ETV Bharat / state

Raj Thackeray Meet DCM राज ठाकरेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, मुंबई-गोवा महामार्गाबाबत केली चर्चा

author img

By

Published : Dec 15, 2022, 6:13 PM IST

Raj Thackeray And Devendra Fadnavis
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray Meet With DCM ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या बंगल्यावर भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुंबई गोवा महामार्गाचे ( Mumbai Goa Highway ) काम जलदगतीने करण्याबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis )यांच्या भेटीला गेल्यामुळे विरोधक मात्र सतर्क झाले आहेत.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray Meet With DCM Devendra Fadnavis ) यांनी आज सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांची त्यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये मुंबई-गोवा ( Mumbai Goa Highway ) महामार्गाबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मात्र राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्यामुळे विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुंबई - गोवा अतिशय महत्त्वाचा महामार्ग राज्यातील अतिशय महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्याचे उद्घाटन या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi ) यांच्या हस्ते झाले आहे. मात्र मागील अनेक वर्षापासून प्रलंबित मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा झाली असून हा प्रकल्प अजूनही अधांतरीच आहे. याबाबत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray Meet With DCM ) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली असली, तरी मुंबई - गोवा महामार्ग त्वरित पूर्णत्वास न्यावा असे राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

समृद्धी महामार्गासारखे जलदगतीने काम करावे ? मुंबई-गोवा महामार्ग ( Mumbai Goa Highway ) अनेक वर्षापासून प्रलंबित असून याबाबत अनेक अडचणी वारंवार समोर येत आहेत. सरकार बदलले, तरी सुद्धा या महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. परंतु ज्या पद्धतीने समृद्धी महामार्गाचे ( Samruddhi Highway ) काम प्रगतीपथावर करण्यात आले, त्याच अनुषंगाने हा मार्ग सुद्धा प्रगतीपथावर नेण्यात यावा, अशी विनंती राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray Meet DCM ) यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. कोकणातील नेते, खासदार, मंत्री यांनी वारंवार या महामार्गाबाबत आवाज उठवला आहे. तरी अजूनही या महामार्गामध्ये अनेक अडचणी आहेत. मुंबईकरांच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा महामार्ग असून तो लवकर पूर्ण करावा, असेही त्यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.