ETV Bharat / state

Breaking News : महापालिका वॉर्डात उभे राहा; मुख्यमंत्री शिंदेंचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

author img

By

Published : Feb 7, 2023, 7:10 AM IST

Updated : Feb 7, 2023, 10:08 PM IST

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra Breaking News

22:07 February 07

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -

कोस्टल रोडच्या त्या पिलर पेक्षा तुम्ही मुंबईचे पिलर आहात.. तुम्ही आम्हाला हवे आहात म्हणून धाडसी निर्णय घेतला..

डिझेल परतावा, सिमांकन, गोल्फा देवी मंदिर सुशोभीकरण पुनर्विकास आदी प्रश्न सोडवू. देवी मंदिर सुशोभीकरणासाठी लागेल तितका पैसा देवू. रोजगारासाठी नवीन योजना लागू करू.. आम्ही बोलतो ते करतो

मुंबईची एकही इंच जागा देणार नाही

जे घालवायचे ते आम्ही ६ महिन्यापूर्वी घालवले

आम्ही मेहनत करून इथपर्यंत आलो आहोत .. कोणाला आवाहन देता..

गद्दार आणि खोके हे दोनच शब्द त्यांना माहीत..

मी छोटी आव्हाने स्वीकारत नाही मोठी आव्हाने स्वीकारतो

अधिकाराचा वापर तुमच्या भल्यासाठी करत आहोत

मला लोकांसाठी काम करायचे आहे म्हणून असल्या लोकांना बोलू द्या

22:00 February 07

महापालिका वॉर्डात उभे राहा; मुख्यमंत्री शिंदेंचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई -महापालिका वॉर्डात उभे राहा, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

21:01 February 07

राखी सावंतचा पती आदिल दुर्रानीला पोलिसांनी केली अटक

मुंबई - राखी सावंतचा पती आदिल दुर्रानीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

19:58 February 07

कल्याण भिवंडी मार्गावर फर्निचर कारखान्याला भीषण आग

ठाणे - कल्याण भिवंडी मार्गावर फर्निचर कारखान्याला भीषण आग लागली आहे. आगीत लाखोंचे फर्नीचर जळून खाक झाले आहे. आग विझवण्याचे काम सुरू आहे.

19:52 February 07

शिवनेरीवर कायमचा भगवा फडकवण्याची परवानगी मिळावी - खा. कोल्हे यांची लोकसभेत मागणी

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारला रोखठोक सवाल विचारला आहे. मोदी सरकार शिवनेरीवर कायमचा भगवा लावण्यास परवानगी देईल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ते लोकसभेत बोलत होते. पुरातत्व खात्याच्या नियमांमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असणा-या किल्ले शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा ध्वज फडकवला जात नाही. याबाबत कोल्हे यांनी आज लोकसभेत मुद्दा उपस्थित केला.

19:26 February 07

आफताबने दगडी खलबत्यात श्रद्धाची हाडे कुटली होती, दिल्ली पोलिसांचा आरोपपत्रात दावा

नवी दिल्ली : आफताब पूनावाला याने लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हाडे दगडी खलबत्त्यात घालून कुटल्याची कबुली दिली आहे. तिच्या कवटीचा एक भाग त्याने तीन महिन्यांनंतर फेकून दिला होता. दिल्ली पोलिसांनी त्यांच्या 6,600 पानांच्या आरोपपत्रात ही माहिती दिली आहे. आफताबने 18 मे रोजी श्रद्धाची हत्या केल्यानंतर झोमॅटोवरून मागवलेल्या चिकन रोलवर ताव मारला होता असेही या आरोपपत्रात म्हटले आहे.

19:22 February 07

बीड जिल्ह्यात बायकोचा खून करून आरोपी थेट पोलीस ठाण्यात हजर

बीड - कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे. पती बायकोचा खून करून थेट पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. बीडमधील ही घटना आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

19:19 February 07

WPL साठी 409 खेळाडूंचा होणार लिलावात, हरमनप्रीत स्मृतीचा किंमत सर्वाधिक

WPL खेळाडूंच्या लिलावात 409 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. यामध्ये सर्वाधिक राखीव किंमत असलेल्या खेळाडूंमध्ये हरमनप्रीत, स्मृती, एक्लेस्टोन, पेरी यांचा समावेश आहे.

