ETV Bharat / state

Sheena Bora murder case : शीना बोरा हत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट, शीनाची हत्या खरंच झाली का ? जर झाली तर नेमकी कधी झाली ? , वाचा..

author img

By

Published : Nov 2, 2022, 8:58 PM IST

राज्यातील शीना बोरा हत्याकांड प्रकरणात ( Sheena Bora murder case ) पुन्हा नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. राहुल मुखर्जीचा उलट तपासणी दरम्यान इंद्राणी मुखर्जी चे वकील रणजीत सांगळे यांनी उघड केले ( Shocking information in the cross examination of Rahul Mukherjee ) आहे. शीना बोराच्या हत्यानंतर देखील दोन महिने शीना बोराला मासिक वेतन मिळाले असल्याचा मेसेज आणि मेसेजवरील संभाषण राहुल मुखर्जीच्या मोबाईल मध्ये आढळून आल्याचा धक्कादायक खुलासा इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांच्या वतीने करण्यात आला. यामुळे पुन्हा या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. उद्या, पुन्हा राहुल मुखर्जी यांची उलट तपासणी करण्यात येणार आहे.

Sheena Bora murder case
शीना बोरा हत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट

मुंबई : राज्यातील शीना बोरा हत्याकांड प्रकरणात ( Sheena Bora murder case ) पुन्हा नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. राहुल मुखर्जीचा उलट तपासणी दरम्यान इंद्राणी मुखर्जी चे वकील रणजीत सांगळे यांनी उघड केले ( Shocking information in the cross examination of Rahul Mukherjee ) आहे. शीना बोराच्या हत्यानंतर देखील दोन महिने शीना बोराला मासिक वेतन मिळाले असल्याचा मेसेज आणि मेसेजवरील संभाषण राहुल मुखर्जीच्या मोबाईल मध्ये आढळून आल्याचा धक्कादायक खुलासा इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांच्या वतीने करण्यात आला. यामुळे पुन्हा या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. उद्या, पुन्हा राहुल मुखर्जी यांची उलट तपासणी करण्यात येणार आहे.

सुनावणी दरम्यान आली माहिती समोर - इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजीत सांगळे यांच्या उलटतपासणीत उत्तर देतांना राहुल मुखर्जी गडबडला होता. सरकारी रेकॉर्डवर असलेल्या पूराव्यांच्या आधारे वकील सांगळे यांनी पुरावे सादर करत धक्कादायक पुरावे खुलासा केला आहे. राहुल आणी शीना यांच्यातील रिकव्हर मोबाईल कॉल्स आणी मेसेजेस यावर आधारीत माहिती आणि वास्तविक माहिती यात तफावत असल्याचे उघड झाले आहे. पोलीस रेकॉर्डवरील FIR आणि सुनावणीत शीनाची हत्या झाल्याचा दिनांक 24 एप्रिल 2012 आहे. तर राहुल आणी शीनाच्या मेसेज संभाषणात शीनाला मिळालेला पगार मेसेज सप्टेंबर 2012 आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यात राहुल आणि शीना यात अनेकवेळा मेसेजद्वारे संभाषण झाले होते. मार्च 2013 मध्येही दोघांत संवाद असल्याचा तांत्रिक पुरावा इंद्राणीच्या वकिलांनी आज न्यायालयात सादर केला आहे.



मुलगी शीना जिवंत असल्याचा इंद्राणीचा दावा - शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केल्यामुळे, पाच महिन्यांपूर्वी या प्रकरणाला वेगळे वळण आले होते. तुरुंगात असलेल्या एका महिला कैद्याची काश्मीरमध्ये शीनाशी भेट झाली होती, असा खळबळजनक दावा इंद्राणीने केला होता . इंद्राणीने या प्रकरणात सीबीआय संचालकांना पत्र पाठवले होते . त्यांनी शीना बोरा हिचा तपास काश्मिरात करावा , असे अपीलही केले होते. या प्रकरणाचा तपास सीबीआय करीत आहे. शीना हिचा गळादाबून हत्या केल्याचा आणि नंतर तिचा मृतदेह जमिनीत गाडल्याचा इंद्राणीवर आरोप आहे. जेव्हा शीनाची गळा आवळून हत्या करण्यात आली होती तेव्हा हे अशक्य आहे की शीना जिवंत आहे आणि काश्मीरमध्ये कुठेतरी राहत आहे आणि आशा कोरके यांनी आरोप केल्यानुसार तिने आशा कोरके यांच्याशी संभाषण केले होते. यावरून हे स्पष्ट होते की आरोपी इंद्राणी मुखर्जीला सीबीआयची तसेच या न्यायालयाची दिशाभूल करून स्वतःच्या फायद्यासाठी कथा रचत आहेत.




काय आहे प्रकरण - इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. ज्यात प्रथम तिला पतीपासून मुलगी झाली. तिचे नाव शीना बोरा होते. इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी हा इंद्राणी मुखर्जीचा मुलगा आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितलं जाते. इंद्राणी आणि पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली होती आणि शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर इंद्राणीशिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली होती. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. तपासानुसार शीनाच्या राहुलसोबतच्या संबंधांना इंद्राणीचा विरोध होता. याशिवाय आर्थिक वाद हा हत्येमागील संभाव्य कारण होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.