ETV Bharat / state

नागपूर : महिलेची व्हरांड्यातच प्रसूती, बाळ दगावले; रुग्णालय कर्मचाऱ्यांनी दाखल करून न घेतल्याचा आरोप

author img

By

Published : Sep 7, 2021, 9:30 AM IST

नागपूर
नागपूर

नागपुरातील डागा रुग्णालयाच्या व्हरांड्यातच राणी वासनिक या महिलेची प्रसूती झाली. मात्र, त्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. राणी यांच्या कुटुंबियांनी बाळाच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालय कर्मचाऱ्यांना जबाबदार धरलं आहे. कारण, राणी यांना रुग्णालय कर्मचाऱ्यांनी तत्काळ दाखल करून घेतले नाही. दीड तास ताटकळत ठेवले, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

नागपूर : नागपुरातील डागा रुग्णलायतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 27 वर्षीय महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या आतील भागात व्हरांड्यात झाली आहे. यानंतर संबंधीत महिलेचे बाळ दगावले असल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात पोहचून सुद्धा तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी महिलेला दाखल करुन घेतले नाही. त्यामुळे सुमारे दीड तास ती गरोदर महिला ताटकळत राहिली. यामुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला जात आहे. राणी वासनिक असे प्रसूती झालेल्या त्या 27 वर्षीय महिलेचे नाव आहे.

डागा रुग्णालयाच्या व्हरांड्यातच महिलेची प्रसूती

अनेक रुग्णालयात धावाधाव

नागपूर जिल्ह्यातील वाडी परिसरातील हे वासनिक कुटुंब आहे. प्रसूतिपूर्वी राणी नागपूर जिल्ह्यातील कन्हान या ठिकाणी आपल्या माहेरी गेलेल्या होत्या. सोमवारी रात्री लेबर पेन सुरू झाल्यामुळे स्थानिक कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. यावेळी तिथे त्यांना दाखल न करून घेता कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयातूनही त्यांना नागपूर शहरातील डागा रुग्णालयात हलवण्यात आले.

कुटुंबीयांचा रुग्णालय कर्मचाऱ्यांवर आरोप

पण डागा रुग्णालयात पोहचून सुद्धा डागा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी लागलीच दाखल करुन घेणे अपेक्षित असताना दुर्लक्ष केले. यामुळे दवाखान्याच्या व्हरांड्यातच राणी यांची प्रसुती झाली आणि मग धावा धाव सुरू झाली. पण बाळ मात्र वाचू शकले नाही. कुटुंबीयांचा आरोप आहे, की 'रुग्णालयातील कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे बाळ दगावले आहे'. दरम्यान रुग्णालय प्रशासनाकडून यासंदर्भात कुठलीही माहिती किंवा स्पष्टीकरण मिळू शकलेले नाही.

हेही वाचा - भारतातील हिंदु, मुस्लिमांचे पूर्वज एकच - मोहन भागवत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.