ETV Bharat / state

Kamboj defamation suit: मोहित कंबोज मानहानी खटला: सुनावणीला आता 12 जानेवारीला

author img

By

Published : Dec 31, 2021, 10:49 AM IST

भाजप नेते मोहित कंबोज (BJP leader Mohit Kamboj) यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Minority Minister Nawab Malik) यांच्याविरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी (Defamation trial) सध्या मुंबईतील शिवडी न्यायालयात (Shivdi Court in Mumbai) सुरू आहे. नवाब मलिक सुनावणी साठी उपस्थित राहू शकले नाही त्यामुळे त्यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे दुसरी तारीख मागितली. या प्रकरणातील पुढील सुनावणी आता 12 जानेवारी होणार आहे.

मुंबई: सुनावणीच्यावेळी गुरवारी राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने हस्तक्षेप अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हा पदाधिकारी अशफाक खान यांनी मध्यस्थी अर्ज केला आहे. ज्यांच्या विरोधात त्यांनी अवमान याचिका दाखल केली आहे ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोण आहेत हे कंबोज यांनी न्यायालयात स्पष्ट करावे, असे खान यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे.

असे आहे प्रकरण
भारतीय जनता युवा मोर्चा नेते मोहित कंबोज यांनी मलिक यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. मलिकांनी मोहित कंबोज यांच्यावर आरोप केला आहे की, क्रूझ रेव्ह पार्टी प्रकरणात त्यांच्या मेहुण्यालाही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ताब्यात घेतले होते. मात्र, मलिक यांच्या या आरोपानंतर मोहित कंबोज यांनी हे सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.