ETV Bharat / state

phone tapping case : फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांची चौकशी पुर्ण

author img

By

Published : Mar 23, 2022, 1:39 PM IST

Updated : Mar 23, 2022, 4:16 PM IST

वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS officer Rashmi Shukla) यांच्याविरोधात फोन टॅपिंग प्रकरणात (phone tapping case) कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये दुसऱ्यांदा दाखल झाल्या. 16 मार्च रोजी देखील त्यांची चौकशी करण्यात आली होती. आज पुन्हा त्यांची चौकशी झाली. या प्रकरणात त्यांची चौकशी पुर्ण झाल्याची माहिती आहे.

रश्मी शुक्ला

मुंबई: रश्मी शुक्ला यांची या आधी चौकशी झली त्यानंतर त्यांनी त्यांच्या वकिलांची भेट घेतली होती.आज पुन्हा त्यांची चौकशी होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये आल्या. त्यांची चौकशी पुर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर पुणे येथे फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल आहे. कुलाबा येथील गुन्हा संदर्भात अटकपूर्व जामिनासाठी रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यावेळी न्यायालयाने रश्मी शुक्ला यांना अंतरिम दिलासा देताना पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. त्याच वेळी न्यायालयाने चौकशीच्या तारखा घोषित केल्या होत्या त्यानुसार आज त्या हजर झाल्या आहेत. राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केले असा त्यांच्यावर आरोप आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन टॅप केल्या प्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात भारतीय टेलिग्राफ ऍक्टच्या कलम 26 तसेच भादवि कलम 166 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. अपर पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱयाच्या तक्रारीवरून रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जून 2019 मध्ये अनिष्ठ राजकीय हेतूने या दोन्ही नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅप झाल्याचे एफआयआरमध्ये नमूद केले आहे. टेलिग्राफ ऍक्टनुसार राष्ट्रीय सुरक्षा अथवा मोठा गुन्हा रोखण्याच्या हेतूने फोन टॅपिंग केले जाते. परंतु असे कोणतेही ठोस कारण नसताना शुक्ला यांनी या दोन्ही नेत्यांचे फोन टॅप का केले त्यामागचे कारण स्पष्ट होत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यात देखील सर्वात प्रथम फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फोन टॅपिंग प्रकरणात दाखल झालेली एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यासाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने 25 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यास सांगितले होते. फोन टॅपिंग प्रकरणी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यातील बंड गार्डन पीएस येथे गुन्हा दाखल आहे. फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने अहवाल सादर केला त्यात रश्मी शुक्ला या दोषी आढळल्या नंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात होता.

हेही वाचा : Nandkishor Chaturvedi: नंदकिशोर चतुर्वेदी भारतातून पसार, ईडीकडून शोध सुरू

Last Updated : Mar 23, 2022, 4:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.