ETV Bharat / state

Covid Update : राज्यात ऑक्सिजन बेडची संख्या 34 हजार तर व्हेंटिलेटर सुसज्ज बेडची संख्या 9900

author img

By

Published : Dec 29, 2022, 9:36 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या ताज्या माहितीनुसार एकूण रुग्णालय संख्या 1436आहे. तर एकूण विलगिकरण बेडची संख्या 33,475 आहे. ऑक्सिजन बेडची संख्या 34,143 आहे आणि इन्सेंटिव्ह केअर युनिट ज्याला आय सी यु बेड्सची संख्या 9964 इतकी आहे. (Covid Update) शिवाय व्हेंटिलेटर बेडची संख्या 6,818 अशी आहे.

मुंबई : राज्यांमध्ये एकूण उपलब्ध डॉक्टर 27,442 आहेत त्यापैकी कोविड प्रशिक्षित असलेले डॉक्टर संख्या 16,351 एवढी आहे. राज्यात एकूण उपलब्ध असलेल्या नर्स 41 हजार 566 आहेत त्यापैकी प्रशिक्षित असलेल्या नर्स संख्या 34,641आहेत. राज्यात उपलब्ध आरोग्य कर्मचारी 18,896 आहेत. (number of beds equipped with ventilators ) तर त्यापैकी प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी 16,849 एवढे आहेत. आयुष विभागातील एकूण डॉक्टर्स 3,989 एवढे आहेत. त्यापैकी प्रशिक्षित असलेले डॉक्टर 3,459 इतके आहेत.

प्रयोगशाळांच्या संदर्भात - राज्यामध्ये उपलब्ध आरटीपीसीआर किड्स पाच लाख 37 हजार 748 इतके आहेत. तर उपलब्ध रॅपिड अँटीजन किड्स 44 लाख 50 हजार 215 आणि उपलब्ध रुग्णवाहिका एकूण संख्या 2,017 आहेत ह्या प्रमाणे प्रयोगशाळा मधील भौतिक सुविधा अद्ययावत आहे.

संदर्भ सेवा याप्रमाणे आहेत - बेसिक लाईफ सपोर्ट सिस्टीम 1218 इतके तयार आहेत.तर ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट किट्स 442 आहेत. इतर सपोर्ट किट 410 आहेत. ऑक्सिजन सिलेंडर 80 हजार 584 कार्यरत आहेत. शिवाय पीएसआय प्लांट 596 तयार आहेत.लिक्विड ऑक्सिजन साठवणूक टॅंक 593 आहेत.तसेच मेडिकल गॅस पाईपलाईन सिस्टीम 8,518 इतक्या सोयी आहेत.

दहा टक्के तरतूद दरवर्षी करायला हवी - या संदर्भात डॉक्टर अभिजीत मोरे आम आदमी पक्षाचे आरोग्य विभागाचे अभ्यासक यांनी सांगितले की," दोन वर्षापेक्षा यावर्षी सार्वजनिक इस्पितळांमधील व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन बेड इतर संदर्भ सेवा यामध्ये सुधार दिसत आहे. मात्र, ही व्यवस्था पुरेशी नाही. जर चीन सारखी लाट आपल्याकडे आलीच आणि ती येऊ शकते. याचे कारण सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही मजबूत नाही आणि म्हणून प्रचंड ताण सरकारी आणि खाजगी दोघं आरोग्य व्यवस्थेवर होतो. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर एकूण अर्थसंकल्पाच्या दहा टक्के तरतूद दरवर्षी करायला हवी त्याच्याशिवाय सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट होणार नाही."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.