Mega Block In Mumbai मुंबईत आज रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल

author img

By

Published : Jan 20, 2023, 11:02 PM IST

Updated : Jan 22, 2023, 9:25 AM IST

Mega Block In Mumbai
संग्रहित छायाचित्र ()

मायानगरी मुंबईतील लोकल ही जीवनवाहिनी असल्याने ती काही वेळासाठीही बंद राहिली, तर त्याचे परिणाम लगेच दिसतात. मात्र या जीवनवाहिनीच्या देखभालीसाठी मुंबईत काहीकाळ तरी मेगा ब्लॉक घ्यावा लागतो. आज मुंबईत रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.

मुंबई - पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी मेगाब्लॉक घेतला जातो. येत्या रविवारी २२ जानेवारीला ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्गांवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे हार्बर आणि ट्रान्सहार्बर या मार्गावरील रेल्वे सेवा काही तासांसाठी बंद ठेवली जाणार आहे. याची नोंद घेऊन प्रवाशांनी आपला प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक नसल्याने या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक : मध्य रेल्वे आज जानेवारीला ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्गांवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. ठाणे ते वाशी, नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत वाशी, नेरुळ, पनवेल साठी सुटणाऱ्या डाऊन मार्गावर सेवा आणि वाशी, नेरूळ, पनवेल येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील असेही प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी, वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी ते वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी, बेलापूर, पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे, गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

मुख्य, पश्चिम मार्गे प्रवास करण्याची परवानगी : पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, वडाळा रोडसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना २२ जानेवारीला सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - Buses on Feeder Routes of Best : मेट्रो प्रवाशांसाठी बेस्टच्या फिडर रूटवर बस; मेट्रो प्रवाशांना दिलासा

Last Updated :Jan 22, 2023, 9:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.