19:03 February 07

मद्यधुंद अवस्थेत मित्राची हत्या करणाऱ्या व्यक्तीला अटक

ठाणे - मंगळवारी एका 24 वर्षीय तरुणाने मद्यधुंद अवस्थेत आपल्या मित्रावर हल्ला करून त्याची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्ह्यातील शिळ भागातील एका खदानीमध्ये पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. पीडित अमजत खान (२३) हा आरोपींसोबत दारू पीत होता. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांनी दिली.

18:26 February 07

पालघरमध्ये घर खरेदी करणाऱ्यांची 50 लाख रुपयांची फसवणूक, एकाला अटक

पालघर - वसई विरार भागात घर खरेदीदारांची फसवणूक करणारे रॅकेट चालवणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. अधिकाऱ्याने माहिती दिली. पोलिसांनी रविवारी 28 वर्षीय व्यक्तीला अटक केली. त्याने इतर चार जणांसह घर खरेदी करणाऱ्यांची 50 लाख रुपयांची फसवणूक केली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले.

18:12 February 07

विमानतळावर धमकीच्या कॉल प्रकरणी गोवंडी परिसरातून तरुणाला अटक

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर धमकीच्या कॉल प्रकरणी पोलिसांनी मुंबईच्या गोवंडी परिसरातून एका २५ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली.

18:09 February 07

राहुल गांधींच्या आरोपांचा भाजपने केला निषेध, प्रसाद म्हणाले आरोप बिनबुडाचे

आज संसदेत बोलताना राहुल गांधींनी सरकारवर केलेल्या निराधार आरोपांचा निषेध करतो, असे भाजप नेते रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, मला त्यांना विचारायचे आहे की नॅशनल हेराल्ड आणि ऑगस्टा वेस्टलँड घोटाळे काय आहेत?

18:04 February 07

मनसेची राज्यात पर्यटन वाढीसाठी कसिनोला परवानगीची मागणी?

मनसेचे नेते मनोज चव्हाण यांनी राज्य सरकारला पत्र लिहून राज्यात पर्यटन वाढीसाठी अनेक उपाय सुचवले आहेत. त्यांनी त्यामध्ये गेमिंग धोरण तयार करुन एकप्रकारे कसिनोची सुविधा सुरू करण्याचेही सुचवले आहे.

17:16 February 07

महारेरा विकासकांना वर्गीकृत आणि रेट करू शकते हायकोर्टाची सरकारला विचारणा

मुंबई - महारेरा विकसकांना वर्गीकृत आणि रेट करू शकते का याची विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली आहे. राज्याचे गृहनिर्माण नियामक महारेरा खासगी विकासकांची ओळख, वर्गीकरण आणि प्रतवारी करू शकतील का, जेणेकरून सोसायट्या आणि इतर प्राधिकरणे बिल्डरची निवड करताना माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतील असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडे मागितली आहे.

17:13 February 07

म्हाडा औरंगाबाद मंडळातर्फे ९३६ सदनिकांची 22 मार्चला सोडत

मुंबई - म्हाडा औरंगाबाद मंडळातर्फे ९३६ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. नूतन सोडत प्रणालीनुसार नोंदणीकरण प्रक्रियेतच अर्जदार पात्र ठरणार आहे. २२ मार्च रोजी पात्र अर्जांची सोडत निघणार आहे.

16:52 February 07

वन विभागाच्या ट्रेकरला चार हत्तींच्या कळपाने तुडवून ठार मारले

आंध्र प्रदेशातील मन्याम जिल्ह्यातील पासुकुडी गावात प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असताना लक्षीनारायण नावाच्या वन विभागाच्या ट्रेकरला चार हत्तींच्या कळपाने तुडवून ठार मारले. त्याच्या कुटुंबाला सानुग्रह अनुदान दिले जाईल असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

16:45 February 07

गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन पलायन केल्याप्रकरणी ज्वेलर्सविरुद्ध गुन्हा

ठाणे - ग्राहकांचे दागिने गहाण ठेवून गुंतवणूकदारांच्या पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी एका ज्वेलर्सविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम 406 (गुन्हेगारी विश्वासघात) आणि 420 (फसवणूक) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला होता. परंतु कोणालाही अटक करण्यात आली नाही, असे एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.

