ETV Bharat / state

'डिस्चार्ज' कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्याने जयंत पाटील म्हणाले, 'वेल डन महाराष्ट्र'

author img

By

Published : Jun 16, 2020, 12:10 PM IST

जलसंपदामंत्री जयंत पाटील
जलसंपदामंत्री जयंत पाटील

राज्यात सोमवारी (दि. 15 जून) एकाच दिवशी 5 हजार 71 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. यामुळे राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करून समाधन व्यक्त केले. जनतेच्या संयमामुळे आणि प्रशासनावरील विश्वासाने हे शक्य झाल्याचे ते म्हणाले.

मुंबई - राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना सोमवारी (दि. 15 जून) एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. राज्यात एकाच दिवशी 5 हजार 71 कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. महाराष्ट्रातील जनतेच्या संयमामुळे हे शक्य झाले. वेल डन महाराष्ट्र, अशा शब्दांत राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करून समाधान व्यक्त केले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरद्वारे कोरोनातून बऱ्या होणाऱ्यांच्या वाढत्या आकड्याबद्दल समाधान व्यक्त करत याचे श्रेय राज्यातील जनतेला तसेच अहोरात्र झटणाऱ्या प्रशासनाला दिले आहे.

जयंत पाटील यांनी सोमवारी (दि. 15 जून) रात्री उशिरा आरोग्य विभागाची अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध झाल्यावर ट्वीट केले. एकाच दिवशी 5 हजार 71 कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. 4 हजार 242 रुग्ण मुंबई शहर व उपनगरातील आहेत. आतापर्यंत 56 हजार 49 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. केवळ राज्यातील जनतेच्या संयमामुळे, प्रशासनावरील विश्वासामुळे हे शक्य झाले आहे, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

राज्याने दुसऱ्यांदा बरे झालेल्या रुग्णांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याच्या तीन महिन्यानंतर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 42.2 टक्के आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - मुंबईत एकाच दिवशी 3139 रुग्णांची कोरोनावर मात.. बरे होण्याचा दर 46 टक्के

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.