ETV Bharat / state

पत्रकार परिषदेच्या नावाने विधानसभा अध्यक्षांचा अवमान कराल, तर तुमच्यावर हक्कभंग येणार-राम कदम

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 2:00 PM IST

Updated : Jan 17, 2024, 2:35 PM IST

MLA Disqualification row : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून भाजपा आमदार राम कदम यांनी आज टीका केली. त्यांनी थेट हक्कभंगाचा प्रस्ताव येणार असल्याचा इशारा दिला आहे.

Uddhav Thackeray Maha PC :
भाजप आमदार वि. उद्धव ठाकरे

भीतीपोटी पत्रकार परिषद घेतली

मुंबई : MLA Disqualification row: ठाकरे गटाकडून मंगळवारी (16 जानेवारी) मुंबईत महापत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो आमदार पात्र-अपात्रतेवर निर्णय दिलाय त्यावर विश्लेषणात्मक चर्चा करण्यात आली. नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका करत हा पूर्णपणे चुकीचा निर्णय दिला आहे, असा सूर या पत्रकार परिषदेत निघाला. त्यावर आता भाजपाकडून पलटवार करण्यात येतोय. भाजपा प्रवक्ता आमदार राम कदम यांनीदेखील ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर टीका केलीय. महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा पूर्णपणे संविधान, घटना, कायदा यांच्या नियम आणि चौकटीत दिला आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे कल्पना आहे, की सर्वोच्च न्यायालयात आपला पराभव होणार आहे. त्या भीतीपोटी पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप राम कदम यांनी केलाय.

...तर तुमच्यावर हक्कभंग येणार : मुंबई, पुण्यासह इतर ठिकाणी असलेले ठाकरे गटाचे नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत जातील. तसेच, शिंदे यांच्याकडे सुमारे 70 टक्के लोक आहेत. उरलेलेही लोक जाऊ नयेत म्हणून ठाकरे यांचा हा खटाटोप होता, असा आरोप भाजपा आमदार कदम यांनी केलाय. तुम्हाला निर्णय रुचला नाही तर कोर्टात आव्हान द्या. परंतु, अशा प्रकारे महापत्रकार परिषदेच्या नावाने विधानसभा अध्यक्षांचा अवमान कराल, तर तुमच्यावर हक्कभंग येणार आहे. तसंच, वारंवार तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरता. त्या कारणाने महाराष्ट्रातील जनताही तुम्हाला माफ करणार नाही, असंही कदम म्हणाले आहेत.

''खरं पाहायला गेलं तर गद्दारी कोणी केली आहे? बाळासाहेबांचा विचार हा हिंदुत्वाचा होता. तुम्ही हिंदुत्वाच्या विचाराशी गद्दारी करणार आणि इतरांना गद्दार म्हणाल? महापत्रकार परिषद ही महा ढोंगी परिषद होती"-भाजपा आमदार राम कदम

  • ◆दुर्योधन आणि शकुनी मामाच्या धोका आणि "महा" कपटामुळेच "महा"भारताचे युध्द झाले.

    ◆म्हणून पांडवांच्या हातून सर्व कौरवांचा "महा"नाश झाला.

    तसेच
    ◆नेहमी एक खोटं लपवण्यासाठी "महा" खोटे बोलावे लागते!

    ◆मुख्यमंत्रीपदासाठी "महा"कपट, "महा"धोका केला नसता...
    ◆अडीच वर्षे..असं काही ठरलं…

    — Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 17, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

"महा"कपट, "महा"धोका केला नसता : राम कदम यांच्यासह मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनीही एक्सवरून (ट्वीटर) टीका केलीय. दुर्योधन आणि शकुनी मामाच्या धोका आणि "महा" कपटामुळेच 'महा'भारताचं युद्ध झालं. म्हणून पांडवांच्या हातून सर्व कौरवांचा 'महा'नाश झाला. तसंच, नेहमी एक खोटं लपवण्यासाठी 'महा' खोटं बोलावं लागतं! मुख्यमंत्रीपदासाठी 'महा'कपट, 'महा'धोका केला नसता, अडीच वर्षे असं काही ठरलं नसताना ही 'महा'खोटं बोलला नसता. रोज सकाळी खोटं बोलणाऱ्या 'महा' शकुनीला आवरले असते, तर अशी 'महा' पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती. जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर! जय श्रीराम! अशा शब्दांत आशिष शेलार यांनी टीका केलीय.

हेही वाचा :

1 उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाली की दसरा मेळाव्याचं भाषण, राहुल नार्वेकरांची टीका

2 लोकशाहीच्या मैदानात या, उद्धव ठाकरेंच एकनाथ शिंदे, राहुल नार्वेकरांना खुलं आव्हान

3 लवादानं शिवसेना चोरांच्या हातात दिली, संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांवर प्रहार

Last Updated :Jan 17, 2024, 2:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.