ETV Bharat / state

Special Discount For New Year : नववर्षाचे स्वागत जल्लोषात, 'या' व्यवसायाला मिळाली नवसंजीवनी, हॉटेल - रेस्टॉरंट मध्ये विशेष सूट...

author img

By

Published : Dec 31, 2022, 2:23 PM IST

Special Discount For New Year
हॉटेल - रेस्टॉरंट मध्ये विशेष सूट

नव वर्षाच्या स्वागतासाठी (New Year) आणि मज्जा करण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी मुंबई नगरी फुलुन गेलेली आहे. समुद्र किनारी वेगवेगळ्या बिचेसवर पर्यटकांचा आनंद ओसंडून वाहात आहे. यामुळे दोन वर्षांपासुन तोट्यात असलेल्या हॉटेल आणि रेस्टॉरेंट व्यवसायाला परत एकदा नवसंजीवनी (Hotel And Restaurant Rejuvenated) मिळाली आहे, असे म्हणटल्यास वावगे ठरणार नाही. तर ग्राहकांना देखील हॉटेल आणि रेस्टॉरेंट (Hotels And Restaurants) मध्ये विशेष सुट (Special Discounts To Customers) दिली जात आहे. Special Discount For New Year

प्रतिक्रिया देतांना हॉटेल संघटनेचे उपाध्यक्ष

मुंबई : तब्बल २ वर्षांनी सर्व नियम झुगारुन आनंदाने आणि उत्साहाने नवीन वर्षे (New Year) साजरं केलं जात आहे. नवीन वर्षाच्या स्वागता साठी आणि नववर्षाचा आनंद लुटण्यासाठी देश व जगभरातून लाखो पर्यटक मुंबईत येतात. या पर्यटकांना व मुंबईकरांना या नववर्षाचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी मुंबईतील तारांकित व पंचतारांकित हॉटेलने (Hotels And Restaurants) सुद्धा विविध आकर्षक सुविधा दिल्या (Special Discounts To Customers) आहेत. तर दोन वर्ष करोनामुळे तोट्यात गेलेला पर्यटन व्यवसाय यंदा तेजीत (Hotel And Restaurant Rejuvenated) असल्याने, या व्यवसायावर अवलंबून असलेले छोटे-मोठे व्यवसायिक ही आनंदात आहेत. Special Discount For New Year

Hotel
Hotel


खान पानावर आकर्षक सूट : नववर्षाच्या स्वागतासाठी सायंकाळपासूनच मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि ढाबे गर्दीने फुलून जातात. रस्त्या-रस्त्यांवर तरुणाईचा सायंकाळपासून सुरू झालेला जल्लोष रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. दिवसेंदिवस – फोफावत चाललेला चंगळवाद सण, उत्सव रात्री नववर्षाच्या स्वागताप्रसंगी प्रकर्षाने जाणवत असतो. आणि या सर्व बाबी हेरूनच हॉटेल व्यवसायिकांनी मॉकटेल, कॉकटेल सह जेवणावरही आकर्षक सूट दिली असल्याची माहिती हॉटेल असोसिएशनची उपाध्यक्ष प्रीतम सिंग गोहनिया यांनी दिली आहे. तसेच करोनाचे सावट दूर झाले असले, तरीसुद्धा खबरदारी उपाययोजना म्हणून आम्ही एकाच हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होऊ देणार नाही, याची दक्षता सुद्धा घेणार आहोत. त्याचबरोबर करोना नियमांचे पूर्ण पालन सुद्धा केलं जाईल,असेही त्यांनी सांगितलं आहे.

Hotel
Hotel



छोटे व्यवसाय करणाऱ्यांचा ही धंदा तेजीत : तसेच करोनामुळे दोन वर्षे पर्यटन स्थळे ओस पडली होती. मागील दोन वर्ष स्थानिक तरुण महिला बचत गटाच्या माध्यमातून चौपाटी, समुद्रकिनाऱ्यावर छोटे मोठे व्यवसाय करणारे नारळ पाणी, पाणीपुरी, वडापाव इतर खाद्यपदार्थ, तसेच घोडा गाडी फेरी, उंट फेरी, लहान मुलांसाठी मोटर बाईक व्यवसाय करणारे फार चिंतेत होते. मात्र यावर्षी करोनाचे सावर दूर झाल्याने नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी किनाऱ्यावरील पर्यटन स्थळी धाव घेतल्याने या सर्वांसाठी सुगीचे दिवस आले आहेत.



हॉटेल रूम आणि रेस्टॉरंट असा दुप्पट व्यवसाय : पर्यटकांनी गेट ऑफ इंडिया येथे मोठ्या प्रमाणामध्ये मागील दिवसांपासून गर्दी केली आहे. अनेक जण कुटुंबासह आल्यावर गेट वे येथून बोटीने समुद्रात फेरफटका मारण्याचा आनंद लुटण्यासाठी येतात. त्यातून जल पर्यटनासाठी मागील काही दिवसांपासून गेट वे वर रांगाच रांगा असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर नरिमन पॉईंट, वांद्रे, जुहू चौपाटीवर सुद्धा पर्यटकांची गर्दी झालेली आहे. पर्यटनाला चांगले दिवस आल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांचाही चांगला व्यवसाय होत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा हॉटेल रूम आणि रेस्टॉरंट यांचा दुप्पट व्यवसाय झाला आहे. पर्यटनातील वाढीमुळे यंदा हॉटेलच्या रूमच्या दरामध्ये २० ते ५० टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष प्रदीप शेट्टी यांनी दिली आहे. Special Discount For New Year

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.