16:39 February 07

कल्याणमध्ये स्कायवॉकवर एका व्यक्तीने घेतला गळफास

ठाणे - एका 25 वर्षीय तरुणाने मंगळवारी स्कायवॉकवर गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, कल्याण रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकच्या रेलिंगला त्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पहाटे 4 च्या सुमारास घडली.

16:32 February 07

धुक्यामुळे सात विमाने चेन्नई विमानतळावर उतरू शकली नाहीत, धुके विरल्यानंतर वाहतूक सुरळीत

धुक्यामुळे बंगळुरू, हैदराबाद, मुंबई आणि दुबई येथून येणारी सात विमाने चेन्नई विमानतळावर उतरू शकली नाहीत. हवामान सामान्य झाल्यानंतर उड्डाणे सुरू झाली. चेन्नई विमानतळ प्राधिकरणाने ही माहिती दिली.

16:27 February 07

मंगळुरू विषबाधा प्रकरणी सिटी हॉस्पिटल विरोधात गुन्हा दाखल

मंगळुरु - अन्नातून विषबाधा झाल्याच्या घटनेनंतर आणि जिल्हा प्रशासनाकडे या घटनेची तक्रार केली नाही. त्यामुळे सिटी हॉस्पिटल प्रशासन विभाग आणि सिटी नर्सिंग कॉलेज वसतिगृह प्रशासन विभागाविरुद्ध एफआयआर नोंदवला गेला आहे. जिल्हा आरोग्य पथकाने महाविद्यालयातील अन्न व पाण्याचे नमुने गोळा केले आहेत.

15:59 February 07

देऊळवाडी भरडाला भीषण आग, सुमारे 5 एकर काजू बागा जळून खाक

सिंधुदुर्ग - सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहरात देऊळवाडी भरडाला भीषण आग लागली. त्यामध्ये सुमारे 5 एकर क्षेत्रातील काजू बागायती जळून खाक झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. काजू हंगामाच्या तोंडावरच बागायती जळल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.

15:54 February 07

सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शिवजयंतीला ठाण्यात सत्कार

ठाणे - सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा येत्या शिवजयंतीला ठाण्यात जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सकल मराठा समाजाच्या मुख्य पदाधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्री यांची त्यासाठी भेट घेतली. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्याविषयी देखील यावेळी चर्चा झाली.

15:47 February 07

भूकंपग्रस्त सिरियाला भारत मदत करणार, मात्र पाकिस्तानचा विमाने हद्दीतून नेण्यास नकार

भारत आज भारतीय हवाई दलाच्या C-130J सुपर हरक्यूलिस वाहतूक विमानातून सीरियाला वैद्यकीय साहित्य पाठवणार आहे. इतरही साहित्य पाठवण्यासाठी इंडोगोने मोफत सेवा देण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे पाकिस्तानने आपल्या हवाई हद्दीतून मदतीसाठीची भारतीय विमाने नेण्यास परवानगी नाकारली आहे.

15:44 February 07

पाकिस्तानचे तुकडे पाडून मोदींनी आपले नाव इतिहासात नोंदवावे - प्रवीण तोगडिया

यवतमाळ - हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या पाकिस्तानचे तुकडे पाडून मोदींनी आपले नाव इतिहासात नोंदवावे अशी अपेक्षा डॉक्टर प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केली आहे. ते येथे बोलत होते.

15:42 February 07

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपी मिशेलचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपी ब्रिटीश नागरिक ख्रिश्चन मिशेलचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला.

15:35 February 07

दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी २-३ महिन्यांत पूर्ण होईल, आरोपींना जामीन नको : सीबीआय

मुंबई - केंद्रीय अन्वेषण विभागाने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की, 2013 मध्ये झालेल्या नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा खटला येत्या दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीबाआयने जामिनाला विरोध केला. खटल्यातील एका आरोपीच्या याचिकेवर सुनावणीवेळी ही माहिती देण्यात आली. खटल्याला उशीर झाल्याच्या कारणावरून आरोपी वीरेंद्रसिंह तावडे याने जामीन मागितला होता. 2016 मध्ये त्याला या प्रकरणी अटक करण्यात आली होती.

