ETV Bharat / state

Jayant Patil On Ajit Pawar Group : अजित पवार गटाच्या 24 आमदारांना शरद पवार गटाकडून नोटीस

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2023, 9:44 PM IST

Jayant Patil On Ajit Pawar Group
Jayant Patil On Ajit Pawar Group

अजित पवार गटाच्या 24 आमदारांना पात्रतेबाबत शरद पवार गटाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रया दिलीय.

जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी पक्षावर दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरही दावा केला जात असतांना शरद पवारांनी वेगळी खेळी करत अजित पवार गटाला गोंधळून टाकले आहे. शरद पवार गटाकडून अजित पवार गटाच्या 24 आमदारांना पात्रतेसंदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीस पाठवलेल्या अजित पवार गटाच्या आमदारांना विषयी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.


पुनर्विचार नाही : आमच्या पक्षानं धोरणात्मक निर्णय घेतला आहे. अपात्रतेबाबत आमदारांना नोटीस बजावली आहे. त्यातील काही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं या आमदारांबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आत्ताच आम्ही नोटीसबाबत विचार केलेला आहे. त्यामुळं पुनर्विचाराचा प्रश्न येणे हा सर्वात मोठा विनोद आहे. आम्ही विचार करूनच अपात्रतेची नोटीस दिलेली आहे. त्यामुळं पुनर्विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

सरकारी कंत्राटी भरतीचा निषेध : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीनं भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानं सरकारविरोधात नाराजी आहे. यावर शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केलीय. तसंच त्यांनी राज्य सरकरानं घेतलेल्या निर्णयाचा निषेध केलाय.

सरकारनं घेतलेला निर्णय चुकीचा : कायमस्वरूपी सरकारी कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवता येतो. कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारचा भरोसा ठेवता येणार नाही. कंत्राटी पद्धतीनं नोकर भरती करणं निषेधार्य आहे. तात्पुरत्या, मर्यादित कामासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर नेमणुक करण्यास हरकत नाही. मात्र, सरकारनं घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय.

आरक्षण संपवण्याचा डाव : राज्यातील शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाईल, असं शिक्षण विभागानं जाहीर केलंय. सरकारनं आता बाह्य यंत्रणेकडून शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतलाय. शिक्षक आता कंत्राटदारांकडून घेतले जाणार असल्यानं त्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. हा आरक्षण संपवण्याचा डाव असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar Uddhav Thackeray Meeting: उद्धव ठाकरे-शरद पवार यांच्या भेटीत काय चर्चा झाली? जयंत पाटील म्हणाले...
  2. Chitra Wagh on Uddhav Thackeray : ...म्हणून उद्धव ठाकरे यांना विदूषकाचा पोषाख भेट देणार-चित्रा वाघ
  3. Manoj Jarange News: ४० वर्षे दिले आता एक महिना आणखी देऊन पाहू-मनोज जरांगे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.