ETV Bharat / state

Restaurant on Wheel :अद्भूत! रेल्वेच्या जून्या डब्यांचे हॉटेलमध्ये रूपांतर; दिडलाख ग्राहकांनी घेतला जेवणाचा आस्वाद

author img

By

Published : Oct 26, 2022, 1:27 PM IST

रेल्वेच्या वापरात नसलेल्या डब्यांना हॉटेलचे रूप देण्यात आले ( Old Railway Coaches Converted Into Hotel ) आहे. दिडलाख ग्राहकांनी या हॉटेलच्या जेवणाचा आस्वाद घेतला आहे. नागपूर व सीएसएमटी नंतर आता आकुर्डी चिंचवड, मिरज बारामतीत देखील रेस्टॉरंट ऑन व्हील सुरू होणार आहे.

Restaurant on Wheel
रेस्टॉरंट ऑन व्हील

मुंबई : जुनाट आणि मोडीत काढलेल्या रेल्वेच्या डब्याना हॉटेलमध्ये रूपांतर केले ( Old Railway Coaches Converted Into Hotel ) आहे. रेल्वे ने ग्राहक आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. प्राथमिक पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नागपूरला मिळालेला ग्राहकांचा प्रतिसाद पाहता आता इतर चार ठिकाणी असे फिरते अद्ययावत भोजनालय तथा 'रेस्टॉरंट ऑन व्हील' ( Restaurant on Wheel ) सुरू केली जाणार आहे.

Restaurant on Wheel
रेल्वेच्या जून्या डब्यांचे हॉटेलमध्ये रूपांतर

यशस्वी, नाविन्यपूर्ण संकल्पना : मध्य रेल्वेवरील “रेस्टॉरंट ऑन व्हील” एक यशस्वी, नाविन्यपूर्ण संकल्पना आहे. यामुळे प्रवाशांचे चांगले जेवण आणि सोय उपलब्ध झाल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. मध्य रेल्वेने याआधीच मुंबई आणि नागपूर स्थानकांवर विनाभाडे महसूल योजनेअंतर्गत ( Free revenue plan ) ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरू केले आहेत. प्रकल्पाचे यश पाहून मध्य रेल्वे लवकरच आकुर्डी, चिंचवड, मिरज आणि बारामती या चार स्थानकांवर रेस्टॉरंट ऑन व्हील सुरू करणार आहे. मध्य रेल्वेवर असेच प्रकल्प उभारण्यासाठी CR ने इतर 7 ठिकाणे देखील निश्चित केली आहेत.

Restaurant on Wheel
रेल्वेच्या जून्या डब्यांचे हॉटेलमध्ये रूपांतर

जुनाट रेल्वेच्या डब्यांचे हॉटेलमध्ये रूपांतर : रेस्टॉरंट ऑन व्हील हे रेल्वे डब्याचे सुधारित रूप आहे. जे जेवणासाठी एक अनोखा अनुभव देणारे उत्तम जेवणाचे ठिकाण आहे. या कोचमध्ये टेबलांसह 40 पेक्षा जास्त ग्राहकांना सामावून घेते. रेस्टॉरंट ऑन व्हीलचे आतील भाग अशा प्रकारे सजवले गेले आहे की , लोक रेल्वे-थीम असलेल्या सेटिंगमध्ये जेवणाचा अनुभव घेऊ शकतात. सीएसएमटी आणि नागपूर येथील रेस्टॉरंट ऑन व्हील्स हे या क्षेत्रातील एक महत्त्वाची खाण्यापिण्याची घरे बनली आहेत. ज्यात अनुक्रमे 1,25,000 अभ्यागत आणि 1,50,000 अभ्यागत आहेत ज्यांनी रेस्टॉरंट सुरू झाल्यापासून आजपर्यंत या रेस्टॉरंट्समध्ये जेवणाचा आनंद घेतला आहे.

आकुर्डी, चिंचवड, मिरज, बारामती : आता, मध्य रेल्वेने आकुर्डी, चिंचवड, मिरज आणि बारामती या चार स्थानकांवर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि लोकमान्य टिळक टेमिनस, कल्याण, लोणावळा, नेरळ, इगतपुरी, दादर आणि माथेरान अश्या 7 ठिकाणी ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ उभारण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी ए के सिंग यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.