ETV Bharat / state

संजय राऊतांविरुद्ध 'ते' वक्तव्य करणं नितेश राणेंना अंगलट; माझगाव दंडाधिकाऱ्यांनी काढलं जामीनपात्र वॉरंट

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2023, 8:49 AM IST

Warrant Against BJP MLA Nitesh Rane
Warrant Against BJP MLA Nitesh Rane

Warrant Against BJP MLA Nitesh Rane : खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणात समन्स बजावूनही अनुपस्थित राहणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्या नावे माझगाव दंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी जामीनपात्र वॉरंट काढलंय. यामुळं नितेश राणेंना आता 15 डिसेंबर रोजी व्यक्तिशः हजर राहावं लागणार आहे.

मुंबई Warrant Against BJP MLA Nitesh Rane : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणात समन्स बजावूनही अनुपस्थित राहणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्या नावानं माझगाव दंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी जामीनपात्र वॉरंट काढलंय. त्यामुळं आमदार नितेश राणे यांना पुढील सुनावणीच्या वेळी उपस्थित राहून जामीन घ्यावा लागणार आहे.

नितेश राणेंनी काय केल होत वक्तव्य : खासदार संजय राऊत आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यात दररोज कोणत्या ना कोणत्या विषयावरुन आरोप प्रत्यरोप होत असतात. अशातच भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांबद्दल एक खळबळजनक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप येणार आहे. येत्या 10 जूनपर्यंत संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असं वक्तव्य नितेश राणे यांनी 7 मे रोजी केलं होतं. त्यांच्या या व्यक्तव्यावर आक्षेप घेऊन राऊत यांनी राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता. याची दखल घेऊन न्यायालयानं राणे यांना 16 ऑक्टोबर रोजी समन्स बजावून न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, मंगळवारच्या सुनावणीला राणे न्यायालयात अनुपस्थित राहिले. त्यामुळं न्यायालयानं राणे यांच्या नावे जामीनपात्र वॉरंट काढलंय.

  • Mumbai court issued a bailable warrant of Rs 15,000 against BJP MLA Nitesh Rane in connection with a defamation complaint lodged against him by Uddhav Thackeray Faction leader Sanjay Raut. Further hearing to take place on 15th December (21/11)

    — ANI (@ANI) November 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

स्पिड पोस्टानं पाठवलं समन्स : न्यायालयानं बजावलेलं समन्स आपल्याला अद्यापपर्यंत मिळालेलं नाही, असा दावा राणेंच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. मात्र, समन्स स्पीड पोस्टद्वारे पाठवण्यात आल्याचं न्यायालयानं सांगत त्याकडे लक्ष वेधलं. तसंच, एक महिना आणि पाच दिवस उलटूनही आपल्याला समन्स मिळालं नसल्याच्या राणे यांच्या दाव्याबाबत न्यायालयानं आश्चर्य व्यक्त केलं. त्याचवेळी, राणे यांच्या नावे काढण्यात येणारं जामीनपात्र वॉरंट त्यांच्या कणकवली येथील घरी स्पीड पोस्टनं पाठविणार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय. यामुळं 15 डिसेंबर रोजी आमदार नितेश राणे यांना व्यक्तिशः हजर राहावं लागणार आहे.

हेही वाचा :

  1. Sanjay Raut vs Nitesh Rane : नितेश राणे-संजय राऊत टीका करताना 'कमरेखाली' घसरले, काढली एकमेकांची 'अंतर्वस्त्र'
  2. Nitesh Rane On Sanjay Raut : ... तर संजय राऊतांना त्यांच्या पत्रकार परिषदेत जाऊन प्रश्न विचारणार; नितेश राणेंचा इशारा
  3. Nitesh Rane on Kolhapur Riot : दंगलीमागे उद्धव ठाकरेंचा हात त्यांची नार्को टेस्ट करा सत्य बाहेर येईल : आमदार नितेश राणे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.