15:27 February 07

श्रीलंकेत पंतप्रधान मोदींचा अदानी यांना पवन ऊर्जा प्रकल्प देण्यासाठी दबाव - राहुल गांधी

2022 मध्ये, श्रीलंका अध्यक्ष राजपक्षे यांनी सांगितले होते की पंतप्रधान मोदींनी अदानी यांना पवन ऊर्जा प्रकल्प देण्यासाठी दबाव टाकला होता. हे भारताचे परराष्ट्र धोरण नाही, अदानींच्या व्यवसायाचे धोरण आहे असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला.

15:21 February 07

मोदी अदानींच्या विमानातून फिरायचे आता अदानी मोदींबरोबर फिरतात, यांना निवडणूक फंड किती मिळाला?

आधी पंतप्रधान मोदी अदानींच्या विमानात प्रवास करायचे आता अदानी मोदीजींच्या विमानात प्रवास करतात. हे प्रकरण आधी गुजरातचे होते, नंतर भारताचे झाले आणि आता आंतरराष्ट्रीय झाले आहे. अदानींनी भाजपला गेल्या 20 वर्षांत आणि निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून किती पैसे दिले? असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला.

15:18 February 07

डुप्लिकेट वेबसाईटद्वारे लाखोंची फसवणूक करणाऱ्या आरोपींना सायबर सेलकडून अटक

मुंबई - हायप्रोफाईल रिसॉर्टच्या नावाखाली डुप्लिकेट वेबसाईट तयार करून लाखोंची फसवणूक करणाऱ्या आरोपींना दहिसर पोलिसांच्या सायबर सेल विभागाने अटक केली आहे. हायप्रोफाईल रिसॉर्टसारखीच दुसरी डुप्लिकेट वेबसाइट तयार करून हे दोघे भाऊ रिसॉर्ट बुकिंगच्या नावाखाली लाखो रुपये घेऊन लोकांची फसवणूक करायचे. या दोन भावांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधील डझनभर लोकांना लाखोंची फसवणूक केली आहे.

15:13 February 07

पंतप्रधान काय जादू करतात काय माहीत, ते बांगला देशला जातात आणि अदानींना कंत्राट मिळते कसे?

पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाला गेले आणि काय जादू झाली कुणास ठावून. SBI ने अदानींना 1 बिलियन डॉलरचे कर्ज दिले. दुसरीकडे पंतप्रधान बांगलादेशला काय जातात आणि त्यानंतर बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्ड अदानींसोबत 25 वर्षांचा करार काय करतो. ही नेमकी जादू काय आहे.

15:08 February 07

राहुल गांधी यांनी अदानींसंदर्भात पुराव्यानिशी आरोप करावे - रिजिजू यांचा सल्ला

आरोप करण्यापूर्वी पुरावे द्या अशी मागणी केंद्रिय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांच्याकडे केली आहे. राहुल गांधींच्या अदानी संदर्भांत लोकसभेतील वक्तव्यावर कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी असे पुराव्याशिवाय आरोप करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

15:04 February 07

ड्रोनचे कंत्राट अदानींना कसे मिळते - राहुल गांधींचा सवाल

अदानींनी ड्रोन कधीच बनवले नाहीत पण एचएएल, भारतातील इतर कंपन्या ते करतात. असे असूनही पंतप्रधान मोदी इस्रायलला जातात आणि अदानी यांना कंत्राट मिळते. हे कसे होते यावर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सवाल उपस्थित केला.

14:56 February 07

विमानतळाबाबत अनुभव नसलेल्यांना काम दिले हे योग्य नाही - राहुल गांधी

नवी दिल्ली - विमानतळाचा पूर्व अनुभव नसलेल्या व्यक्तीला विमानतळांच्या विकासात सहभागी होता येणार नाही असा नियम आहे. हा नियम भारत सरकारने बदलला. हे योग्य नाही असे अदानींचे नाव न घेता राहुल गांधी यांनी लोकसभेत सुनावले.

