ETV Bharat / state

Phone tapping case : राऊत खडसेंचे फोन समाजकंटक म्हणुन टॅप केल्याचा खुलासा, राऊतांची पुन्हा टीका

author img

By

Published : Apr 20, 2022, 11:31 AM IST

शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांचे फोन टॅप ( Raut Khadse's phone was tapped) झाल्याचे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. त्याची चौकशीही सुरु आहे. यातच राऊत आणि खडसे यांचे नाव समाजकंटकांच्या यादीत आल्यामुळे त्यांचे फोन टॅप ( as a anti-social element) केल्याचे मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) म्हणले आहे. त्यावर संजय राऊतांनी पुन्हा टीका (Raut criticized again) केली आहे.

Raut, Khadse
राऊत, खडसें

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या फोन टॅपींग प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी म्हणले आहे, तपासादरम्यान असे आढळून आले आहे की, राज्य गुप्तचर विभाग (State Intelligence Department) च्या पत्रात इतर काही नावे असामाजिक घटक म्हणून नमूद करण्यात आली होती. फोन टॅपिंगसाठी ही नावे एसीएस होमला पाठवण्यात आली होती, म्हणूनच एसीएसने यासाठी परवानगी दिली, त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा फोन 67 दिवस टॅप करण्यात आला तर शिवसेना नेते संजय राऊत यांचा फोन 60 दिवस टॅप करण्यात आला.

  • During the investigation, it was found, that some other names were mentioned as anti-social elements in State Intelligence Dept (SID) letter which was sent to ACS Home for phone tapping that's why the ACS gave the permission for the same: Mumbai Police

    — ANI (@ANI) April 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान या नंतर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा टीका केली आहे. त्यांनी म्हणले आहे की, राज्य गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी 2019 मध्ये सरकार स्थापनेदरम्यान आम्हा सर्वांचे फोन असामाजिक घटक म्हणून टॅप केले असे खोटे लेबल लावले आहे. आमच्या गोपनीयतेचा भंग झाला आहे. एका पक्षासाठी काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना केंद्र संरक्षण देत आहे.

  • The then SID commissioner Rashmi Shukla falsely labelled all of us whose phones were tapped as anti-social elements during govt formation in 2019. Our privacy was breached. Centre giving protection to such police officers who're working for one party: Shiv Sena leader Sanjay Raut pic.twitter.com/uOHXoE9dWM

    — ANI (@ANI) April 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.