ETV Bharat / state

Maharashtra Politics : नाना पटोले हटाव मोहिमेने काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, जाणून घ्या सविस्तर

author img

By

Published : May 30, 2023, 12:20 PM IST

Updated : May 30, 2023, 2:36 PM IST

Maharashtra
Maharashtra

कर्नाटक राज्यातील काँग्रेसच्या यशानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये उत्साह संचारल्याचे चित्र आहे. गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस मधील अंतर्गत धुसफुस समोर आली होती. पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्य पद्धतीवर नाराज होत एका काँग्रेस गटाने त्यांची तक्रार थेट पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली आहे. मात्र, आपणच काँग्रेस अध्यक्ष राहणार असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसमध्ये काय चालले?

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून प्रसार माध्यमावरती विदर्भातील काही नेते दिल्लीत जाऊन बसले आहेत. नाना पटोले हटाव अशा पद्धतीची मोहीम त्यांनी हातात घेतली बातम्या झळकत आहेत. आता देशातील अध्यक्षांची निवड झाली आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांची त्यानंतर देशाची कार्यकारणी जाहीर होणार आहे. त्यानंतर राज्यातील अहवाल मागवला जाईल असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट सांगितलेले आहे. जाणीवपूर्वक नाना पटोले हटाव मोहिमाच्या बातम्या द्यायचा. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला बदनाम करायचं काम विरोधी पक्षाकडून केले जात आहे. अशा प्रकारची कोणती मोहीम सुरू नसून विदर्भातील पक्ष वाढीस संदर्भामध्ये विदर्भातील नेत्यांचे शिष्टमंडळ पक्षश्रेष्ठींना भेटायला गेले आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन काँग्रेस प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी यांनी केले आहे.

काँग्रेस प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी म्हणाले, की उद्धव ठाकरे यांनी आमदारांना तंबी द्यावी. गुरुवारी उद्धव ठाकरे गटाचे काही आमदार विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला गेले होते. भेटी वेळेचा एक व्हिडिओ भाजप आमदार नितेश राणे ट्विटरवर पोस्ट केला आहे. ठाकरे गटाचे आमदारांनी नाना पाटील यांच्या संदर्भात काही स्टेटमेंट केले आहे. त्यासंदर्भात काँग्रेस प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी यांनी उत्तर दिले आहे की, उद्धव साहेब वरून दोस्ती आणि आतून दोस्ती कुस्ती असं जर करायचं असेल हे निश्चितपणे चुकीचे आहे. आपण आपल्या आमदारांना समज द्यावी.

अंबादास दानवे हे जे बोलत आहेत. ते अतिशय चुकीचे आहे. उद्धव ठाकरे यांनी आमदारांकडे लक्ष देऊन पुढे अशी गोष्ट घडणार नाही अशी प्रकारची तंबी राहिलेल्या आमदारांना दिली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे-काँग्रेस प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी

आशिष देशमुख यांनी सर्वात पहिली हटविण्याची केली मागणी- नाना आणि पक्षांतर्गत वाद नवा नाही. विदर्भातील काँग्रेस नाना पटोले यांची फेब्रुवारी 2021 मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. यापूर्वी त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्याकाळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. नानांकडे जबाबदारी आल्यानंतर त्यांच्या विरोधात तक्रारी वाढल्या. सर्वात पहिले काँग्रेसचे आशिष देशमुख यांनी नानांच्या कार्यपद्धती वरती प्रश्नचिन्ह निर्माण करत नानांना हटवा अशी मागणी केली.

नानांच्या कार्य प्रणालीवर शंका-विधान परिषद निवडणूक वेळी देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींकडे पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. महाराष्ट्र काँग्रेस निरीक्षक रमेश चिन्नीथाला काँग्रेसच्या 21 नेत्यांनी भेट घेऊन नानांना हटवा अशा प्रकारची मागणी केली होती. त्यातच आता विदर्भातीलच नेत्यांकडून नानांच्या कार्य प्रणालीवर शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून नाना पटोले यांना विरोध झाला आहे.

अंतर्गत गटबाजी भोवणार- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. याचं पूर्ण श्रेय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांना जाते. दोघा नेत्यांनी चांगल्या पद्धतीने भारत जोडो यात्रेची जबरदस्त तयारी केली होती. त्यामुळेच भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात यशस्वी झाली. त्याचा परिणाम देखील त्यानंतर झालेल्या काही निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला. उदाहरण द्यायचं झालं तर बाजार समिती असो किंवा पोट निवडणुकीमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाले. स्थानिक पातळीवर च्या निवडणुकीमध्ये मिळालेले यशाचे श्रेय या स्थानिक नेत्याला जात असतं तसंच अपयश येतं तेव्हा देखील त्याचा श्रेय या स्थानिक नेत्याला जात असते. त्यामुळे नाना पटवले यांची स्ट्रॅटर्जी त्या काळात कामाला आली. मधल्या काळामध्ये खूप घडामोडी घडल्या नानांनी दिल्लीवारी केली. काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या भेटी घेतल्याने नानांचे पद कायम राहे.

