ETV Bharat / state

Corona update: कोरोनाची प्रभाव कायम! राज्यात ५६९ नव्या रुग्णांची नोंद तर २ रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : Apr 5, 2023, 8:53 PM IST

Corona update
Corona update

राज्यात आज कोरोनाच्या ५६९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबई आणि पिंपरी चिंचवड येथे प्रत्येकी एक अशा २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज ४८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आज २२१ रुग्णांची नोंद झाली आहे तसेच १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूच्या रुग्णसंखेत वाढ होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकार आणि आरोग्य विभाग सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबई : राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज ५६९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा ८१ लाख ४६ हजार ८७० वर पोहचला आहे. आज २ मृत्यूची नोंद झाल्याने मृत्यूचा आकडा १ लाख ४८ हजार ४५१ वर पोहचला आहे. आज ४८५ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ७९ लाख ९४ हजार ५४५ वर पोहचला आहे. राज्यात ३८७४ ॲक्टिव्ह रुग्ण असून मुंबईत १२४४, पुण्यात ७६१, ठाण्यात ७०३, रायगड मध्ये २५५ तर नागपूर येथे १५२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. नंदुरबार, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात एकही ॲक्टिव्ह रुग्ण नाहीत.

मुंबईत १ मृत्यू : मुंबईत आज २२१ रुग्णांची नोंद झाली असल्याने, एकूण रुग्णांचा आकडा ११ लाख ५७ हजार ९६८ वर पोहचला आहे. आज १ मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १९ हजार ७४८ वर पोहचला आहे. १३८ रुग्ण बरे झाल्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा ११ लाख ३६ हजार ९७६ वर पोहचला आहे. मुंबईतील विविध रुग्णालयात ८० रुग्ण दाखल असून ४० रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी रुग्णांव उपचार सुरू आहेत. तसेच, फक्त मुंबईतच नाही तर राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. यामध्ये प्रामुख्याने मोठ्या-मोठ्या शहरात रुग्णांची संख्या काही प्रमाणात आढळून येत आहे.

भीती बाळगू नका : मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे, रुग्ण संख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या कमी प्रमाणात आहे. त्यामुळे मुंबईमध्ये कोरोनामुळे कोणतीही भीतीदायक परिस्थिती निर्माण होईल असे सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे नागरिकांनी भीती न बाळगता गर्दीच्या ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करावे असे, आवाहन मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

हेही वाचा : ६ वया खालील लिंग गुणोत्तरात पुरोगामी महाराष्ट्र देशात २७ व्या स्थानावर, स्त्रीभ्रुण हत्येची ६१२ प्रकरणे दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.