ETV Bharat / state

Gram Panchayat Result 2022 : ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा झेंडा; भाजप प्रथम क्रमांकावर

author img

By

Published : Dec 20, 2022, 9:31 PM IST

Updated : Dec 21, 2022, 8:02 PM IST

Gram panchayat Result
ग्रामपंचायत निकाल

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या ग्रामपंचायतींच्या (Maharashtra Grampanchayat Result 2022) निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने बाजी ( Mahavikas Aghadi won Gram Panchayat Elections ) मारली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या या आघाडीला 3 हजार 231 तर भाजपा - शिंदे गट 2 हजार 899 जागांवर विजयी झाला आहे. 1005 ग्रामपंचायतींवर अपक्षांनी झेंडा फडकवला आहे. भाजप 2096 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवत आघाडीवर ( BJP number one in Gram Panchayat Elections ) आहे.

ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झालेले उमेदवार जल्लोष साजरा करताना

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची ( Gram Panchayat Elections Result 2022 ) घोषणा केली होती. त्यापैकी 616 ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्य पदांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली होती. उर्वरित 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. या निवडणुकीत 74 टक्के मतदान झाले. मंगळवारी विविध ठिकाणी झालेल्या मतमोजणीनंतर (Maharashtra Grampanchayat Result 2022) महाविकास आघाडीने सर्वाधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविल्याचे समोर ( Mahavikas Aghadi won Gram Panchayat Elections ) आले आहे.

भाजपा आघाडीवर : राज्यातील सत्ता आणि शिंदे गटासोबत युती असल्यामुळे सर्वाधिक ग्रामपंचायतींमध्ये सत्ताधारी पक्षाला मिळतील असा दावा भाजपाच्या नेत्यांचा होता. राष्ट्रवादीपेक्षा भाजपाने अधिक म्हणजे 2096 ग्रामपंचायतींमध्ये यश मिळवले आहे. शिंदे गटाने 803 ग्रामपंचायती जिंकत सार्वत्रिक निवडणुकीतील आपली ताकद दाखवली आहे. सत्तेतील हे मित्रपक्ष महाविकास आघाडीच्या ( Mahavikas Aghadi ) संख्याबळाजवळ पोहचले असले तरी आगामी निवडणुकांसाठी सत्ताधारी पक्षाला अधिक कंबर कसून काम करावे लागणार हे या निकालांनी दाखवून दिले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामपंचायत निकालांवर बोलताना

राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर : राज्यात सत्तातर झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर सर्वाधिक परिणाम होईल, अशी चर्चा होती मात्र राष्ट्रवादीने आपल्या मित्रपक्षांच्या तुलनेत सर्वाधिक १६५० ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. त्याखालोखाल काँग्रेस 910 तर शिवसेनेने (उद्धव ठाकरे ) 666 जागांवर समाधान मानले आहे. ठाकरे गटाचे हे नुकसान अपेक्षित होते. पक्षातून 40 आमदार फुटल्याने असे चित्र निर्माण झाल्याचे शिवसेनेनेही कबूल केले आहे.

जिल्हानिहाय ग्रामपंचायतींच्या निकालाची संख्या : ठाणे १३५, पालघर ६२, रायगड १९१, रत्नागिरी १६३, सिंधुदुर्ग २९१, नाशिक १८८, धुळे ११८, जळगाव १२२, अहमदनगर १९५, नंदुरबार ११७, पुणे १७६, सोलापूर १६९, सातारा २५९, सांगली ४१६, कोल्हापूर ४२९, औरंगाबाद २०८, बीड ६७१, नांदेड १६०, उस्मानाबाद१६५, परभणी ११९, जालना २५४, लातूर ३३८, हिंगोली ६१, अमरावती २५२, अकोला २६५, यवतमाळ ९३, बुलडाणा २६१, वाशीम २८०, नागपूर २३४, वर्धा १११, चंद्रपूर ५८, भंडारा ३०४, गोंदिया ३४५, गडचिरोली २५. एकूण ७ हजार १३५.

पक्षनिहाय जागा : ग्रामपंचायत निवडणूकीत सर्वाधिक भाजपने 2096 तर बाळासाहेबांची शिवसेना 803 जागा मिळाल्या असून भाजप-शिंदे गटाने मिळून 2899 जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी 1650 जागा, कॉंग्रेस 910 जागा व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 666 मिळवल्या आहेत. तसेच महाविकास आघाडीने सर्वाधिक 3231 जागांवर विजय मिळवला. राज्यात ग्रामपंचायत निवडणूकीत 1005 अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.


विजयावर नेत्यांचे दावे व टीका - राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर झाला. यावर सर्वच पक्षांनी आम्हीच नंबर वन असल्याचा दावा केला आहे. आकडेवारीनुसार, भाजपा पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा नेते करत आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून आपला पक्ष पहिला, तुमचा पक्ष दुसरा म्हणणं बालिशपणा असल्याचे म्हटले आहे. वर्षानुवर्षं आपण हे आकडे ऐकत आहोत. याच्यात फोलपणा किती हे कालांतराने कळते. आपला पक्ष पहिला, तुमचा पक्ष दुसरा म्हणणे बालिशपणा आहे, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

फडणवीसांकडून शिंदेंचे खास अभिनंदन - देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज ग्रामपंचायतच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा या आमच्या युतीला दणदणीत विजय मिळालेला आहे. आतापर्यंतचे जे आकडे आलेले त्यानुसार ३ हजार २९ एवढ्या ग्रामपंचायती या आमच्या आलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये आमची सरशी झालेली आहे. मी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करेन, की या सहा महिन्यांच्या कारभारावर एकप्रकारे ग्रामीण जनतेने पसंती दाखवली आहे.

Last Updated :Dec 21, 2022, 8:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.