14:49 February 07

सगळे बाजूला ठेवून आपण फक्त अदानीवर बोलत आहोत ही शोकांतिका - राहुल गांधी

सगळे बाजूला ठेवून आपण फक्त अदानीवर बोलत आहोत ही शोकांतिका आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आरहे. काश्मीर, हिमाचलच्या सफरचंदांपासून ते बंदरे, विमानतळ आणि अगदी ज्या रस्त्यांवर आपण चालत आहोत त्याबाबत आपण काहीही बोलत नाही.

14:47 February 07

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेचा सांगितला अनुभव, अग्निवीरबाबत दिला इशारा

नवी दिल्ली - राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेचा अनुभव सांगितले. अग्निवीर संदर्भात शस्त्रांचे प्रशिक्षण दिल्याने तरुण हिंसात्मक बनतील असा इशारा निवृत्त जवानांनी दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

14:30 February 07

ठाणे जिल्ह्यात मोटारसायकल चोरीप्रकरणी एकाला अटक

ठाणे - काशिमीरा परिसरात एका 23 वर्षीय तरुणाला मोटारसायकल चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. काशिमिरा येथे मोटारसायकल चोरीच्या अनेक तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या. त्या परिसरात पोलीस लक्ष ठेऊन होते, असे वरिष्ठ निरीक्षक अविराज कुऱ्हाडे यांनी सांगितले.

14:25 February 07

ठाण्याच्या माजी महापौरांचे आदित्य ठाकरेंना थेट आव्हान

ठाणे - ठाण्याच्या माजी महापौरांनी आदित्य ठाकरेंना थेट आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर माझ्या मतदारसंघातून नगरसेवकपदाची निवडणूक लढवून दाखवा, असे ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्याची गोष्ट नंतर करा, आधी ठाण्यातून नगरसेवकपदी निवडून या. ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांना याबाबत आव्हान दिले आहे.

14:23 February 07

थोरातांच्या राजीनाम्याबाबत माहिती नाही - एच. के. पाटील

मुंबई - महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांनी सीएलपी नेतेपदाचा राजीनामा दिल्याची मला कल्पना नाही, असे म्हटले आहे. तसेच, दिल्लीला जात असून हायकमांडला या विषयावर माहिती देईन, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

13:45 February 07

तुर्कीला पाचवा भूकंप, सर्वत्र मृत्यू आणि भयाचे तांडव

अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण संस्थेनुसार 5.4 तीव्रतेच्या पाचव्या भूकंपाने पूर्व तुर्कीला हादरा दिला. दोन्ही देशात मोठ्या प्रमाणावर विनाश आणि मृत्यू दिसत आहेत. मृतांची संख्या 5,000 वर पोहोचली आहे.

13:42 February 07

नवी मुंबई आणि गेटवे ऑफ इंडिया दरम्यानच्या फेरी सेवेचे उद्घाटन

ठाणे - बंदरे मंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी नवी मुंबईतील बेलापूर ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया दरम्यानच्या फेरी सेवेला हिरवा झेंडा दाखवला. प्रवाशांना यातून वाहतुकीचा दुसरा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ही फेरी तासाभरात हे अंतर कापेल, असे त्यांनी सांगितले.

13:38 February 07

ट्रान्सपोर्ट ऑपरेटरची ७५,००० रुपयांची सायबर फसवणूक

ठाणे - शहरातील एका 60 वर्षीय ट्रान्सपोर्ट ऑपरेटरची सायबर फसवणूक करणाऱ्यांनी 75,000 रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. त्यानंतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे चितळसर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले.

13:35 February 07

प्रस्तावित फ्लोटिंग हॉटेलच्या मंजुरीवर अंतिम निर्णय घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने शहर नागरी प्रमुखांना किनार्‍यापासून दोन नॉटिकल मैल अंतरावर प्रस्तावित फ्लोटिंग हॉटेलच्या बांधकामाला परवानगी देण्याबाबत आठ आठवड्यांत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

13:14 February 07

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपांत 4,600 लोकांचा मृत्यू

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपांत आतापर्यंत 4,600 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारताने आतापर्यंत भूकंपग्रस्त तुर्कीमध्ये दोन बचाव पथके पाठवली आहेत.

