ETV Bharat / state

Accident on Bandra Worli Sea Link : वांद्रे वरळी सी लिंकवर सहा वाहनांचा विचित्र अपघात; तिघांचा मृत्यू, पाहा थरारक व्हिडिओ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2023, 7:02 AM IST

Updated : Nov 10, 2023, 12:51 PM IST

Accident on Bandra Worli Sea Link : मुंबईत वांद्रे वरळी सी लिंकवर सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे, तर 6 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Accident on Bandra Worli Sea Link
Accident on Bandra Worli Sea Link

वांद्रे वरळी सी लिंकवर सहा वाहनांचा विचित्र अपघात

मुंबई Accident on Bandra Worli Sea Link : मुंबईत वांद्रे वरळी सी लिंकजवळ अपघातामुळं वाहतूक विस्कळीत झाली होती. टोल नाक्यावर उभ्या असलेल्या दोन वाहनांना मागून वेगात आलेल्या कारनं जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीनं उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलंय.

  • #WATCH | Mumbai: Zone 9 DCP Krishnakant Upadhyay said, "Today around 10:15 am, a vehicle was going north from Worli towards Bandra, 100 meters before the toll plaza on sea link, it collided with a vehicle. After colliding the car sped up and hit 2-3 vehicles at the toll plaza. A… https://t.co/J6JHQr4Lzj pic.twitter.com/wWRcEqMpNR

    — ANI (@ANI) November 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वेगात आलेली कार उभ्या वाहनांना धडकली : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळीहून वांद्रेच्या दिशेनं भरधाव वेगात आलेली इनोव्हा कार वांद्रेच्या दिशेनं टोल प्लाझाजवळ उभ्या असलेल्या वाहनांना धडकल्यानं 6 गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. यात एकूण सहा जण जखमी झाले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झालाय. धडक झालेल्या इनोव्हा वरळीच्या दिशेनं भरधाव वेगानं येत होती. इनोव्हा चालकानं सी-लिंकच्या मध्यभागी दुसर्‍या कारला धडक दिली. धडक देताचं त्यानं वांद्रेच्या दिशेनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, वांद्रे सी लिंकवरील टोल प्लाझावर अनेक वाहनं आधीच उभी होती. वेग जास्त असल्यानं इनोव्हा चालकानं या वाहनांना धडक दिली. त्यानंतर ही वाहनं एकमेकांवर आदळली. यात इनोव्हा चालकालाही किरकोळ दुखापत झाली आहे. आरोपी चालकाला ताब्यात घेऊन इनोव्हा कार जप्त करण्यात आलीय.

तीन जणांचा मृत्यू : या भीषण अपघातात एका कारमध्ये असलेल्या तिघांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 2 महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे. या अपघातात चालकदेखील जखमी झालाय. चालकासह अन्य चौघांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एकाला लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी वांद्रे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला अटक केली जाऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

हेही वाचा :

  1. Delhi Bus Fire : जयपूर दिल्ली महामार्गावर भीषण अपघात; खासगी बसला लागलेल्या आगीत दोन प्रवासी ठार, 10 जण गंभीर
  2. Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेश रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे अपघाताचं सांगितलं 'हे' कारण, मृतांचा आकडा 14 वर पोहोचला!
  3. Nagar Kalyan Highway Accident : नगर कल्याण महामार्गावर एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; अनेक प्रवासी जखमी
Last Updated :Nov 10, 2023, 12:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.