ETV Bharat / state

Mumbai News: दुबईतून मुंबईत तीन दहशतवादी घुसल्याचा पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन...

author img

By

Published : Apr 8, 2023, 2:18 PM IST

Mumbai Police Received Call
मुंबईत घुसले तीन दहशतवादी

शुक्रवारी मुंबईला दहशतीखाली आणणारा कॉल नियंत्रण कक्षाला आला. राजा ठोंगे या व्यक्तीने सांगितले की, मुंबईत दुबईहून तीन दहशतवादी आले आहे. या दहशतवाद्यांचा संबंध पाकिस्तानशी आहे. यामुळे मुंबई पोलीस सर्तक झाले आहेत.

मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईत दहशतवादी घुसले अथवा मुंबईत बॉम्बस्फोट होणार असल्याची अफवा पसरवणारे धमकीचे कॉल आणि मेल पोलिसांना आले. तसेच काल दुपारी देखील मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षा एक कॉल आला होता. या कॉलरने दुबईहून शुक्रवारी पहाटे तीन दहशतवादी मुंबईत घुसले असल्याची माहिती दिली. त्यामुळे मुंबई पोलिसांची तारांबळ उडाली आहे. ही अफवा आहे का या माहितीची पोलीस पडताळणी करत आहेत.



दहशतवादी आल्याची माहिती: मुंबई पोलीस नियंत्रण कक्षास फोन करणाऱ्या व्यक्तीने त्याचे नाव राजा ठोंगे असे असल्याचे सांगितले. त्याचा मुंबईत दोन नंबरचा धंदा असल्याचे देखील त्यांनी माहिती दिली. त्याचप्रमाणे राजा ठोंगे या नाव असलेल्या इसमाने मुंबईत दुबईहून आलेले दहशतवादी शुक्रवारी आले असल्याची देखील माहिती दिली. या खळबळजनक माहितीमुळे मुंबई पोलिसांच्या तपास यंत्रणा या माहितीशी शहानिशा करण्यात व्यस्त आहे.


दहशतवाद्यांचा पाकशी संबंध: मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कॉल करणाऱ्या राजा ठोंगे मुंबईत घुसलेल्या तीन दहशतवाद्यांचा पाकशी संबंध असल्याचा दावा केला. तीन दहशतवादांपैकी एकाचे नाव मुजिम सय्यद असल्याची माहिती त्याने दिली. त्याचप्रमाणे मुजिम सय्यद या दहशतवादी व्यक्तीच्या गाडीचा नंबर आणि मोबाईल नंबर देखील राजा टोंगे यांनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात दिला आहे. मुंबई पोलीस मुजीम सय्यदचा दिलेला मोबाईल क्रमांक आणि गाडीच्या क्रमांक यांची तपासणी करून चौकशी करत आहेत.



कॉल खरा की खोटा ?: त्याचप्रमाणे मुंबई पोलीस मुंबई नियंत्रण कक्षात कॉल करणाऱ्या राजा ठोंगे या व्यक्तीचा संपर्क क्रमांकावरून शोध घेत आहेत. मात्र अद्याप हा कॉल खरा की खोटा आहे याची शहानिशा पोलीस करत आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत घातपात घडवण्यासाठी खरंच तीन दहशतवादी घुसले आहेत का? याची देखील चौकशी जलद गतीने मुंबई पोलिसांकडून केली जात असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.



बॉम्बस्फोट घडवून आणणार : या अगोदर देखील मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांना देखील रात्री एक वाजताच्या सुमारास एका कॉलरने कॉल करून, मीरा रोड भाईंदर येथे बॉम्बस्फोट होणार असल्याची खळबळ जनक माहिती दिली होती. ती माहिती देखील खोटीच निघाली. त्याआधी देखील वाहतूक पोलिसांना नियंत्रण कक्षात एक व्हाट्सअपद्वारे मेसेज आला होता. त्यात देखील मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याची माहिती देण्यात आली होती. याआधी मुंबई पोलिसांच्या नागपाडा येथील नियंत्रण कक्षास बॉम्ब पेरले असल्याची माहिती देणारा कॉल आला होता. त्या आरोपीला पोलिसांनी 24 तासात अटक केली होती. मात्र हे सर्व फोन कॉल्स आणि मेसेजेस हे अफवाच ठरले होते.

हेही वाचा: Cyber Crime सेक्सटॉर्शननंतर सायबर चोरट्यांच्या रडारवर राजकीय व्यक्ती धमक्यांचे प्रमाण वाढले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.