ETV Bharat / state

Sanjay Raut : फडणवीसांचा मक्का मदीना दिल्लीत पण, शिंदे गटाची दिल्तीत मुजरा घालून गुलामी - संजय राऊत

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने दिल्लीवारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. बाळासाहेबांचे नाव घेता आणि मोदी-शाहंकडे का जाता? फडणवीसांचं ठीक आहे, त्याचे मक्का मदिना दिल्लीत आहे, तुमचं काय? अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Jun 5, 2023, 12:13 PM IST

Updated : Jun 5, 2023, 3:03 PM IST

मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने दिल्लीवारी करत आहेत. रविवारी सुद्धा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीला जाऊन रात्री अमित शहा यांची भेट घेतली. तब्बल 2 तास अमित शहा यांच्याशी दोघांनी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. शिंदे गट भाजपची गुलामी करत असल्याची टीका राऊत यांनी केली. यासोबतच ओरिसा येथे झालेल्या रेल्वे अपघातावरुन देखील खासदार राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

  • #WATCH | Earlier the high command was in Maharashtra but now Shinde's high command is in Delhi. He talks about Balasaheb and Shiv Sena but does 'Mujra' in Delhi. The real Shiv Sena never bowed down before anyone. It's been a year but cabinet expansion has not been done, this… pic.twitter.com/oeJnMj2mJp

    — ANI (@ANI) June 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

खोटी आश्वासने आणि मोठ्या बाता बंद करा : संजय राऊत मुंबईतील आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, "ओडिशा येथे जी काही दुर्घटना घडली त्यात अनेकांनी आपला जीव गमावला. या दुर्घटनेची आता सीबीआय चौकशी करण्याची मागणी होत आहे. मात्र, या ट्रेन दुर्घटनेची सीबीआय चौकशी करून काय साध्य होणार? खोटी आश्वासने आणि मोठ्या बाता बंद करा. बुलेट ट्रेनची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व धावपळ सुरू आहे. पण ज्या सध्या गाड्या सुरू आहेत, त्या ट्रेन व्यवस्थित चालवा. आता बोलयतायत, हा घातपात होता. मग तुमची यंत्रणा काय करत होती? इतकी मोठी दुर्घटना घडली ही रेल्वे मंत्र्यांची जबाबदारी नाही का? इतिहास कढून बघा, ज्यांच्या कारकिर्दीत असे भयानक अपघात झाले त्यांनी राजीनामा दिला आहे. यांनी केवळ याचा इव्हेंट केला., अशा भाषेत राऊतांनी मोदी सरकारवर टीका केली.

मोदी सर्व प्रचार बनवला : पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "सीबीआय चौकशी हा वेळकाढूपणा आहे. आहे ती रेल्वेसेवा सुधारा, कर्ज काढून बुलेट ट्रेन आणू नका. रेल्वे हे एक खेळणे बनले आहे. दर आठ दिवसांनी इकडे हिरवा झेंडा, तिकडे हिरवा झेंडा दाखवण्याचे काम सुरू आहे. मोदींनी हे प्रचाराचे साधन बनवले आहे. ओडिशा येथे जी काही दुर्घटना झाली या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 300 लोकांना कफन टाकायला कपडा मिळाला नाही. याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे.

सर्वांनी एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात हीच भूमिका : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आता तोंडावर आहेत. या निवडणुकीत शिवसेनेने आपल्याला साथ द्यावी, अशी आपुलकीची साद राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी घातली आहे. यावरही त्यांनी उत्तर दिले आहे.

"मुंबई मनपात शिवसेनेचीच ताकद आहे. त्यामुळे फक्त मुंबई महापालिकाच नाही तर आगामी लोकसभा, विधानसभा आणि ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत देखील सर्वांनी एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात हीच आमची भूमिका आहे. अजित पवार जे काही म्हणालेत त्याचा आम्ही निश्चितच सकारात्मक विचार करू. अजितदादा काय किंवा महाविकास आघाडी काय, एकत्र येऊन भाजपचा पराभव हेच आमचं ध्येय आहे, आमची वज्रमूठ आहे. - संजय राऊत ठाकरे गट खासदार

मग दिल्लीला मुजरा का करता? : मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. यावरून देखील खासदार राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे देखील मुख्यमंत्री होते पण ते फक्त एकदाच दिल्ली दौऱ्यावर गेले. त्यानंतर जे काही निर्णय होते ते त्यांनी महाराष्ट्रातच घेतले. प्रत्येक वेळी दिल्लीला गेले नाहीत. तुम्ही स्वतःला खरी शिवसेना म्हणून होता मग दिल्लीला मुजरा का करता? पूर्वी आमचे कंट्रोलरूम येथेच होते. आता येथील निर्णय घ्यायला लोकांना दिल्लीला जावे लागत आहे. तुमच्याकडे खरी शिवसेना आहे असे बोलता ना? मग दाखवा की हिंमत महाराष्ट्रातले निर्णय महाराष्ट्रातच घेण्याची. ही नकली शिवसेना आहे, यांना प्रत्येक गोष्टीला परवानगी लागते. बाळासाहेबांचे नाव घेता आणि मोदी-शाहंकडे का जाता? फडणवीसांचं ठीक आहे, त्याचे मक्का मदिना दिल्लीत आहे, तुमचं काय? , अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Politics: आगामी निवडणुका एकत्रितपणे लढणार, बहुमताने जिंकणार- दिल्ली दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचा दावा
  2. Sanjay Raut Vs Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचे सिंहासन लवकर हलणार-संजय राऊत

Last Updated : Jun 5, 2023, 3:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.