ETV Bharat / state

Maratha Reservation Protest : राज्यात हालचालींना वेग! शिंदे-फडणवीसांची रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी बैठक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 7:11 AM IST

Maratha Reservation Protest
Maratha Reservation Protest

Maratha Reservation Protest : राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला सोमवारपासून अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळतय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी बैठक झाली.

मुंबई Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी राज्यात शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यात बहुतांश भागात हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी बैठक झाली. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठही उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांचीही भेट घेतली होती.

बैठकीला छगन भूजबळ उपस्थित : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा या निवासस्थानी एक बैठक झाली. या बैठकीत ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ आणि प्रकाश शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत ओबीसी नेत्यांना धमक्या येत असल्यामुळं त्यांना तात्काळ सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ओबीसी नेत्यांना तात्काळ सुरक्षा देण्याबाबत दोन्हीही नेत्यांना आश्वासन देण्यात आल्याच कळतंय.

  • #WATCH | Mumbai: Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis leaves Chief Minister Eknath Shinde's residence (Varsha) after meeting on Maratha Reservation. pic.twitter.com/yMXcIrGbbO

    — ANI (@ANI) October 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सर्व आमदार आणि खासदारांची बैठक : मुख्यमंत्र्यांनी शिंदे गटाच्या सर्व आमदार आणि खासदारांची बैठकही बोलावलीय. आज सायंकाळी 6 वाजता वर्षा या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. बीडमध्ये या आंदोलनाचा सर्वाधिक फटका राजकीय नेत्यांना बसलाय. आधी माजलगाव येथील आमदार प्रकाश सोळुंके यांच्या निवासस्थानी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती. त्यानंतर बीडमध्येही आंदोलनाचं लोण पसरलंय.

अध्यादेश काढण्याची शक्यता : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर एकीकडं सरकारचे प्रयत्न अपुरे पडत असताना दुसरीकडं मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अतिशय खालावत चाललीय. यामुळं मराठा आंदोलकांनी हिंसक भूमिका घेतल्यानं त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. या सर्व बाबी बघताना राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत पुन्हा अध्यादेश काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाऊ शकतो. मराठा आरक्षणासाठी सरकारचे सर्व प्रयत्न सुरू असले तरी, मराठा समाजानं घेतलेला आक्रमक पवित्रा पाहता सरकार नाईलाजास्तव हा अध्यादेश काढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. Maratha Protest : बीडमध्ये मराठा आंदोलनात राडा! आमदार संदीप क्षीरसागर यांचं घर पेटवलं
  2. Maratha Protest Beed Curfew : मराठा आंदोलक आक्रमक; बीडमध्ये संचारबंदी लागू
  3. Maratha Protest : जालन्यामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी रेल्वे रोको, तासभर वाहतूक खोळंबली
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.