Video : केंद्र सरकारने मणिपूरमध्ये लवकर शांतता प्रस्थापित करावी - शरद पवार

author img

By

Published : Jul 20, 2023, 12:19 PM IST

मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन राजकारण तापले आहे. विरोधक केंद्र सरकारवर याप्रकरणावरुन टीका करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मणिपूर प्रकरणी ट्विट करत केंद्रावर टीका केली आहे. पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय गृहमंत्रालयाने मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यास पावले उचलावीत असे शरद पवार म्हणाले आहेत.

मणिपूरच्या घटनेवर शरद पवारांची प्रतिक्रिया
मणिपूरच्या घटनेवर शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबई : जातीय हिंसाचाराच्या आगीत होरपळून निघणाऱ्या मणिपूरमध्ये घृणास्पदाचा कळस गाठला आहे. मणिपूरमधील दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरत संतापाची लाट पसरली आहे. मणिपूरच्या या घटनेवरून देशातील राजकारण तापले आहे. या प्रकरणावरुन विरोधक मोदी सरकारवर टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने आणि केंद्रगृह मंत्रालयाने लवकरात लवकर पावले उचलायला हवीत.

काय म्हणाले शरद पवार : शरद पवार यांनी केंद्र सरकावर टीका केली आहे. "एकजूट होण्याची, आपला आवाज उठवण्याची आणि मणिपूरच्या लोकांना न्याय देण्याची वेळ आली आहे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी गृह विभागाने तातडीने आवश्यक कारवाई करणे आवश्यक आहे, असे शरद पवार यांनी ट्विट केले आहे.

  • खालापूर येथील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळण्याची घटना अत्यंत दुःखद आहे. या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांवर अस्मानी संकट कोसळलं आहे. पीडितांच्या दुःखात सहभागी आहोत.

    राज्य शासनाला विनंती आहे की, संबंधित घटनेच्या ठिकाणी युद्धपातळीवर आपत्कालीन बचाव कार्य राबवून…

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) July 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांचा हवाला देत पवार यांनी ट्विट केले आहे. "मानवतेशिवाय तुमचा गौरव व्यर्थ आहे." मणिपूरमधील विशेषत: महिलांवरील अत्याचार, जे "घृणास्पद" आहे, ते विचलित करणारे दृश्य पाहून दुःख झाले. - शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

मणिपूर की बात' करा- मणिपूरच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मणिपूरमधील परिस्थितीवर त्वरीत कारवाईची करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.मणिपूरमधील धक्कादायक दृश्ये - त्रासदायक, लज्जास्पद आणि पूर्णपणे अमानवीय वागणूक! ही परिस्थिती तात्काळ कारवाईची मागणी करते" "चला आपला आवाज उठवू आणि जबाबदारीची मागणी करूया. अशा अत्याचारांसमोर मौन बाळगणे हे अस्वीकार्य आहे!" असे ट्विट त्यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्यात मन की बात हा रेडिओ कार्यक्रम करत असतात. त्यावर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लेडे क्रिस्टो यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. 'मन की बात' पुरे झाली, आता 'मणिपूर की बात' करा. असे हिंदीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लेडे क्रिस्टो यांनी ट्विट केले आहे.

  • Without humanity, your glory is worthless.
    - B. R. Ambedkar

    Distressing to see disturbing visuals from Manipur specially the atrocities against the women, which is despicable.
    It’s time to unite, raise our voices, & demand Justice for the people of #Manipur. Home department…

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) July 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

इरशाळगडाच्या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी इरशाळगडाच्या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. खालापूर येथील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळण्याची घटना अत्यंत दुःखद आहे. या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांवर अस्मानी संकट कोसळलं आहे. पीडितांच्या दुःखात सहभागी आहोत.राज्य शासनाला विनंती आहे की, संबंधित घटनेच्या ठिकाणी युद्धपातळीवर आपत्कालीन बचाव कार्य राबवून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या गावकऱ्यांना सुखरूपपणे सुस्थितीत बाहेर काढावे, असे ट्विट केले आहे.

मणिपूर हिंसाचार : दरम्यान महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार उसळला आहे. दोन गटातील समुदायमध्ये हिंसाचार सुरू आहे. एका गटातील दोन महिलांना दुसऱ्या गटातील पुरुषांनी नग्न केले आणि त्यांची धिंड काढली. या महिलांवर अत्याचार करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. याप्रकरणी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांविरुद्ध थौबल जिल्ह्यातील नॉन्गपोक सेकमाई पोलीस स्टेशनमध्ये अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -

  1. NCP political crisis: राष्ट्रवादीत होत आहे ड्रामा, पहा स्पेशल रिपोर्ट
  2. NCP MLAs Meet Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांनी दुसऱ्यांदा घेतली शरद पवारांची भेट; 'हे' आहे भेटीमागचे कारण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.