ETV Bharat / state

Man in Skirt in Train : भाऊचा नादच खुळा; चक्क स्कर्ट घालून शिरला लोकलमध्ये, 'हे' दिले कारण

author img

By

Published : Mar 22, 2023, 3:52 PM IST

लोकल ट्रेनमध्ये वेगवेगळे व्हिडिओ बनवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ट्रेनमध्ये स्टंटबाजी करणारे व्हिडिओ बनवण्यास सक्त मनाई असतानासुद्धा फक्त सोशल मीडियावर हवा करण्यासाठी अनेक बहाद्दर जोखीम पत्करून व्हिडिओ बनवत असतात. असाच एक मुलगा स्कर्ट घालून लोकलमधील पुरुषांच्या डब्ब्यात शिरल्याचा व्हिडओ समोर आला आहे. स्कर्ट पुरुषपण घालू शकतात. त्यामुळे कोणते कपडे कोणी घालायचे हे ठरवले नाही पाहिजे, असे स्कर्ट घालून गेलेल्या मुलाने सांगितले आहे.

instagram photo
instagram photo

मुंबई - स्कर्ट घातलेला व्हिडिओ शिवम भारद्वाज नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. युजरचे प्रोफाईल बघता असे दिसते की तो एक व्हिडीओ क्रिएटर आहे आणि तो स्वतः या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याने काळ्या रंगाचा स्कर्ट घातला असून त्याच्या डोळ्यांवर चष्मा लावलेला दिसत आहे. तो अचानक ट्रेनच्या डब्यात शिरतो आणि कॅटवॉक करायला लागतो, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. याव

मुलगा स्कर्ट घालून शिरला ट्रेनमध्ये - मुलाची ती स्टाईल पाहून तिथे बसलेले प्रवासी हा मुलगा आहे की मुलगी अशा गोंधळात पडले. काही प्रवाशांनी त्यांचे मोबाईल काढून त्याचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली, तर काही जण त्याला पाहतच राहिले. यादरम्यान त्या मुलाने हा व्हिडीओ शूट देखील केला व त्यानंतर त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

शिवम भारद्वाजची प्रतिक्रिया - शिवमने एखा न्यूज एज्नसीला याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की , मी माझ्या रीलचे इडिटिंग करत असताना लोकल ट्रेनमध्ये माझ्या रॅम्प वॉकबद्दलच्या व्हिडिओवरील लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या व त्या धक्कादायक होत्या. त्यातील काहींनी टोमणे मारत वाकड्या नजरेने बघितले, पण एक माणूस माझ्याकडे आला होता आणि तुम्ही एक कलाकार आहात का? असे विचारले, असे शिवमने सांगितले.

स्कर्ट हा फक्त महिलांनीच घालावा का? - शिवम हा उत्तर प्रदेशातील मेरठमधील रहिवासी आहे. तो पुढे म्हणाला की, मेकअप आणि स्कर्टसारखे कपडे कोणत्याही लिंगासाठी मर्यादित नसावेत. पुरुषसुद्धा स्कर्ट घालू शकतात हे भारतीय समाजाने अजून पाहिलेच नाही, आजूबाजूच्या लोकांसाठी हे खूप धक्कादायक होते. तसेच एखादा मुलगा स्कर्ट घालू शकतो यावर अनेकांचा विश्वासच बसत नाही. सध्या काळ बदलत आहे, वेशभूषा ही फक्त त्या त्या महिला किंवा पुरुषांसाठी मर्यादित नसतात, असे तो म्हणाला.जेव्हा स्त्रिया पॅंटसूट घालू शकतात, तेव्हा पुरुष देखील स्कर्ट घालू शकतात आणि त्याचा त्यांच्या पुरुषत्वावर परिणाम होणार नाही, जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही स्कर्ट घातला तरीही तुम्ही पुरुषच राहाल, असे त्याने सांगितले.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.