ETV Bharat / state

अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरण : राज कुंद्राच्या कंपनीतील डायरेक्टरला अटक

author img

By

Published : Aug 13, 2021, 11:50 AM IST

Updated : Aug 13, 2021, 12:46 PM IST

pornography case
राज कुंद्राच्या कंपनीतील डायरेक्टरला अटक

मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात एका अभिनेत्रीने राज कुंद्राच्या कंपनीत काम करणाऱ्या चार जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलकडे सोपविण्यात आले होते.

मुंबई - उद्योगपती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने आणखी एकाला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी राज कुंद्राच्या कंपनी डायरेक्टर म्हणून काम करणारा अभिजित भोम्बले याला अटक केली आहे.

मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात एका अभिनेत्रीने राज कुंद्राच्या कंपनीत काम करणाऱ्या चार जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलकडे सोपविण्यात आले होते. दरम्यान, भोम्बलेच्या सोबतच गहना वशिष्ठ, अजय श्रीमंत आणि प्रिन्स कश्यप हेदेखील आरोपी आहेत.

काय आहे नेमके प्रकरण -

राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. राज कुंद्राची व्हिआन नावाची कंपनी असून तिचे केनरीन नावाच्या कंपनीसोबत टायअप होते. केनरीन ही कंपनी लंडन स्थित आहे. राज कुंद्राच्या भावोजींच्या मालकीची ही कंपनी आहे. त्याचे हॉट शॉट्स नावाचे एक अॅप होते. या कंपनीच्या सर्व कन्टेन्टची निर्मिती, या अॅपचे ऑपरेशन्स, अकाउंटिंग राज कुंद्राच्या मालकीच्या व्हिआन या कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमधूनच होत होते. या प्रकरणाचा सखोल तपास करीत असताना हे सर्व धागेदोरे सापडले आहेत. यामध्ये काही व्हॉट्सअप ग्रुप, ई-मेल्स, अकाऊंट शीट्स सापडल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक केली.

पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेले व्यावसायिक राज कुंद्रा यांचा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे. त्यांच्या जामीनावरील सुनावणी सत्र न्यायालयाने 20 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. राज कुंद्रा आणि रायन थोरपे या दोघांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.

  • फेब्रुवारी 2021 मध्ये राज कुंद्रा विरोधात तक्रार दाखल -

राज कुंद्रा विरोधात फेब्रुवारी, 2019 मध्ये तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीमध्ये राज कुंद्रा अश्लील सिनेमे बनवत असून ते मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रसारित करत आहे, असे आरोप ठेवण्यात आले होते.

  • राज कुंद्रा याला सात वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा -

अश्लील सिनेमे तयार करुन मोबाईलच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा याच्यावर भा.दं.वि. चे कलम 292, 293, 420, 34 आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट यू/एस 2(जी), 3, 4, 6, 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमान्वये गुन्हा सिद्ध झाल्यास राज कुंद्राला सात वर्षांची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती अॅड. नितीन धांडोरे यांनी दिली.

  • राज कुंद्रा मास्टर माईंड असल्याची पोलिसांची माहिती -

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा आणि त्याच्या भावाने ब्रिटनमध्ये एक कंपनी स्थापन केली होती. केनरिन असे त्या कंपनीचे नाव आहे. याच माध्यमातून अश्लील सिनेमे दाखवले जात होते. अश्लील चित्रपट भारतात शूट केले जात होते. त्यानंतर शूट केलेले व्हिडिओ विदेशात राज कुंद्रा आपल्या भावाला वी ट्रान्सफरच्या माध्यमातून पाठवत असे.

Last Updated :Aug 13, 2021, 12:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.