13:05 February 07

राखी सावंतच्या पतीला मुंबई पोलिसांकडून अटक

राखी सावंतशी लग्न करणाऱ्या आदिल दुर्राणीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

13:03 February 07

विमानतळावर इंडियन मुजाहिदीन नावाने धमकीचा फोन, पोलीस यंत्रणा सतर्क

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडियन मुजाहिदीन नावाच्या दहशतवादी संघटनेच्या नावाने धमकीचा फोन आला. त्यानंतर मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा विमानतळावर सतर्क झाल्या असून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडियन मुजाहिदीन नावाच्या दहशतवादी संघटनेच्या नावाने धमकीचा फोन आल्यानंतर मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा विमानतळावर सतर्क झाल्या आहेत. त्यातच येत्या 10 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा असल्याकारणाने देखील तपास यंत्रणा अधिकच सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.

12:47 February 07

अदानीसारखे लोक सर्वसामान्यांची लूट करत आहेत - नाना पटोले

अदानीसारखे लोक सर्वसामान्यांची लूट करत आहेत. लोकांवर मोठ्या प्रमाणात जीएसटी आकारला जातो. श्रीमंत दिवसेंदिवस श्रीमंत होत आहेत पण गरीब आणि मध्यमवर्ग उद्ध्वस्त होत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. केंद्रसरकार अदानी सारख्या लोकांना संरक्षण देत आहे आणि संसदेत चर्चेसाठी तयार नाही, अशी टीकाही पटोले यांनी केली.

12:41 February 07

निराधार गुन्हेगारी आरोप प्रतिष्ठेला कलंकित करतात, असे होता कामा नये - हायकोर्टाचे निरीक्षण

मुंबई - हायकोर्टाच्या न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई आणि न्यायमूर्ती आर एम जोशी यांच्या खंडपीठाने एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे निरीक्षण नोंदवले आहे. प्रतिष्ठेचा अधिकार हा घटनेच्या अनुच्छेद २१ आणि १९ (२) चा एकात्मिक भाग आहे. निराधार गुन्हेगारी आरोप प्रतिष्ठेला कलंकित करतात आणि बदनामी करतात. अशा बदनामीचा कलंक पुसला जाऊ शकत नाही, असे औरंगाबाद खंडपीठाने एफआयआर रद्द करताना म्हटले आहे.

12:39 February 07

मॉकड्रिलमध्ये विशिष्ट समुदायाला दहशतवादी दाखवण्यास पोलिसांना हायकोर्टाचा मज्जाव

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एका अंतरिम आदेशात पोलिसांना विशिष्ट समुदायातील व्यक्तींना दहशतवादी म्हणून दाखविणाऱ्या मॉक ड्रीलवर प्रतिबंध केला आहे.

12:37 February 07

हिलरी क्लिंटन औरंगाबादच्या एलोरा लेणी, घृष्णेश्वर मंदिराला भेट देणार

औरंगाबाद - अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन मंगळवारी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात येणार असून बुधवारी त्या जगप्रसिद्ध एलोरा लेण्यांना भेट देतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

12:33 February 07

अदानी मुद्यावरुन राज्यसभा दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब

नवी दिल्ली - विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहाच्या हौद्यात जाऊन पंतप्रधानांनी सभागृहात येऊन अदानी वादावर उत्तर देण्याची मागणी केली. या गदारोळात राज्यसभा दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.

12:04 February 07

जुहू येथे झाडाला लटकलेला मृतदेह सापडला

मुंबईतील जुहू येथे एका झाडाला लटकलेला मृतदेह सापडला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. जुहू पोलिसांनी ही माहिती दिली.

12:01 February 07

धमकीचे फोन आल्यानंतर मुंबई विमानतळावरील पोलीस आणि इतर यंत्रणा सतर्क

मुंबई - सोमवारी धमकीचे फोन आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणांना सतर्क करण्यात आले. कॉलरने स्वत:ची ओळख इरफान अहमद शेख आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य म्हणून दिली. यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे.

11:08 February 07

बाळासाहेब थोरात यांचा काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा

बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात वाद विकोपाला गेला आहे.

