पोलिसांनी मला चार तास घरी डांबून ठेवलं - किरीट सोमैया

author img

By

Published : Sep 19, 2021, 9:35 PM IST

Updated : Sep 19, 2021, 10:32 PM IST

kirit somaiya

चार तासानंतर आपल्या वकिलांनी पोलिसांना नोटीस दाखवल्यानंतर पोलिसांनी आपल्याला ऑर्डर दाखवली. त्या ऑर्डरमध्ये कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी किरीट सोमैयांना कोल्हापूरला जिल्हा बंदी असल्याच त्यांनी सांगितले आहे. पोलिसांनी आपल्याला गणेश विसर्जनातदेखील सामील होऊन बाप्पाचे दर्शनही घेऊन दिले नाही, असा आरोपही सोमैयांनी केला.

मुंबई - भाजपा नेते किरीट सोमैयांनी पोलिसांनी आपल्याला चार तास स्वतःच्या घरात डांबून ठेवले असल्याचा आरोप केला आहे. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता पोलिसांनी राज्य सरकारच्या आदेशावर आपल्याला घरात स्थानबद्द केले आहे, असा आरोप सोमैयांनी केला. चार तासानंतर आपल्या वकिलांनी पोलिसांना नोटीस दाखवल्यानंतर पोलिसांनी आपल्याला ऑर्डर दाखवली. त्या ऑर्डरमध्ये कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी किरीट सोमैयांना कोल्हापूरला जिल्हा बंदी असल्याच त्यांनी सांगितले आहे. पोलिसांनी आपल्याला गणेश विसर्जनातदेखील सामील होऊन बाप्पाचे दर्शनही घेऊन दिले नाही, असा आरोपही सोमैयांनी केला. तसेच पोलिसांनी केलेल्या कारवाईत बाबत आपण न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.

भाजपा नेते किरीट सोमैया माध्यमांशी बोलताना

ठाकरे सरकारने आपल्यावर कितीही बंदी घालण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील आपण ठाकरे सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा किरीट सोमैयांनी दिला आहे. तसेच आपण कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरला जाणार असल्याचेही किरीट सोमैयांनी सांगितले. गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दर्शन घेण्यासाठी किरीट सोमैया गिरगाव चौपाटीवर पोहोचले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत.

हेही वाचा - सुरक्षा पुरवू शकत नसल्याने कोल्हापुरात न येण्याची सोमैया यांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस

हसन मुश्रीफांच्या दुसऱ्या घोटाळ्याचा पर्दाफाश करणार -

महाविकास आघाडी सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेला दुसरा घोटाळा आपण समोर आणणार असल्यामुळे आपल्याला कोल्हापूर जिल्हाबंदी केले असल्याचा आरोप किरीट सोमैयांनी केला आहे. याआधी 127 कोटी रुपयांचा घोटाळा हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून केला असल्याचा थेट आरोप पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांनी केला होता.

Last Updated :Sep 19, 2021, 10:32 PM IST

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.