ETV Bharat / state

NCP Anniversary in Delhi: शरद पवारांनी अखेर भाकरी फिरविली, सुप्रिया सुळे यांच्यासह प्रफुल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड

author img

By

Published : Jun 10, 2023, 1:28 PM IST

Updated : Jun 10, 2023, 2:23 PM IST

सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्रासह हरियाणा व पंजाबची जबाबदारी सोपविली आहे. अद्याप शरद पवारांनी अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी दिलेली नाही.

NCP Anniversary in Delhi
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिना

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त मोठी घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे व प्रफुल पटेल यांच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याचे पवार यांनी जाहीर केले आहे.भाजपकडून अल्पसंख्यांकामध्ये दहशत निर्माण केली जात आहे. भाजकडून सत्तेचा गैरवापर होत आहे. सत्ताधारी सत्ताधारी धर्मांधतेचा प्रचार करत असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी भाषणात केली आहे.

सुनील तटकरे यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीपस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मध्य प्रदेश, गुजरात, गोवा राजस्थान व झारखंडची जबाबदारी पटेल यांच्याकडे सोपविली आहे. राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या खासदारांच्या समन्वयाची जबाबदारी पटेल यांच्याकडे सोपविली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत पक्षसंघटना, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे…

    — Supriya Sule (@supriya_sule) June 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शरद पवारांनी दिला होता अध्यक्ष पदाचा राजीनामा:राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आत्मचरित्र प्रकाशनावेळी राजीनामा दिला होता. त्यानंतर कार्यकर्ता व नेत्यांवर पक्षाच्या नेत्यांनी आग्रह केल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला होता. तेव्हा राष्ट्रवादीमध्ये कार्यकारी अध्यक्ष पदाची स्थापना होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, त्याबाबत शरद पवार यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. राज्यात अजित पवार व केंद्रात अजित पवार यांच्याकडे पक्षाची जबाबदारी सोपविली जाईल, अशीही चर्चा होती. दुसरीकडे पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी आपण इच्छुक नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते. तर आगामी निवडणुकीसाठी काम करण्याची सुप्रिया यांची इच्छा असल्याचे राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी म्हटले होते. मात्र, अचानक आज वर्धापनदिनालाच पक्षात मोठे बदल झाले आहेत. या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार आदी नेते उपस्थित राहिले.

राष्ट्रवादीचा आज 25 वा वर्धापनदिनराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 24 वर्ष पूर्ण होऊन पक्षाने आज 25 व्या वर्षात पदार्पण केले आहे. राष्ट्रवादीचे नेते आज दिल्लीत वर्धापन दिन कार्यक्रमाला हजर आहेत. या कार्यक्रमात शरद पवार यांनी पक्षात मोठे फेरबदल केले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी वेगळी रणनीती आखल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 10 जून 1999 रोजी करण्यात आल्यानंतर पक्षाने राज्याच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजाविली आहे. राष्ट्रीय काँग्रेसमधून सोनिया गांधींच्या इटालियन वंशाच्या मुद्यावरुन प्रश्न उपस्थित केल्याने शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर यांना पक्षातून काढण्यात आले. त्यानंतर तिन्हीन नेत्यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाभारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला. अत्यंत कमी कालावधीत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा इतिहासातील पहिला पक्ष ठरला आहे.

हेही वाचा-

  1. NCP Anniversary : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेला 24 वर्षे पूर्ण, कायमच सत्तेच्या आसपास राहणारा पक्ष म्हणून आहे ओळख!
  2. NCP Silver Jubilee Anniversary : राष्ट्रवादीचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन, पक्षाची राष्ट्रीय कामगिरी ते राज्य पातळीवर घसरण...
  3. Sharad Pawar : जिवे मारण्याच्या धमकीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Last Updated :Jun 10, 2023, 2:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.