ETV Bharat / state

School Closed News : मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये बारावीपर्यंत शाळांना सुट्टी, जाणून घ्या शिक्षण विभागाचे आदेश

author img

By

Published : Jul 20, 2023, 8:58 AM IST

राज्यातील इतर भागातील परिस्थिती पाहून जिल्हाधिकाऱ्यांना शाळेच्या सुट्टीसंबंधित निर्णय घेण्याचा निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुट्टी संदर्भात पत्र दिले आहे. राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने 10वी व 12वीच्या उद्या होणारी पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. पहिली ते 12 वी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळांना सुट्टी असणार आहेत.

शाळांना सुट्टी
शाळांना सुट्टी

मुंबई : राज्यामध्ये येत्या 3 ते 4 दिवस अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शासनाने त्या संदर्भात सावधानतेचा इशारा म्हणून सर्व शासकीय विभागांना आणि यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी या आदेश पत्रामध्ये किती कालावधीसाठी हा आदेश लागू राहील. याची निश्चित तारीख नमूद केलेली नाही. मात्र अतिवृष्टीचा अंदाज घेऊन आवश्यकतेनुसार ही सुट्टी जाहीर करावी,असे त्यांनी म्हटले आहे.

शाळांना सुट्टी : मुसळधार पावसामुळे राज्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते 12 वीच्या सर्व माध्यम सर्व मंडळाच्या शाळा अतिवृष्टीमुळे बंद राहतील. शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, इयत्ता पहिली पर्यंत ते 12वी पर्यंतच्या सर्व शाळा या अतिवृष्टीमुळे स्थानिक आवश्यकतेनुसार बंद राहतील. तसेच विविध मंडळाच्या शाळा तसेच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये यात समावेश आहे. त्यामुळे त्या-त्या शाळांचे प्रमुख त्या-त्या विभागांचे प्रमुख यांनी नियोजन करावे. तसेच स्थानिक भागातील अधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने स्थानिक भागातील अतिवृष्टीचा तसेच शासनाने वर्तवलेला हवामान अंदाज लक्षात घेऊन नियोजन करावे. त्यांना शाळांना सुट्टी जाहीर करावी, असे या आदेश पत्रात नमूद केलेले आहे.

या जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी : मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी आहे. पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही घोषणा केली आहे. तर शिक्षण आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. आपापल्या भागातील पावसाची परिस्थिती पाहून शाळांना सुट्टी घेण्याबाबत स्वत:च्या अखत्यारित निर्णय घेण्याच्या सूचना शिक्षण आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यामुळे उद्या मुंबई, ठाणे, रायगड, पालघर येथील शाळांना सुट्टी असेल. दरम्यान, राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत 4 तास लोकल रेल्वे खोळंबळल्या होत्या. तसेच रस्त्यावरील वाहतूक देखील मंदावली होती. राज्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नद्यांना पूर आलेला आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Rain Update : मुंबईसह कोकणात मुसळधार; यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
  2. Maharashtra Rain Update: कोकण आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अति मुसळधार पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.