ETV Bharat / state

Mukesh Ambani Threat Case: मुकेश अंबानींना मेलवरुन वारंवार धमकी; आणखी एक आरोपी गुजरातमधून अटक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 10:25 PM IST

Updated : Nov 4, 2023, 10:49 PM IST

Mukesh Ambani Threat Case : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना धमकीचा मेल पाठवणाऱ्या राजवीर जगतसिंग खंत (Rajvir Kant) याला कलोल गाव गांधीनगर गुजरात या ठिकाणाहून अटक करण्यात आलेली आहे. तर हा आरोपी 21 वर्षाचा असून कॉमर्सच्या तृतीय वर्षाला शिकत आहे.

Mukesh Ambani Threat Case
मुकेश अंबानी

मुंबई Mukesh Ambani Threat Case : देशाचे प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना 19 वर्षीय आरोपीने ईमेल करून खळबळ ओढून दिली. 400 कोटी रुपयांची त्यांनी मागणी केली होती. तसेच त्यांनी अंबानी यांना मारण्याची धमकी देखील दिली होती. त्यानंतर राजवीर जगतसिंग खंत (Rajvir Kant) याने देखील ईमेलद्वारे धमकी दिल्याचे उघड झाले आहे. या संदर्भात मुंबईचे डीसीपी राज तिलक रोशन (DCP Raj Tilak Roshan) यांनी आज पत्रकार परिषदेत अनेक बाबींचा खुलासा केला. राजवीर खंत नावाच्या आरोपीला अटक केली असून, तो कॉमर्समध्ये तृतीय वर्षाला शिकत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. त्याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हाची नोंद नाही.




कॉमर्स शिकणारा उच्चशिक्षित आरोपी : 400 कोटी रुपयाचा धमकीचा ईमेल करणारा आरोपी गणेश हा तर आहेच. परंतु त्यानंतर नुकत्याच मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव राजवीर जगतसिंग खंत असे आहे. हा 21 वर्षाचा आहे असून, कॉमर्सच्या तृतीय वर्षाला तो शिकत आहे. तो गुजरात राज्यात राहतो. त्याने देखील जीवे मारण्याची धमकी उद्योगपती मुकेश अंबानी यांना दिली होती. मात्र आरोपी तरुणावर याआधी कोणताही गुन्हा नोंद नाही.




ई-मेलचा डेटा पोलिसांना अद्याप सापडला नाही : डीसीपी रोशन तिलक यांनी सांगितलं की, आरोपी राजवीर खंत हा 21 वर्षाचा आहे. परंतु त्याच्याकडे प्राथमिक तपास केला असता ईमेल सर्विसचा डिटेल डेटा मिळालेला नाही. म्हणजे ज्या ईमेलद्वारे त्याने उद्योगपती मुकेश अंबानी यांना मेल केला होता. त्या मेलबाबतचे पूर्ण तपशील अद्याप इंटरनेटवर मिळालेले नाही. त्याने फॅन्स डॉट कॉमच्या माध्यमातून प्रत्येक मेल केले असल्याची बाब समोर आलेली आहे. वेगवेगळ्या दिवशी एकूण पाच ईमेल या आरोपीने मुकेश अंबानी यांच्या ईमेलवर पाठवलेले आहेत.



गुजरातमधून अटक : राजवीर जगतसिंग खंत याला कलोल गाव गांधीनगर गुजरात या ठिकाणाहून अटक करण्यात आलेली आहे. यासंदर्भातील तपास पोलीस सहयुक्त गुन्हे लखणी गौतम आणि अप्पर पोलीस आयुक्त शशी कुमार मीना तसेच राज तिलक सहायक पोलिस आयुक्त गुन्हे प्रकटीकरण यांच्याद्वारे सुरू आहे. मुंबई पोलिसांनी या संदर्भात आरोपीवर भारतीय दंडविधान कलम 370 कलम 387 कलम 506 (2) अंतर्गत गुन्हे नोंदवलेले आहेत. shadabkhan@mailfence.com या मेल आयडी वरून मुकेश अंबानी यांना वेगवेगळ्या दिवशी पाच ईमेल केले आहेत.

हेही वाचा -

  1. Mukesh Ambani Threat Case : मुकेश अंबानींना धमकी देणाऱ्या आरोपीला तेलंगाणातून अटक; आठ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
  2. Death Threat to Mukesh Ambani : 400 कोटी द्या नाहीतर...; उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची तिसऱ्यांदा धमकी
  3. Death Threat to Mukesh Ambani : 20 कोटी द्या नाहीतर...; उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत गुन्हा दाखल
Last Updated :Nov 4, 2023, 10:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.