ETV Bharat / state

Mumbai Corona Update : रुग्ण संख्या थोडी आटोक्यात 150 नव्या रुग्णांची नोंद

author img

By

Published : May 23, 2022, 7:49 PM IST

Mumbai Corona Update
कोरोना अपडेट

मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट (The third wave of corona virus) आटोक्यात आल्यामुळे रुग्णसंख्येत घट (Decrease in patients) पहायला मिळाली. गेले काही दिवस २०० च्या वर गेलेली रुग्णसंख्या आज सोमवारी कमी झाली. १५० नव्या रुग्णांची ( 150 new patients) नोंद झाली आहे. मुंबईत सध्या १३७० सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.

मुंबई : मुंबईत आज सोमवारी १५० नवे रुग्ण नोंदवल्या गेले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ७४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६३ हजार ०५८ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी १० लाख ४२ हजार १२२ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६६ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या १३७० सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३९५४ दिवस इतका आहे.

मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०१७ टक्के इतका आहे. मुंबईत आज नोंदवण्यात आलेल्या १५० रुग्णांपैकी १४४ म्हणजेच ९६ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ४८८ बेड्स असून त्यापैकी ४३ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत.


मुंबईत गेले दोन वर्षात कोरोनाच्या दोन लाटा आल्या. पहिल्या लाटेच्या वेळी २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेच्या वेळी कोरोनाचे ११ हजार ५०० इतकी सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. तीसऱ्या लाटेत ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण सापडत होते. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या पुन्हा १०० च्या वर गेली. १९ मे ला २२३, २० मे ला २१३, २१ मे ला १९८, २२ मे ला २३४, २३ मे ला १५० रुग्णांची नोंद झाली.



हेही वाचा : Maharashtra Heatstroke Cases : राज्यात उष्माघाताच्या २९ संशयितांचा बळी, आरोग्य विभागाची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.