ETV Bharat / state

अँटिलिया जिलेटिन प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही; गुंड सुभाषसिंग ठाकूरचे स्पष्टीकरण

author img

By

Published : Apr 4, 2021, 5:36 PM IST

Antilia Subhash Singh Thakur Relation
अँटिलिया सुभाषसिंग ठाकूर प्रकरण

अँटिलिया प्रकरणात उत्तर भारतातील कुख्यात गुंड सुभाषसिंग ठाकूर याचे नाव पुढे आले आहे. यावर अँटिलिया जिलेटिन प्रकरणात आपला कोणताही प्रकारचा सहभाग नाही आणि आपण टेलिग्राम संदेश पाठविला नसल्याचे स्पष्टीकरण सुभाषसिंग ठाकूर याने आपल्या वकिलामार्फत प्रेस नोट जारी करून दिले आहे.

मुंबई - अँटिलिया प्रकरणात उत्तर भारतातील कुख्यात गुंड सुभाषसिंग ठाकूर याचे नाव पुढे आले आहे. यावर अँटिलिया जिलेटिन प्रकरणात आपला कोणताही प्रकारचा सहभाग नाही आणि आपण टेलिग्राम संदेश पाठविला नसल्याचे स्पष्टीकरण सुभाषसिंग ठाकूर याने आपल्या वकिलामार्फत प्रेस नोट जारी करून दिले आहे. ठाकूर यांचे वाराणसीतील वकील जालंदर राय यांच्या मार्फत मुंबईतील त्याचे वकील के.एम. त्रिपाठी यांनी ही प्रेस नोट जारी केली.

Antilia Case Subhash Singh Thakur Press Note
प्रेस नोट

हेही वाचा - जेष्ठ अभिनेत्री शशिकला जवळकर यांचे निधन

काय आहे प्रकरण?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एका स्कॉर्पिओ वाहनात जेव्हा जिलेटिनच्या कांड्या मिळाल्या, तेव्हा या प्रकरणात जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेचे नाव समोर आले होते. धमकीचे पत्र याच संघटनेने ठेवल्याची माहिती देखील समोर आली होती. हे पत्र यूएई (युनायटेड अरब अमिरात) येथून पाठवल्याची माहिती मिळाली. मात्र, नंतर एक माहिती समोर आली की, तिहाड कारागृहात एका तहसीन नावाच्या दहशतवाद्यामार्फत हे धमकीचे पत्र पाठवण्यात आले. मग या सगळ्या प्रकरणात गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर याचे नाव समोर आले. मात्र, ठाकूर याच्या वकिलाने एक प्रेस नोट जारी करत ठाकूरचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. वकिलाकडून हे देखील स्पष्ट करण्यात आले की, सचिन वाझे आणि सुभाषसिंग ठाकूर यांची कोणतीही भेट झाली नाही. तसेच, तहसीन नावाच्या कोणत्याही व्यक्तीला ओळखत नसल्याचे वकिलाकडून स्पष्ट करण्यात आले.

Message
मेसेज

कोण आहे सुभाषसिंग ठाकूर ?

सुभाषसिंग ठाकूर एक कुविख्यात गुंड आहे. याचा दाऊदशी जवळचा संबंध असल्याचे बोलले जाते. सुभाष सिंग ठाकूरवर हत्या, अपहरण, खंडणी असे अनेक आरोप आहेत. ठाकूर सध्या वाराणसी येथील कारागृहामध्ये कैद आहे.

सुभाषसिंग ठाकूर याचा या प्रकरणाशी काय संबंध ?

आरोप असा होता की, एका माजी पोलीस अधिकाऱ्याने ठाकूर याच्याशी संपर्क साधून जैश-उल-हिंदच्या नावे खोटा टेलिग्राम पोस्ट करायला लावला आणि ही पोस्ट यूएई (युनायटेड अरब अमिरात) येथून अपलोड करायला लावली. मात्र, ही पोस्ट चुकून तिहाड कारागृहातून अपलोड झाल्याचे बोलले जाते. मात्र, या प्रकरणात सुभाष ठाकूर याच्या वकिलाने सर्व आरोप फेटाळले आहेत.

हेही वाचा - मुंबईत पुन्हा लॉकडाऊनची शक्यता; मुंबईकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.