ETV Bharat / state

अर्ध्या महाराष्ट्राची तहान भागवणारे मुख्यमंत्री म्हणजे शंकरराव चव्हाण, मधुकर भावेंनी दिला आठवणींना उजाळा

author img

By

Published : Jul 14, 2020, 6:04 AM IST

शंकरराव चव्हाण यांचा जन्म १४ जुलै १९२० ला पैठण येथे झाला होता. आज त्यांना १०० वर्ष पूर्ण होत आहेत. हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त आम्ही ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांची विशेष मुलाखत घेतली.

senior journalist madhukar bhave  madhukar bhave on shankarrao chavan  shankarrao chavan birth anniversary  shankarrao chavan work  शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी  शंकरराव चव्हाण कार्य  शंकरराव चव्हाणांबाबत मधुकर भावे
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांची विशेष मुलाखत

मुंबई - माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या बांधणीत खूप मोठे योगदान राहिले आहे. त्यांचे सर्वात मोठे योगदान हे जलसंपत्तीचे आहे. 14 हून अधिक मोठी धरणे बांधून त्यांनी अर्ध्या महाराष्ट्राची तहान भागवली. जायकवाडी, विष्णुपूरी आदी धरण त्यांच्याच कार्यकाळात उभी राहिली आणि या धरणांमुळे वाळवंट होण्यापासून मराठवाडा वाचले. म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचे भगीरथ म्हटले जायचे, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

अर्ध्या महाराष्ट्राची तहान भागवणारे मुख्यमंत्री म्हणजे शंकरराव चव्हाण, मधुकर भावेंनी दिला आठवणींना उजाळा

माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप 14 जुलै रोजी होत असून त्या पार्श्वभूमीवर मधुकर भावे यांनी चव्हाण यांच्या कामकाजाची शैली तसेच त्यांच्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले की, अर्ध्या महाराष्ट्राची तहान शंकरराव चव्हाणांनी भागवली होती. राज्यात जी 31 महाकाय धरणे आहेत, त्यापैकी उजनी, जायकवाडी आदी 14 धरणे ही त्यांच्या कार्यकाळात उभी राहिली. जायकवाडी येथे त्यांचे स्मारक आहे. हे धरण उभे राहात असताना लवादासमोर 22 आक्षेपांना शास्त्रीय पद्धतीन उत्तरे देण्यात आली होती, असेही मधुकर भावे म्हणाले.

शंकरराव चव्हाण हे 1975मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते, दहा वर्षे पाटबंधारे खात्यासह इतर अनेक मोठ्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. शंकरराव चव्हाण यांच्या कामाची एक शैली होती. मोरारजी देसाईंनंतर बरोबर 10 वाजता मंत्रालयात येऊन काम सुरू करणारे ते दुसरे मुख्यमंत्री होते. प्रशासनाला शिस्त लावण्याचे काम त्यांनी केले. म्हणून लोकांनी त्यांना टिंगल म्हणून हेडमास्तर, मास्तरही म्हणायचे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून पाहिले पाहिजे, त्यांनीच सचिवालयांचे 'मंत्रालय' करून घेण्याचा निर्णय घेतला हेाता. सचिव यांच्यापेक्षा मंत्र्याचे स्थान मोठे आहे, हे त्यांनी याद्वारे दाखवून दिले, अशी माहितीही भावे यांनी दिली.

वैधानिक मंडळांना त्यांनी विरोध केला होता. या मंडळांचा वापर राजकीय कामासाठी होऊ नये, अशी त्यांची भूमिका होती. त्यांनी त्यावेळी या मंडळाच्या संदर्भात त्यावेळी शब्द काढले होते, आज ते खरे ठरले आहेत, असे सांगून ते म्हणाले, पुलोदच्या सरकारमध्ये त्यांनी एक साधे मंत्रीपद स्वीकारले होते. त्यासाठी मी माझ्या 'यशवंतराव ते विलासराव' या पुस्तकात लिहीले आहे, त्यांनी मी या ठिकाणी जायला नको होते, हे मान्य केले होते.

वसंतदादा पाटील यांच्यासोबत त्यांचे वाद झाले असतील, पण ते एकमेकांचे विरोधक नव्हते. म्हणूनच त्यांनी शंकराराव चव्हाण यांना मुंबईत त्यावेळी घर दिले होते. शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील हे मनाचे मोठेपणा असलेले नेते होते, असेही मधुकर भावे यांनी सांगितले.

मी त्यांच्यासोबत पंजाबमधे फिरलो होतो, त्यावेळी निवडणुका घ्यायच्या की नाही, यावर मी हजार मुलाखती, असे सांगून भावे म्हणाले, त्यांनी मंत्रिमंडळातून अंतुले यांना वगळले होते. परंतु त्यांना पुन्हा जवळ करण्यात मी भूमिका बजावली होती. दोन्ही नेते एकत्र आले होते. नांदेडच्या पोटनिवडणुकीत अंतुले यांनी शंकररावांना मदत केली आणि त्यांनतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली होती.

दहा विधेयके अशी आहेत, ती केंद्राला स्वीकरावी लागली. शंकरराव चव्हाण यांच्या काळात त्यांनी बारमाही पाण्याचा आणि जायकवाडी धरणाचा विषय मार्गी लावला हेाता. त्यांचे महानपण हे त्यांनी केलेल्या अनेक कामात होते अशी माहितीही ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.