ETV Bharat / state

कोरोनावर भारतीय लस : आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली 'ही' महत्त्वाची माहिती

author img

By

Published : Jul 4, 2020, 12:11 AM IST

Maharashtra health minister rajesh tope on Bharat biotech COVAXIN
कोरोनावर भारतीय लस : आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली 'ही' महत्त्वाची माहिती

लसीच्या ७ जुलै पर्यंत क्लिनीकल ट्रायल्स व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. साधारणपणे १५ ऑगस्टपर्यंत प्री-क्लिनीकल आणि क्लिनिकल ट्रायलचे काम पूर्ण होऊन पहिली भारतीय बनावटीची लस तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे डॉ. भार्गव यांनी सांगितल्याचे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.

मुंबई - कोरोना प्रतिबंधासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमार) व भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल ) यांच्या एकत्रित प्रयत्नातून पहिली भारतीय लस तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याच्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये यश मिळाल्यावर भारतात निर्मित होणाऱ्या या लसीबाबत आशादायी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी सांगितले.

लसी संदर्भात प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, 'लसीबाबत आयसीएमआरचे संचालक डॉ. भार्गव यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारपणे महत्वाच्या १३ ते १४ रुग्णालयामध्ये या लसीबाबत क्लिनीकल ट्रायल्स करण्याच्या सूचना दिल्या आहेत.'

लसीच्या ७ जुलै पर्यंत क्लिनीकल ट्रायल्स व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. साधारणपणे १५ ऑगस्टपर्यंत प्री-क्लिनीकल आणि क्लिनिकल ट्रायलचे काम पूर्ण होऊन पहिली भारतीय बनावटीची लस तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे डॉ. भार्गव यांनी सांगितल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलं.

लसीबाबत मी आशादायी असून सर्व बाबी वेळेत पूर्ण झाल्यास, आपल्या देशाची पहिली लस आयसीएमआर-बीबीआयएल यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार होऊ शकेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, हैदराबादच्या भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या लसीचे येत्या 15 ऑगस्टपर्यंत मानवी चाचण्यांचे अहवाल येणार आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी भारत बायोटेक आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे मुख्य तपासनीस यांना लिहलेल्या पत्रात म्हटले की, स्वदेशी कोरोना लस कोव्हॅक्सिनची चाचणी प्रक्रिया वेगाने पूर्ण करा, ज्यामुळे या वैद्यकीय चाचणीचा निकाल 15 ऑगस्टपर्यंत येऊ शकतील. भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद संयुक्तपणे ही लस लॉन्च करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - १५ ऑगस्टला जाहीर होणार 'कोव्हॅक्सिन'च्या मानवी चाचणीचे अहवाल..

हेही वाचा - कोरोना रुग्णांची हेळसांड थांबणार; आरोग्य सुविधांच्या देखरेखीसाठी आता जिल्हास्तरीय समिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.