विजय वडेट्टीवार हे अतिशय महत्त्वाकांक्षी - राजकीय विश्लेषक विवेक भावसार म्हणाले, मुंबई काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. नाना पटोले यांना मात्र दिल्लीचा आशीर्वाद होता. आता विदर्भातील नेत्यांनीच नानांच्या विरोधामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे तक्रार केली आहे. या नेत्यांमध्ये विजय वड्डेटीवार, सुनील केदार, शिवाजीराव मोघे यांचा समावेश होता. खरे तर मोघेही थकले आहेत. त्यांनी आता सक्रिय राजकारणातून बाहेर जायला हवे. विजय वडेट्टीवार हे अतिशय महत्त्वाकांक्षी आहे, अनेक पदे दिले त्यासोबत मंत्रिपद देखील दिले. विदर्भात कायमच नाना पटोले विरुद्ध विदर्भातील नेते त्यात विजय वडेट्टीवार, नितीन राऊत अशा प्रकारचा वाद नेहमीच पाहायला मिळत आहे.

मतभेद बाजूला ठेवले तर मोठे यश- विजय वडेट्टीवार यांनी नानांना बदला असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. येणाऱ्या काळामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका त्यासोबत जिल्हा परिषदेच्या देखील निवडणुका होणार आहे. अशा काळात पक्षाचा अध्यक्ष बदलणे म्हणजे काँग्रेसच मोठ नुकसान होणार आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसला आज चांगले दिवस आलेले आहे. लोक स्वतःहून काँग्रेसच्या सोबत येत आहे. पक्षातील नेत्यांनी आपापसातले मतभेद बाजूला ठेवले तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला चांगलं यश मिळू शकते.

विदर्भ हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला- पदावरती डोळा ठेवून जर विजय वडेट्टीवार अशा प्रकारचा गेम करणार असाल तर काँग्रेसचे यात मोठ नुकसान होणार आहे. विदर्भ हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. आपापसातले मतभेद बाजूला ठेवून काँग्रेस पक्षाला विदर्भात भरघोस असे यश येऊ शकते मात्र आपापसातल्या वाद बाजूला ठेवून राज्यात सत्ता मिळवणे हे उद्दिष्ट असायला हवे दुर्दैवानं असं दिसत नसल्याचं राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी बोलून दाखवलं. काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी लवकरात लवकर थांबवण्यात पक्षश्रेष्ठींना जर यश आलं नाही तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो अशा प्रकारचे अंदाज राजकीय विश्लेषक बांधत आहेत.

काँग्रेसमधील नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये कोणतेही तारतम्य नाही. या पक्षातील नेते एकमेकांसोबतच स्पर्धा करत असतात, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस बाबत नेहमीच केली जाते. आता सुद्धा प्रदेश काँग्रेसच्या राजकारणात असेच काहीसे सुरू आहे. 2024 च्या निवडणुका तोंडावर आहेत. या दृष्टीने सर्वच पक्ष आपली संपूर्ण ताकद पणाला लावून निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेसमध्ये मात्र प्रदेशाध्यक्ष पदाच्या नावावरून रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा आहेत. काँग्रेसमधील नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वावर नाराज असल्याचे बोलले जाते.

येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मीच अध्यक्ष असेल. माझे कोणीही काहीही वाकडे करू शकणार नाही. सध्या तरी या सर्व गोष्टींवर पडदा पडलेला आहे. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला जास्तीत जास्त जागा निवडून देऊन कसे विजयी करता येईल याबाबत सध्या आमच्या चर्चा आणि बैठका सुरू आहेत- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले


चर्चांना काँग्रेसमध्ये स्थान नाही- काँग्रेसच्या अंतर्गत कलहाबाबत चर्चा सुरू असतानाच आज काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीतील नेते व माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी मुंबईत येऊन काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर चिदंबरम यांनी काँग्रेसच्या दादर येथील कार्यालयात एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदाबाबत विचारले असता त्यांनी 'आगामी निवडणुका माझ्याच अध्यक्षतेखाली होतील' अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे या गोष्टींवर आता पडदा पडलेला आहे. अशा गोष्टींना आणि चर्चांना काँग्रेसमध्ये कोणतेही स्थान नाही, अशा कडक शब्दात नाना पटोले यांनी पक्षांतर्गत असलेल्या विरोधकांना सुनावले आहे.



काँग्रेसमधील नेते दिल्लीत गेल्याची झाली होती चर्चा- बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले काँग्रेसचे महाराष्ट्रातील नवे प्रदेशाध्यक्ष झाले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पदभार स्वीकारल्यानंतर काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा एक गट त्यांच्या नेतृत्वावर नेहमीच नाराज असल्याच्या चर्चा राजकारणात आजही चालतात त्यातच काही दिवसांपूर्वी नाना पटोले विरोधी गटाचे नेते दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून आल्याच्या बातम्या देखील देण्यात आल्या होत्या. नाना पटोले यांना पाय उतार व्हावे लागेल असा दावा काँग्रेसचे नेते अनेक वेळा खासगीत करतात. त्यामुळे काँग्रेसमध्ये नेमके काय चालले? हे अद्याप देखील कोणालाही स्पष्टपणे सांगता आले नाही.

हेही वाचा-

  1. Nana Patole Criticism BJP: सोशल मीडियाच्या माध्यमांतून जातीय दंगली घडविण्याचा भाजपचा डाव- नाना पटोले
  2. Complaint Against Nana Patole : काँग्रेसमधील खदखद पुन्हा बाहेर; नाना पटोलेंवर विजय वडेट्टीवार नाराज,तक्रारीसाठी गाठली दिल्ली
  3. Nana Patole : मोहन भागवतांना भेटल्यावर समीर वानखेडे यांची चौकशी का? नाना पटोले यांचा गंभीर सवाल
Last Updated :May 30, 2023, 2:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.