ETV Bharat / state

Aditya Thackeray At Dabewala Bhavan : दिलेली वचने पूर्ण केली म्हणून २५ वर्षे पालिकेत सत्ता - आदित्य ठाकरे यांचा विरोधकांना टोला

author img

By

Published : Mar 6, 2022, 3:36 PM IST

Updated : Mar 6, 2022, 5:25 PM IST

आम्ही दिलेली वचने पूर्ण करत आलो यामुळेच मुंबई महापालिकेत ( BMC ) गेली पंचवीस वर्षे आमची सत्ता आहे, असा टोला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aditya Thackeray ) यांनी विरोधकांना लगावला आहे. मुंबईत बांद्रा येथे डबेवाला भवचे उदघाटन आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray inaugurates Dabewala Bhavan ) यांच्या हस्ते करण्यात आले.

Minister Aditya Thackeray inaugurates Dabewala Bhavan at Bandra
आदित्य ठाकरे

मुंबई - आम्ही दिलेली वचने पूर्ण करत आलो यामुळेच मुंबई महापालिकेत ( BMC ) गेली पंचवीस वर्षे आमची सत्ता आहे, असा टोला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aditya Thackeray ) यांनी विरोधकांना लगावला आहे. मुंबईच्या लाईफलाईनला व्हिटामिन पोहचवण्याचे काम डबेवाले करत आहेत त्याचा अभिमान असल्याचे असल्याचे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

मंत्री आदित्य ठाकरे यावेळी बोलताना

म्हणून पंचवीस वर्षे सत्ता -

मुंबईत बांद्रा येथे डबेवाला भवचे उदघाटन आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray inaugurates Dabewala Bhavan ) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसेनेने गेल्या पंचवीस वर्षात अनेक वचने दिली, ती पूर्ण केली म्हणून पंचवीस वर्षे सत्ता राहिली, रस्ते, फुटपाथ, पर्जन्य जलवाहिन्या, नाले, मिठी नदी आदी सर्वच कामे केली आणि करत आहोत. मुंबईला पुढे कसे न्यायचे त्याचा विचार करताना डबेवाला भवन उभारणे एक महत्वाचे काम होत ते वचन आज पूर्ण केले, असे म्हणाले.

उद्घाटन सच्चा मुंबईकराच्या हस्ते -

डबेवाल्यांचे कौतुक अनेकांनी केले. मात्र हाच डबेवाला आल्यावर त्याने घरी परत आणलेल्या डब्यामधील तीन चपात्या वाटून खाणाऱ्या घरातील एक व्यक्ती महापौर झाल्या आणि त्यांच्या हस्ते या डबेवाल्या भवनची फित कापली गेली हा जुळून आलेला एक योगायोग आहे. डबेवाला भवनचे उद्घाटन आज एका सच्चा मुंबईकराच्या हस्ते झाले हे लिहिलं होतं आणि तसंच आज घडलं, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा - Uncut PM Modi : पूर्वी भूमीपूजन व्हायची, उद्घाटनांचा पत्ता नव्हता; पंतप्रधानांचा मेट्रो उद्घाटन प्रसंगी टोला

व्हिटामिन डबेवाले पोहोचवतात -

मुंबकरांची लाईफ लाईन म्हणून बेस्ट रेल्वे यांची ओळख आहे. मात्र त्यांना अन्न पोहचवण्याचे जे रक्त लागत ते डबे वाल्यांकडून पोहचवल जात आहे. त्याचा अभिमान आहे. माणसाला जिवंत ठेवणारे जे व्हिटामिन लागते ते हे डबेवाले पोहचवतात. कोविड काळात जगाने ज्या मुंबईचे कौतुक केले त्याच मुंबई पालिकेकडून आज भवन उभारले गेले आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना, मेट्रो कारशेडच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेऊ. राजकीय आरोप आता वाढत जातील. रेटून खोटं बोलणं हे आता चालू राहिल. मुंबईत बदल जाणवतोय. रात्री देखील बेस्टच्या बस धावणार आहे. महिलांसाठी देखील नवीन सेवा उपलब्ध कारणार आहोत. बेस्टची सहन असलेल्या 900 डबल डेकर बस येणार आहेत असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

महापौर झाल्या भावुक -

आम्ही लहान असताना डबेवाला यायचा त्याची वाट पाहायचो. आम्ही सहा भावंडं होतो, आमचा एकच भाऊ कामावर होता. इतरांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. भावाला डबेवाला डबा पोहचवण्याचे काम करायचा. भाऊ सहा चपात्या मागायचा. मात्र, तीन चपात्या खाऊन तीन डब्यात उरवायचा. डबेवाला संध्याकाळी घरी आल्यावर त्या तीन चपात्या आम्ही भावंड खायचो. याच डबेवाल्याने भावाच्या डब्यातून परत आणलेल्या चपात्या खाऊन आमची वाढ झाली. डबेवाल्याबाबत ही आठवण सांगताना महापौर भावूक झाल्या. यासाठी डबेवाला भवन उभारणीसाठी ठरावाची सूचना मांडली होती. आता कार्यकाळ संपण्यापूर्वी हे भवन उभारले जावे म्हणून गेल्या दहा ते बारा दिवसात सूत्रे हलली आणि हे भवन उभे राहिले असे महापौर म्हणाल्या.

Last Updated :Mar 6, 2022, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.