ETV Bharat / state

Sharad Pawar On INDIA Bharat Contravesry: गेटवे ऑफ इंडियाला काय म्हणायचं- शरद पवारांचा थेट मोदींना प्रश्न

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 10:07 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले. त्यानंतर दोन्ही गटांकडून पक्षावर दावा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज अपात्रतेच्या नोटीसनंतर बोलावलेली पहिलीच बैठक होती. बैठकीला आजी माजी आमदारसंह जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. बैठकीला मार्गदर्शन करतांना शरद पवारांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. मोदींना विचारावे गेटवे ऑफ इंडियाला काय म्हणावं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. मिळालेल्या माहितीनुसार सोडून गेलेल्या विरोधात जोरदार प्रचार करण्याच्या सूचना देखील शरद पवारांनी दिल्या आहेत.

Sharad Pawar
शरद पवार

मुंबई : भारत आणि इंडिया हा इश्यु का निर्माण केलाय, हेच मला समजतं नाही, असं शरद पवार म्हणालेत. जी 20 कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान यांच्या नावापुढे भारत नाव लिहिलं होतं. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांनी विधानसभेमध्ये एक ठराव केलाय की, इंडियाऐवजी भारत म्हणायचं. हा ठराव एक मतानं मंजूर झालाय. मात्र, ठरावाविरोधात एकच पक्ष विरोधात होता. त्याने सभात्याग केला, तो पक्ष भाजपा होता. 2004 चा ठरावा माझ्याकडे आहे. भारत नावाला विरोध करण्याचं काम ज्यांनी केलंय, ते आज त्या प्रश्नावरून वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. इंडिया की भारत हे घटनेच्या पहिल्याच ओळीत स्पष्ट होतंय.

मोदी सरकारला सवाल : मोदी सरकारनं इंडिया नावाने किती योजना आणल्या. गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारा फलक आहे, मग त्याला काय म्हणायचं असं सवाल मोदी सरकारला पवारांनी विचारलाय. जी 20 परिषदेची बैठक यापूर्वी भारतात दोन वेळा झाली. मात्र, अशा प्रकारच्या भव्यता आणि दिव्यतेचा वापर करून यनिमित्तानं मूलभूत प्रश्नऐवजी काही ठराविक लोकांचा प्रचार करण्यासाठी त्याचा वापर केला जातोय. देशातील सध्या महत्त्वाच्या गोष्टींना बाजूला ठेवून आपल्याला हवे ते वातावरण तयार करायचे. येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत पावले टाकायचे. या देशातील सामान्य माणसाचं हित, महागाई, बेरोजगार यासह कोणत्याच प्रश्नाकडे राज्यकर्ते बघत नाही, असं ते म्हणालेत.



निवडणूक आयोगाचा निर्णय अंतिम : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले की, राजकारणात पहिली निवडणूक काँग्रेसकडून लढून माझ्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. या दरम्यान मी सहा प्रकारचे वेगवेगळे चिन्हं घेऊन निवडणूक लढलो, आणि लोकांनी निवडून दिलं. अजित पवार गटाचं नाव न घेता ते म्हणाले की, जुन्या माणसांकडून सातत्याने सांगितलं जातंय की, पक्ष नाव आणि पक्ष चिन्हं आम्हालाच मिळेल. यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात चलविचल सुरू होते. मात्र काही काळजी करण्याची गरज नाही. निवडणूक आयोगावर याबाबत कोणती टीका टिप्पणी करायची नाही, तो जे निर्णय देतील अंतिम आहे. शिवसेनेच्या काही लोकांना ज्याप्रमाणे त्यांच्याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला, तसाच निर्णय घेतला जाऊ शकतो असं त्यांच्या मनात आहे, असंही शरद पवार यांनी म्हटलंय.




कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करायची संधी : आज खऱ्या अर्थानं पुन्हा प्रस्थापित व्हायला एक नवीन संधी मिळालीय. नवीन कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करायची संधी मिळाली आहे. लोकांना फोडाफोडीचे राजकारण आवडतं नाही. देशाच्या पंतप्रधान यांनी भोपाळच्या सभेत पक्षावर हल्ला केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्ट पक्ष असं म्हणतात, काही दिवसातच ज्यांच्यावर आरोप केलेत, त्यांनाच सोबत घेतात. याचा अर्थ ते किती तत्वनिष्ठ आहेत, हे लक्षात येतं.


राज्यातील जनतेत अस्वस्थता : गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या राज्याच्या विविध भागात सभा पार पडल्या. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. आपण भाषण काय करतो, याकडे लक्ष देत असताना मी बोलत असताना जनतेच्या डोळ्यात बघत असतो. ते सांगत असतात की, आपलं बोलण कितपत पचतंय, समजतंय. मला आलेल्या अनुभवावरून जे घडलंय त्यामुळं राज्यातील जनतेत एकप्रकारची अस्वस्थता दिसतेय. सत्ता हातात घ्यायची आणि त्याला पाठिंबा केंद्रातून द्यायचा हे लोकांना मंजूर नाही, हे लोकांच्या चेहऱ्यावर दिसत असल्याचं शरद पवार म्हणालेत.



मराठा आरक्षण प्रश्न : राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय. तातडीनं जालना येथे जाऊन टोकाची भूमिका घेऊ नका, असं त्यांनी सांगितलंय. त्यातून मार्ग काढावा लागंल. मार्ग काढायचा असेल तर 50 टक्क्याचं बंधन आहे, त्यापुढं जावं लागेल. मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर 16 टक्के आरक्षण वाढवलं तर सर्वांना आरक्षण मिळू शकते. मात्र न्यायालयाचं स्पष्ट म्हणणं आहे की, 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नाही. मात्र तामिळनाडू राज्यानं हे 74 टक्क्यापर्यंत आरक्षण दिलं आणि ते टिकलं. केंद्राने ठरवलं तर 14-15 टक्के आरक्षण देऊन हा प्रश्न कायमचा निकाली निघू शकतो, मग का काढत नाही. मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागू नये असं काही लोकांनं वाटतं का? लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा असं, आवाहन शरद पवार यांनी केलंय.


शाहू, फुले, आंबेडकर : आपण नव्या लोकांनी संधी देऊ शकतो. पुन्हा एकदा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांने चालणारं राज्य आहे. उगाच मराठा कुणबी या गोष्टी करण्याचं कारण नाही, असं सल्लाही पवारांनी सरकारला दिलाय. सगळ्यांना समान न्याय द्यायचं धोरण राज्यकर्त्यांनी स्वीकारलं, तर महाराष्ट्र शांत व्हायला काही वेळ लागणार नाही. पण त्यांच्या मनात हे आहे की नाही, अशी शंका येतेय, असंही पवार म्हणालेत.

हेही वाचा :

  1. Supriya Sule Criticize BJP : आघाडीच्या इंडिया नामांतरणाने केंद्रातील सत्ताधारी गोंधळले - सुप्रिया सुळे
  2. Prithviraj Chavan Interview : 'भारत' म्हणायचं की 'इंडिया'? काँग्रेसची काय भूमिका? जाणून घ्या पृथ्वीराज चव्हाणांकडून
  3. Prakash Ambedkar : 'इंडिया की भारत' ही भाजपाची खेळी अन् खेळीला विरोधक पडले बळी - प्रकाश आंबेडकर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.