10:44 February 07

चंद्रपूरचा ज्ञानेश जेईई मेनमध्ये अव्वल, 5 वर्षांपासून कोटामध्ये करत होता तयारी

महाराष्ट्रातील चंद्रपूरचा ज्ञानेश जेईई मेनमध्ये अव्वल आला आहे. तो कोटामध्ये 5 वर्षांपासून तयारी करत होता.

10:14 February 07

आदित्य ठाकरेंनी आव्हान दिल्यानंतर शिंदे गटात खळबळ-संजय राऊत

राज्यात शिंदे सरकारचे फक्त सोहळे सुरू असल्याचा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. आदित्य ठाकरेंनी आव्हान दिल्यानंतर शिंदे गटात खळबळ झाल्याचेही त्यांनी सांगितले.

09:48 February 07

चिंचवडमधून नाना काटे यांना राष्ट्रवादीकडून उमदेवारी जाहीर

चिंचवडमधून नाना काटे यांना राष्ट्रवादीने उमदेवारी जाहीर केली आहे. याबाबतची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

09:11 February 07

इराणी दरोडेखोराला मुंबई पोलिसांकडून अटक

मोहम्मद झाकीर सय्यद यांना रविवारी 26 पोलीस, रुग्णवाहिका चालक आणि पोलीस माहिती देणाऱ्यांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले. चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग होता. त्याला वाचवण्यासाठी काही इराणी महिलांनी दगडफेक केली आणि 5-6 पोलीस जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

08:19 February 07

ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

ऑस्ट्रेलियाचा T20I कर्णधार अॅरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

08:17 February 07

अतिरिक्त पोलीस महासंचालक अभिनव कुमार यांना हार्वर्ड विद्यापीठात वक्ता म्हणून निमंत्रण

हार्वर्ड युनिव्हर्सिटी, यूएस येथे 11-12 फेब्रुवारी रोजी होणार्‍या वार्षिक भारत परिषदेच्या उत्तराखंडचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अभिनव कुमार यांना वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

08:01 February 07

भारताकडून तुर्कस्थानला मदतीचे साहित्य विमानातून रवाना

भारतीय हवाई दलाचे C-17 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) शोध आणि बचाव पथकांसह तुर्कीला काल रात्री रवाना झाले. हे विमान एका मोठ्या मदत प्रयत्‍नाचा एक भाग असल्याचे हवाई दलाने म्हटले आहे.

07:48 February 07

पाकिस्तानला उपरती, विकिपीडिया अनब्लॉक करण्याचे दिले आदेश

पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी अधिकार्‍यांना विकिपीडिया अनब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. ऑनलाइन ज्ञानकोश असलेल्या विकिपीडियात ईश्वराची निंदा होत असल्याचा पाकिस्तान सरकारकडून दावा करण्यात आला होता.

07:19 February 07

तुर्की आणि सीरियातील भूकंपातील मृतांची संख्या 3800 हून अधिक

तुर्की आणि सीरियातील भूकंपातील मृतांची संख्या 3800 च्या पुढे झाली आहे. तर भूकंपात 15,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

07:16 February 07

महिला डॉक्टरची सायबर गुन्हेगाराकडून २ लाखांची फसवणूक

मुंबई : वाकोला येथील एक महिला डॉक्टर सायबर ठगांच्या फसवणुकीची बळी ठरली आहे. प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली महिलेची सुमारे दोन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या संदर्भात महिलेने वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

06:44 February 07

Maharashtra Breaking News : आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम, काय आहे भाजपची रणनीती?

मुंबई : माजी मंत्री आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज कार्यक्रम आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी यांनी आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघाला हादरा देण्याची रणनीती आखली आहे. मुंबईत शिवसेनेची ताकद आहे. मुंबई मनपात गेली २५ वर्षे शिवसेनेने सत्ता राखली आहे. या सत्तेला सुरुंग लावण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत. शिवसेना चिन्हावर निवडणूक आलेले यामिनी जाधव, सदा सरवणकर, दिलीप मामा लांडे, मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे हे पाच आमदार तर गजाजन किर्तीकर आणि राहुल शेवाळे हे दोन खासदार शिंदे गटात दाखल झाले आहेत. शिवसेनेत पडलेल्या फुटीचा फायदा होईल, असा भाजपचा मानस आहे.

Last Updated :Feb 7, 2023, 10:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.