ETV Bharat / state

... आता आग नाही लावली म्हणजे झालं, दिवे लावण्याच्या कल्पनेवरुन मोदींवर सोशल मीडियावर टीका

author img

By

Published : Apr 3, 2020, 4:23 PM IST

दिवे लावण्याच्या कल्पनेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सोशल मीडियावर टीका होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई - येत्या रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटे दिवे लावून सामूहिक शक्ती दाखवा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे कोरोनाशी लढणाऱ्या देशातील जनतेला केले आहे. मात्र, यावर विविध स्तरातून टीकेची झोड उठली आहे.

ट्विटरवर '#ये आदमी पागल हो चुका है', 'मोदी मदारी बंदर कौन, अशा प्रकारे ट्रेंडच सुरू झाला आहे. तर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी मोंदीवर टीका करण्यास सुरूवात केली आहे.

महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत मोदींवर टीका केली. ते म्हणाले, भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली,एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत. कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही, असे भाषण मोदींकडून अपेक्षित होते. तर त्यांनी ह्या संकटाचाही इव्हेंट करायचे ठरवले म्हणे... अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका, असे म्हणत त्यांनी टीका केली.

  • भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली,एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत.कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही. असे भाषण मोदींकडून अपेक्षित होते.
    तर त्यांनी ह्या संकटाचाही इव्हेंट करायच ठरवल
    म्हणे... अंधार करा आणि बॅटरी पेटवा.
    देशाला इतकेही मुर्खात काढू नका. pic.twitter.com/ZDOgvQDzPK

    — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, थाळी-टाळी कार्यक्रमानंतर दिवे लावायला सांगत आहेत. हे देशाचे पंतप्रधान म्हणून वागणार आहेत का..?, देशाचे प्रमुख म्हणून निर्णय घेणार आहे का..? असे सवाल उपस्थित केला.

  • थाळी-टाळीनंतर आता दिवे लावण्याचा कार्यक्रम सादर होत आहे. देशाला इव्हेंटची नव्हे तर रुग्णालयं, व्हेंटिलेटर #COVIDー19 चाचणी लॅबची गरज आहे. हातावर पोट असलेले मजूर व कामगारांना दोन वेळचं जेवण हवं आहे. त्यामुळं @PMOIndia हे प्रसिद्धी स्टंट बंद करून काहीतरी ठोस पावलं उचला.@INCIndia pic.twitter.com/bqQjFn5RBC

    — Balasaheb Thorat (@bb_thorat) April 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही टीका केली. ते म्हणाले, मोदींच्या भाषणातून केवळ निराशा मिळाली आहे. मला, वाटले होते पंतप्रधान मोदी गरीबांची चुल कशी पेटेल याबाबत बोलतील. पण, त्यांनी केवळ दिवेच पेटवायला सांगितले, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनीही टीका केली.

  • 👏👏टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा लोकांनी रस्त्यावर येऊन ढोल वाजवले होते
    आता आग 🔥नाही लावली म्हणजे झालं. 😅
    साहेब कामाचं आणि लोकांच्या
    पोटा पाण्याचं बोलां.

    — Sanjay Raut (@rautsanjay61) April 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अभिनेत्री तापसी पन्नु ट्वीट करत म्हणाली, हे नविन टास्क आहे.

  • New task is here ! Yay yay yayy !!!

    — taapsee pannu (@taapsee) April 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी देखील पंतप्रधानांच्या भाषणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'विषाणूचा प्रसार रोखणे, तपासणी किट्स, गरिबांना जेवण पोहोचविणे, गरिब-मजुरांना आर्थिक मदत करणे अशा मुद्द्यांवर काहीही ऐकायला मिळाले नाही. दिवा हा एखाद्या उद्देशासाठी पेटवा, अंधश्रद्धेसाठी नाही.'

  • Modiji

    Learnt nothing about government’s steps to

    1) contain the virus
    2) protect our medical practitioners
    3) provide testing kits
    4) reach food and supplies to the poor
    5) finance migrant labour , the jobless

    Light the ‘ Diya ‘ of reason
    Not that of superstition !

    — Kapil Sibal (@KapilSibal) April 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.