ETV Bharat / state

NCB Seizes Drugs : एनसीबीने 2 किलो 800 ग्रॅम कोकेन केले जप्त, दोन परदेशी महिलांना अटक

author img

By

Published : Nov 21, 2022, 7:37 PM IST

अंमली पदार्थ नियंत्रण पथकाने ( Narcotics Control Bureau ) आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. परदेशातून मुंबईत ड्रग्ज आणणाऱ्या दोन परदेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 2 किलो 80 ग्रॅम कोकेन जप्त ( NCB seizes 2.80kgs Cocaine ) करण्यात आले.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई : अंमली पदार्थ नियंत्रण पथकाने ( Narcotics Control Bureau ) अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा ( international drug trafficking syndicate ) पर्दाफाश केला आहे. मुंबईत कोकेन आणणाऱ्या दोन परदेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 2 किलो 80 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले.

मुंबई विमानतळावर आफ्रिकन महिलेले घेतले ताब्यात - अंमली पदार्थ नियंत्रण पथकाने मुंबईत ड्रग्जचा पुरवठा करणारी आंतरराष्ट्रीय टोळीची माहिती गोळा केली. त्यानुसार त्यांनी विश्लेषण करत कृतीयोग्य आराखडा तयार केला. आणि यामध्ये मरिंडा एस. नावाच्या दक्षिण आफ्रिकन महिलेची ओळख पटली. महिलेची ओळख पटल्यानंतर सूत्रांद्वारे प्रवासी 20 नोव्हेंबर रोजी आदिस अबाबा, इथिओपिया येथून मुंबईला विमानाने प्रवास करणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, एनसीबी-मुंबईचे अधिकारी तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळावर पोहचले. तेथे गेल्यानंतर संदिग्ध महिलेला पकडण्यासाठी विशेष योजना केली. थोड्याच वेळात, इथिओपियावरून मुंबईला विमान आले आणि प्राप्त माहितीनुसार महिलेची शारीरिक ओळख पटल्यानंतर महिलेला रोखण्यात आले.

2 किलो 800 ग्रॅम ड्रग्ज जप्त - एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रियेनुसार त्या महिलेची झडती घेतल्याने तिच्या सामानातून 2 किलो 800 ग्रॅम उत्तम दर्जाचे कोकेन जप्त करण्यात आले. हे कोकेन संशयास्पद वस्तूंमध्ये काळजीपूर्वक लपवून ठेवले होते. विविध आकाराच्या 08 पॅकेटमधील प्रतिबंधक 2 जोड शूज, 2 पर्समध्ये विशेष पोकळी तयार करून अतिशय काळजीपूर्वक लपवण्यात आले होते. त्यानंतर महिलेकडून दारू जप्त करण्यात आली आणि महिलेला ताब्यात घेऊन अधिक चौकशी करण्यात आली.

एनसीबीने 2 किलो 800 ग्रॅम कोकेन केले जप्त

नायजेरियन महिलेला अटक - चौकशीदरम्यान, तिने उघड केले की ती हे कोकेन मुंबईतील अंधेरी येथील हॉटेलमध्ये एका व्यक्तीला पोहोचवायला आली होती. यानंतर ताबडतोब एक टीम हॉटेलमध्ये पोहोचली आणि एक विवेकी पाळत ठेवली. दरम्यान काही वेळात, आफ्रिकन वंशाची एक महिला आली आणि संशयास्पद हालचालीसह परिसरात थांबली. ती महिला निघणार असताना तिला अडवून विचारणा करण्यात आली. विचारणा करत असताना नायजेरियन महिला एच मुसा या महिलेने समाधान कारक उत्तर दिले नाही. त्या महिलेची कडक चौकशी केल्यावर, एच. मुसाने कबूल केले की ती दक्षिण आफ्रिकन महिला, मरिंडा एस. यांच्याकडून माल घेणार होती आणि पुढे मुंबईत वितरित करणार होती. महिलांकडून गुन्ह्यातील डेटासह पुष्टीकारक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. जे विविध देशांमध्ये पसरलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळीशी संबंध असल्याचे स्पष्ठ करतात.

ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात केला जाणार होता पुरवठा - जप्त केलेले ड्रग्ज दक्षिण अमेरिकेतून आणले गेले होते, जे कोकेनच्या अवैध उत्पादनाचे केंद्र आहे. मुंबईत केलेली ही कारवाई उल्लेखनीय कामगिरी आहे कारण स्थानिक ड्रग्ज ट्रॅफिकिंग सर्किट्स हे मुंबई, गोवा आणि जवळपासच्या भागात आगामी सणासुदीच्या हंगामासाठी पार्टी ड्रग्सचा पुरवठा करण्यास इच्छुक आहेत. अटक करण्यात आलेल्या महिलांची स्थानिक आणि ऑफशोअर देशांमध्ये असलेल्या किंगपिनबद्दल अधिक माहिती गोळा करण्यासाठी चौकशी केली जात आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.