ETV Bharat / state

Prakash Ambedkar Support Manoj Jarange : सत्ताधारी श्रीमंत मराठ्यांनी...; प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 7:58 PM IST

Updated : Oct 30, 2023, 8:34 PM IST

Prakash Ambedkar Support Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीनंही आता पाठिंबा दिलाय. मराठा आरक्षण हा केंद्र आणि राज्य शासनाच्या अखत्यारितला प्रश्न आहे. त्यामुळं आमदार, खासदार यांच्या घरासमोर आंदोलन केलं पाहिजं. तोपर्यंत केंद्र आणि राज्य शासन हा प्रश्न गांभीर्यानं घेणार नाही. त्यामुळं आंदोलनाला त्या पद्धतीनं वळण द्यावं, अशी विनंती 'वंचित'चे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे. याबाबतीत एक पत्र आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठवलं आहे.

Maratha Reservation  News
आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा

मुंबई Prakash Ambedkar Support Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यभर उग्र आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरू केलंय. मात्र, केवळ उपोषणाने हा प्रश्न सुटणार नाही तर निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन केलं पाहिजं, अशी सूचना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पत्राद्वारे जरांगे पाटील यांना केलीये.

काय आहे नेमकं पत्र : गरीब आणि रयतेच्या मराठ्यांच्या आरक्षणासाठी आपण पुढाकार घेऊन मोठं आंदोलन उभं केलं. प्रस्थापित निजामी मराठा नेतृत्वाच्या विरोधात समाजात जागृती निर्माण केली आहे. 2014 नंतर मनुस्मृती मानणाऱ्या व्यवस्थेची घढी दुर्दैवाने देशात आणि राज्यात सत्तेत आली आहे. या सत्तेच्या विरोधात कुणी आवाज बुलंद केला तर त्यांचे मानसिक, सामाजिक, राजकीय खच्चीकरण करून जाती-जातीत भांडण लावून देण्यात येते. हे थांबवणे गरजेचं आहे. आपण प्रामाणिकपणे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी या शोषणा विरुद्ध लढा उभा करीत आहात. त्यासाठी तुमचे आरोग्य उत्तम असणं गरजेचं आहे. समाजात लोकांच्या प्रश्नावर आंदोलन करणारेच राहिले नाहीत तर त्यांची बाजू कोण घेणार? गरीब, रयतेच्या मराठ्यांना आपला फार मोठा आधार वाटत आहे. त्यामुळे आपण स्वतःचा जीव सांभाळावा असं मी आपणास आवाहन करतो.

मराठ्यांच्या प्रश्नाला कधीच महत्त्व दिलं नाही : सत्ता काँग्रेसची असो, भाजपाची असो किंवा राष्ट्रवादीची असो यांनी गरीब मराठ्यांच्या प्रश्नाला कधीच महत्त्व दिलं नाही. उलट सत्ताधारी श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांच्या मतावर स्वतःच्या संपत्तीत आणि सत्तेत निरंतर वाढच केलेली दिसते. आपण पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आणला आहात. आंदोलन व लोक जागृतीद्वारे या विषयावर गांभीर्य निर्माण केलं आहे. परंतु दुर्दैवाने सत्ताधारी राज्यकर्ते अतिशय निर्दयी होऊन आपल्या आमरण उपोषणाला दुर्लक्षित करीत आहेत. वर्तमानातील या सत्तेला मानवीय चेहरा नाहीय असेच म्हणावं लागत आहे. आज अनेक मराठा तरुण या निराशेतून आत्महत्या करीत आहेत. त्यांच्याकडेही सध्याचे 3 पक्षाचे सत्ताधारी राज्यकर्ते दुर्लक्ष करतांना उभा महाराष्ट्र बघत आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी पत्रात नमून केलंय.

आंदोलन करत राहणं ही काळाची गरज : मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शिर्डी येथे येऊन गेले. परंतू, त्यांनी देखील मराठा समाजाच्या आरक्षणाचा साधा उल्लेख देखील केला नाही. या पूर्वीच्या राज्यकर्त्यांप्रमाणेच वर्तमानातील केंद्र आणि राज्य सरकार यांची भूमिका देखील 'येरे माझ्या मागल्या' अशीच आहे. त्यामुळे आता आंदोलन करत राहणं ही काळाची गरज आहे. यासाठी आपण आपली तब्येत सांभाळली पाहीजे. आपण पाणी सुद्धा घेत नाही ही चांगली गोष्ट नाही. आपण किमान नारळाचे पाणी तरी घ्यावं, अशी विनंती प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पत्राद्वारे जरांगे पाटील यांना केली.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation : मराठा आंदोलन चिघळलं! आमदार प्रकाश सोळंकेंच्या कारसह अख्खा बंगलाच पेटवला, पाहा व्हिडिओ
  2. MVA Delegation Met Governor : मराठा आरक्षण प्रकरणी 'मविआ' शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट; विशेष अधिवेशनाची मागणी
  3. Maratha Reservation Protest Live : आमच्या वाट्याला गेलात तर लक्षात ठेवा; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
Last Updated : Oct 30, 2023, 8:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.